Indian Railway: खूशखबर, या खास गोष्टीमुळे वंदे भारतचा प्रवास होणार अधिक आरामदायक

काम-धंदा
भरत जाधव
Updated Apr 29, 2022 | 13:13 IST

तुम्हीही अनेकदा ट्रेनने (Train) प्रवास (Travel) करत असाल तर ही बातमी तुम्हाला नक्कीच आनंदित करेल. गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेली वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) आपल्या सोयी आणि वेगामुळे लोकांच्या पसंतीस उतरली आहे.

Indian Railway
या खास गोष्टीमुळे वंदे मातरम् चा प्रवास होणार अधिक आरामदायक  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • या ट्रेनचा वेग 160 किमी प्रतितास असेल.
  • स्लीपर वंदे भारत एक्सप्रेसचे सर्व डबे वातानुकूलित असतील.
  • भारतीय रेल्वे रुळांवर स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस धावणार

Vande Bharat Express: नवी दिल्ली :  तुम्हीही अनेकदा ट्रेनने (Train) प्रवास (Travel) करत असाल तर ही बातमी तुम्हाला नक्कीच आनंदित करेल. गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेली वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) आपल्या सोयी आणि वेगामुळे लोकांच्या पसंतीस उतरली आहे. अशा परिस्थितीत या ट्रेनला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. आता भारतीय रेल्वे रुळांवर स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस (Sleeper Vande Bharat Express) धावणार आहे. 

अपग्रेडेशनसाठी निविदाही काढल्या

अपग्रेडेशनसाठी निविदाही काढण्यात आल्या आहेत. वंदे भारत एक्स्प्रेसच्या अपग्रेडेशनसाठी रेल्वेने निविदाही काढल्या आहेत. निविदेची अंतिम तारीख रेल्वेने २६ जुलै २०२२ ही निश्चित केली आहे.

ट्रेनचे सर्व डबे वातानुकूलित असतील

भारतीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, स्लीपर वंदे भारत एक्सप्रेसचे सर्व डबे वातानुकूलित असतील. स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस मध्यम आणि लांब पल्ल्याच्या मार्गावर धावणार आहेत. रेल्वेच्या वतीने काढण्यात आलेल्या निविदेबाबत असे सांगण्यात आले की, सध्याच्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या अपग्रेडेशनचे काम चेन्नई आणि महाराष्ट्रातील लातूर येथे असलेल्या मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये केले जाईल.

200 गाड्या निर्धारित वेळेत तयार होतील

रेल्वेने दिलेल्या माहितीत असे सांगण्यात आले की, 20 मे 2022 रोजी पहिली प्री-बिड परिषद होणार आहे. रेल्वेने निविदेत सांगितले की, स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेसच्या डिलिव्हरीची अंतिम मुदत 6 वर्षे 10 महिने असेल. कंपनी या कालावधीत 200 ट्रेन तयार करेल. 16 डब्यांच्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये 1 फर्स्ट एसी, 4 सेकंड एसी आणि 11 थर्ड एसी कोच असतील. 20 कोच असलेल्या स्लीपर ट्रेनमध्ये फर्स्ट एसी, 4 सेकंड एसी आणि 15 थर्ड एसी कोच बसवण्यात येणार आहेत. या ट्रेनचा वेग 160 किमी प्रतितास असेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी