Diwali Bonus for Railway Employees: रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी होणार गोड, इतक्या दिवसांचा पगार मिळणार बोनस मंजूर

भारतीय रेल्वे सेवेत (Indian Railway Services) असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी (Railway Employees) यंदाची दिवाळी (Diwali 2022) अधिक गोड होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

indian railway employees likely to get 78 days salary as diwali bonus decision expected in union cabinet- meeting read in marathi
रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी होणार गोड 
थोडं पण कामाचं
  • इंडियन रेल्वेमध्ये काम करत (Indian Railway Services) असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी (Railway Employees) यंदाची दिवाळीचे  (Diwali 2022) मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे.
  • केंद्र सरकारने रेल्वे कामगारांसाठी सुट्टीचा बोनस जाहीर करण्याचे हे सलग 12वे वर्ष ठरणार आहे.
  • सरकार अथवा प्रशासकीय पातळीवर याबाबत अधिकृतपणे कोणतीही घोषणा करण्यात आली नाही

नवी दिल्ली : इंडियन रेल्वेमध्ये काम करत (Indian Railway Services) असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी (Railway Employees) यंदाची दिवाळीचे  (Diwali 2022) मोठं गिफ्ट मिळाले आहे.  केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज  याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.  सरकार 11 लाखांहून अधिक रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा पगार दिवाळी बोनस (Diwali Bonus) देऊ शकते. केंद्र सरकारने रेल्वे कामगारांसाठी सुट्टीचा बोनस जाहीर करण्याचे हे सलग 12वे वर्ष ठरणार आहे. .(indian railway employees likely to get 78 days salary as diwali bonus decision expected in union cabinet- meeting read in marathi)

अधिक वाचा : Tata Motorनं लॉन्च केली देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार

मागील काही वर्षांपासून, सरकारने घोषित केले आहे की पात्र नॉन-राजपत्रित (Eligible Non-Gazetted Railway Staf) रेल्वे कर्मचार्‍यांना (RPF/RPSF कर्मचारी वगळून) 78 दिवसांच्या पेमेंटच्या बरोबरीने उत्पादकता लिंक्ड बोनस (PLB) पेमेंट मिळेल. मोदी सरकार 78 दिवसांच्या पगाराचा बोनस देण्याची परंपरा सलग नवव्या वर्षीही सुरुच ठेवण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, सरकारने यापूर्वी सांगितले होते की सणाच्या बोनसचा उद्देश लक्षणीय संख्येने रेल्वे कर्मचार्‍यांना उत्पादकता पातळी वाढवण्यासाठी आणि रेल्वेचे कार्य सुधारण्यासाठी आहे. त्यासोबतच औद्योगिक सुसंवाद सुनिश्चित करण्यासाठी प्रेरित करणे हा देखील त्यामागचा उद्देश आहे.

अधिक वाचा : IND vs SA 1st T20 Match मोबाइलमध्ये पाहा अगदी फ्री 

प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसरा, पीएलबीच्या पेमेंटसाठी सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत रु. 2021-22 या आर्थिक वर्षासाठी 1984.73 कोटी रुपये सर्व पात्र नॉन-राजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांना (RPF/RPSF कर्मचारी वगळता) मंजूर केले आहेत. त्यामुळे आता केवळ औपचारिकता बाकी असल्याचा दावा केला जातो आहे.

अधिक वाचा :  Porn star: शरीराचे 27 तुकडे झाल्यानंतरही ती करत होती चॅट

भारतीय रेल्वचा देशभरातील पसारा प्रंचड मोठा आहे. भारतीय रेल्वेचा आवाका इतका व्याप्त आहे की, अशिया खंडातील सर्वाधिक रोजगार देणारी सरकारी कंपनी अशीही भारतीय रेल्वेची ओळख आहे. दिली जाणारी सेवा आणि व्याप्ती पाहता रेल्वे सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्याही तितकीच मोठी आहे. त्यामुळे सरकारचा एकूण महसूलापैकी बऱ्यापैकी खर्च कर्मचाऱ्यांचे पगार, सेवा, सुविधा, महागाई भत्ता आणि बोनस यांवरही मोठ्या प्रमाणावर खर्च होतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी