IOCL M15 Petrol | महागड्या पेट्रोलपासून लवकरच सुटका होणार? इंडियन ऑइलने सुरू केले स्वस्त इंधन...

Indian Oil Corporation new petrol : पेट्रोल (Petrol Price) आणि डिझेलसारख्या (Diesel Price) इंधनांच्या दरात चांगलीच वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. अशात जर पेट्रोलचे दर कमी झाले किंवा तुम्हाला स्वस्तातील पेट्रोल जर उपलब्ध झाले तर? पेट्रोलच्या किमतीत वाढ झाल्यानंतर आता इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) ने नवीन प्रकारचे पेट्रोल बाजारात आणले आहे. पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू झालेला पेट्रोलचा नवीन प्रकार इंधनाच्या किंमती कमी करू शकतो.

Indian Oil Corporation new Petrol
इंडियन ऑइलचे नवे पेट्रोल 
थोडं पण कामाचं
  • पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या दरांचा ग्राहकांना मोठा फटका
  • इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे नवे एम 15 पेट्रोल लॉंच झाले
  • 15 टक्के मिथेनॉलचे मिश्रण असलेले 'एम15' पेट्रोल स्वस्त असणार आहे

Indian Oil Corporation M15 Petrol : नवी दिल्ली : पेट्रोल (Petrol Price) आणि डिझेलसारख्या (Diesel Price) इंधनांच्या दरात चांगलीच वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. अशात जर पेट्रोलचे दर कमी झाले किंवा तुम्हाला स्वस्तातील पेट्रोल जर उपलब्ध झाले तर? पेट्रोलच्या किमतीत वाढ झाल्यानंतर आता इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) ने नवीन प्रकारचे पेट्रोल बाजारात आणले आहे. पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू झालेला पेट्रोलचा नवीन प्रकार इंधनाच्या किंमती कमी करू शकतो. 15 टक्के मिथेनॉलचे मिश्रण असलेले  'एम15' पेट्रोल  (M15 Petrol) आसाममधील तिनसुकिया जिल्ह्यात पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू करण्यात आले आहे. इंडियन ऑइलचे हे नवे पेट्रोल जर बाजारात सर्वत्र उपलब्ध झाले तर महागाईने चिंताग्रस्त झालेल्या सर्वसामान्यांना मोठाच दिलासा मिळणार आहे. (Indian Oil Corporation launches cheap M15 Petrol amid rising fuel prices)

अधिक वाचा : Gold Price Today | स्वस्त झाले सोने... सोडू नका अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या ताजा भाव

इंधनाच्या वाढत्या दरातून दिलासा

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी शनिवारी NITI आयोगाचे सदस्य VK सारस्वत आणि IOC चेअरमन एसएम वैद्य यांच्या उपस्थितीत 'M 15' पेट्रोल सुरू केले. तेली म्हणाले, मिथेनॉल मिसळल्याने इंधनाच्या वाढत्या किमतींपासून दिलासा मिळेल. दरात कपात झाल्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

स्वावलंबी बनवण्यासाठी इंडियन ऑइलचे पाऊल

तेली म्हणाले, 'एम१५ पेट्रोलचे प्रायोगिक प्रकाशन हे इंधनाच्या बाबतीत स्वावलंबी होण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे, त्यामुळे आयातीचा बोजाही कमी होईल.' एका अधिकृत निवेदनात, मंत्र्याचे म्हणणे उद्धृत केले गेले की इंडियन ऑइल भारताला उर्जेमध्ये आत्मनिर्भर करण्यासाठी हे पाऊल उचलत आहे.

अधिक वाचा : Gold Investment | या अक्षय तृतियेला काय कराल? सोन्यातील गुंतवणकीचे किती आहेत पर्याय? जास्त लाभ मिळवण्यासाठी अशी करा गुंतवणूक...

पेट्रोलचे दर 105 रुपयांच्या पुढे

येथे मिथेनॉलची सहज उपलब्धता लक्षात घेऊन या उपक्रमासाठी तिनसुकियाची निवड करण्यात आली. त्याची निर्मिती आसाम पेट्रोकेमिकल लिमिटेड करते. राजधानी दिल्लीत सध्या पेट्रोलचा दर 105 रुपयांच्या वर आहे. पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले ​​होते. 22 मार्च ते 6 एप्रिल या कालावधीत कंपन्यांनी प्रतिलिटर 10 रुपयांनी वाढ केली होती. 6 एप्रिलनंतर आतापर्यंत कंपन्यांनी कोणत्याही प्रकारे दरात वाढ केलेली नाही.

अधिक वाचा : 7th Pay Commission | पगारवाढीसाठी येणार नवीन योजना! यापुढे या आधारे वाढणार सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन...

महागाईचा दणका

वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर एलपीजी गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेल, सीएनजी यांचे दर फारच महत्त्वाचे ठरत आहेत. या सर्व वस्तूंचे दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशावर प्रत्यक्ष भार तर वाढतोच. मात्र त्याचबरोबर महागाईतदेखील अतिरिक्त वाढ होते. पेट्रोलियम कंपन्या वेळोवेळी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करत असतात. तर एलपीजी गॅस सिलिंडरचे दर महिन्याच्या एक तारखेला जाहीर केले जातात. मागील काही महिन्यांपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीतदेखील वाढ होते आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 102 डॉलरच्या जवळ आहे. देशातील कच्च्या तेलाच्या करारातून पंपावर विकले जाणारे पेट्रोलचे चक्र 22 दिवसांचे असते म्हणजेच महिन्याच्या 1 तारखेला खरेदी केलेले कच्चे तेल 22 तारखेला पंपावर पोहोचते (सरासरी अंदाज). कच्च्या तेलावर प्रक्रिया करण्याचा खर्च एक लिटर किरकोळ तेलाच्या किंमतीमध्ये समाविष्ट केला जातो, त्यानंतर जेव्हा ते रिफायनरीतून बाहेर येते तेव्हा त्याची मूळ किंमत निश्चित केली जाते. त्यानंतर तेथून तेल पंपापर्यंत पोहोचवण्याचा खर्च, केंद्र व राज्याचे कर तसेच डीलरचे कमिशनही जोडले जाते. या सर्वाचा खर्च ग्राहकांकडून वसूल केला जातो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी