Indian Railways Rule Changed: नवी दिल्ली : रेल्वेने दररोज लाखो लोक प्रवास करतात. त्यामुळे रेल्वेच्या नियमांचा (Indian Railway rule), रेल्वेच्या सुविधांचा थेट परिणाम लाखो लोकांवर होत असतो. आजही भारतात प्रवासासाठी सर्वाधिक प्राधान्य रेल्वेलाच दिले जाते. प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी रेल्वे आपल्या सुविधा आणि नियमांमध्ये वेळोवेळी बदल करत असते. आता भारतीय रेल्वेकडून (Indian Railways) ट्रेनमधील काही नियम बदलण्यात आले आहेत. रेल्वेने प्रवास करण्यासाठी हे बदल लक्षात घेणे महत्त्वाचे आहेत. रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हा नवीन नियम लागू होणार आहे. ट्रेनमध्ये रात्रीच्या वेळी प्रवास करताना काही प्रवाशांना मोबाईलवर मोठ्या आवाजात बोलतात. शिवाय त्यांना मोठ्या आवाजात गाणी ऐकण्याची सवय असते. अशा प्रकारांबद्दल प्रवाशांच्या तक्रारी रेल्वे बोर्डाकडे आल्यानंतर आता रेल्वे प्रशासनाने हे पाऊल उचलत नियमात बदल केला आहे. (Indian Railway changed the rule regarding night travel in train read in Marathi)
अधिक वाचा : या शुक्रवारपासून वर्षातील सर्वात मोठा ‘ब्लॅक फ्रायडे’ सेल
ट्रेनमध्ये रात्रीच्या प्रवासात होत असलेल्या त्रासासंदर्भात प्रवाशांच्या तक्रारी लक्षात घेऊन रेल्वेने नियम लागू केला आहे की रात्री 10 वाजेनंतर ट्रेनमध्ये मोबाईलवर मोठ्याने बोलता येणार नाही किंवा मोठ्या आवाजात संगीतदेखील ऐकता येणार नाही. या नव्या नियमानंतरदेखील प्रवाशांची गैरसोय झाली किंवा त्यांची तक्रार असली तर त्याची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असणार आहे.
अधिक वाचा : FIFA World Cup 2022: 44 वर्षानंतर वर्ल्डकपमध्ये घडलेय हे....
काही प्रवासी रात्रीच्या वेळी मोठ्या आवाजात बोलतात त्यामुळे इतर प्रवाशांना त्रास होतो. याचबरोबर आवश्यक दिवे वगळून इतर दिवे बंद करावे लागणार आहेत. यासंदर्भात तक्रार आल्यावर रेल्वेकडून कारवाई केली जाणार आहे. फक्त प्रवासीच नाही तर रेल्वेचे चेकिंग कर्मचारी, आरपीएफ, इलेक्ट्रिशियन, केटरिंग कर्मचारी आणि देखभाल कर्मचारी रात्री शांततेत काम करतील.
रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे बोर्डाने याआधीदेखील काही नियम लागू करत तशा सूचना दिल्या होत्या. रेल्वेने नुकतेच ट्रेनमध्ये तागाचे कपडे, ब्लँकेट आणि पडदे पुरवणे पुन्हा सुरू करण्याचे आदेश जारी केले होते. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून हे निर्बंध लादण्यात आले होते.
अधिक वाचा : Healthy drinks for winter : हिवाळ्यात ही पेये तुम्हाला ठेवतील निरोगी, शिवाय त्वचादेखील होईल चमकदार
बहुसंख्य लोक प्रवासासाठी भारतीय रेल्वेलाच प्राधान्य देतात. त्यामुळे अनेकदा रेल्वेला प्रचंड गर्दी असते. अशावेळी कन्फर्म तिकिट (Confirm Ticket) मिळणे हे दुरापास्त होऊन बसते. त्यामुळे तुम्ही जर अचानक प्रवास करणार असाल तर टेन्शन येणे स्वाभाविक आहे. मात्र आता तुमचे टेन्शन कमी करणारी सुविधा आयआरसीटीसीने (IRCTC) सुरू केली आहे. कन्फर्म तिकिटासाठी आयआरसीटीसी मास्टर लिस्ट (IRCTC Master List) तुमची खूप मदत करू शकते. ही सुविधा ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या वेळी वापरले जाऊ शकते. मास्टर लिस्ट अंतर्गत, तुम्ही तुमच्या सर्व प्रवाशांचे तपशील आधीच भरू शकता. यानंतर तुम्ही जेव्हाही तिकीट बुक कराल तेव्हा तुम्हाला वेगळे तपशील भरावे लागणार नाहीत. यामुळे बराच वेळ वाचेल. कारण तत्काळ तिकिटांच्या बुकिंगच्या वेळी हीच गोष्ट सर्वात महत्वाची ठरते.