Indian Railways Update : खूशखबर! आता महिलांना मिळणार ट्रेनमध्ये कन्फर्म सीट, रेल्वेमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

IRCTC Update : भारतीय रेल्वे (Indian Railway)आपल्या प्रवाशांसाठी नवनवीन सुविधा आणत असते. देशभरातून रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांची मोठी संख्या आहे. आता रेल्वेने महिला प्रवाशांसाठी (Women Passengers) मोठी घोषणा केली आहे. आता महिलांना ट्रेनमध्ये सीटसाठी चिंता करावी लागणार नाही. महिलांची सोय लक्षात घेऊन रेल्वेमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे.

Reserve berths for women passengers
महिला प्रवाशांसाठी रेल्वेमध्ये राखीव बर्थ 
थोडं पण कामाचं
  • भारतीय रेल्वेकडून महिलांसाठी खास सुविधा
  • भारतीय रेल्वेमध्येही महिला प्रवाशांसाठी जागा राखीव ठेवण्यात येणार
  • केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली घोषणा

Berths for Female Railway Passengers : नवी दिल्ली :  भारतीय रेल्वे (Indian Railway)आपल्या प्रवाशांसाठी नवनवीन सुविधा आणत असते. देशभरातून रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांची मोठी संख्या आहे. आता रेल्वेने महिला प्रवाशांसाठी (Women Passengers) मोठी घोषणा केली आहे. आता महिलांना ट्रेनमध्ये सीटसाठी चिंता करावी लागणार नाही. महिलांची सोय लक्षात घेऊन रेल्वेमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे. ज्या प्रकारे बस आणि मेट्रो ट्रेनमध्ये महिलांसाठी स्वतंत्र जागा राखीव ठेवल्या जातात, त्याचप्रमाणे आता भारतीय रेल्वेमध्येही महिलांसाठी जागा राखीव (Reserve berths for women passengers) ठेवण्यात येणार आहेत. रेल्वेच्या या नव्या सुविधेमुळे महिलांना रेल्वेने प्रवास करणे सोपे होणार आहे. रेल्वेने दररोज लाखो प्रवासी देशभरातून प्रवास करत असतात. त्यात महिलांची संख्याही मोठी असते. त्यामुळे आता रेल्वेच्या नव्या सुविधेमुळे महिला प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. (Indian Railway announces special berths for women passengers)

अधिक वाचा : obc reservation : नगरपरिषद निवडणुकीविषयी सर्वोच्च न्यायालयाचा शिंदे सरकारला दे धक्का, तर महाराष्ट्र निवडणूक आयोगाला झटका

आता ट्रेनमधील महिला प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेने लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील महिला प्रवाशांसाठी विशेष बर्थची व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच महिलांच्या सुरक्षेसाठी महिनाअखेर आराखडाही तयार केला जाणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw)म्हणाले की, लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये महिलांच्या आरामदायी प्रवासासाठी भारतीय रेल्वेने राखीव बर्थसह अनेक सुविधा सुरू केल्या आहेत.

महिलांसाठी राखीव बर्थ

केंद्रीय मंत्री म्हणाले की, लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांमध्ये स्लीपर क्लासमध्ये सहा बर्थ आरक्षित केले जातील. गरीब रथ, राजधानी, दुरांतोसह पूर्ण वातानुकूलित एक्स्प्रेस गाड्यांच्या थर्ड एसी कोचमध्ये (3AC वर्ग) महिला प्रवाशांसाठी सहा बर्थ आरक्षित करण्यात आले आहेत.

अधिक वाचा - Sanjay Raut : महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्ता परिवर्तन झालं तरी मला आश्चर्य वाटणार नाही- संजय राऊत 

स्लीपर कोचमध्येही आरक्षण

प्रत्येक स्लीपर कोचमध्ये सहा ते सात लोअर बर्थ, वातानुकूलित ३ टायर (३ एसी) कोचमध्ये चार ते पाच लोअर बर्थ आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी वातानुकूलित २ टायर (२ एसी) डब्यांमध्ये तीन ते चार लोअर बर्थ, 45 वर्षे आणि त्यावरील महिला प्रवाशांसाठी आणि गर्भवती महिलांसाठी राखीव बर्थची व्यवस्था करण्यात आली आहे. तुमच्या माहितीसाठी ट्रेनमधील त्या वर्गाच्या डब्यांच्या संख्येच्या आधारे आरक्षण निश्चित केले जाईल.

अधिक वाचा - ४५ वर्षीय करोडपती महिलेने १४ वर्षीय मुलासोबत जबरदस्ती ठेवले शारीरिक संबंध आणि मग घडलं असं की...

महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था

रेल्वेमंत्री म्हणाले, 'गाड्यांमध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. 'पोलीस' आणि 'सार्वजनिक सुव्यवस्था' हे भारतीय राज्यघटनेच्या सातव्या अनुसूची अंतर्गत राज्याचे विषय आहेत. अर्थात रेल्वे संरक्षण दल (RPF), GRP आणि जिल्हा पोलिस प्रवाशांना उत्तम सुरक्षा प्रदान करतील.'

यासोबतच रेल्वे आणि स्थानकांवर महिला प्रवाशांसह इतर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी जीआरपीच्या मदतीने रेल्वेकडून पावले उचलली जात आहेत. रेल्वे प्रोटेक्शन फोर्सने गेल्या वर्षी संपूर्ण भारतातील 'मेरी सहेली' हा उपक्रम सुरू केला होता. या सेवेचा उद्देश महिला प्रवाशांना त्यांच्या संपूर्ण प्रवासात रेल्वेने प्रवास करताना सुरक्षितता पुरवणे हा आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी