Indian Railways Rules: ट्रेनमध्ये कोणताही प्रवासी यावेळी तुमच्या सीटवर बसू शकत नाही, टीटीदेखील तपासू शकत नाही तिकीट...पाहा नियम

IRCTC Rule : लांबच्या प्रवासात ट्रेनने प्रवास करणे आरामदायक आणि सुरक्षित आहे. हे लक्षात घेऊन रेल्वेने (Indian Railway) प्रवाशांसाठी अनेक नियमही केले आहेत. यातील अनेक नियम (Railway Rules) रात्री प्रवास करणाऱ्यांसाठी आहेत. तुम्हीही अनेकदा ट्रेनने प्रवास करत असाल तर तुम्हाला रेल्वेशी संबंधित प्रत्येक नियम माहित असणे आवश्यक आहे. नुकतेच रेल्वे बोर्डाने रात्रीच्या प्रवासाचे नियम अपडेट केले होते.

IRCTC rule
आयआरसीटीसीचे नियम 
थोडं पण कामाचं
  • रेल्वेने प्रवाशांसाठी अनेक नियम केले आहेत.
  • रेल्वे बोर्डाने रात्रीच्या प्रवासाचे नियम अपडेट केले आहेत
  • तिकिट तपासणी आणि मधल्या बर्थसंदर्भातील नियम जाणून घ्या

Indian Railways Travel Rules : नवी दिल्ली : लांबच्या प्रवासात ट्रेनने प्रवास करणे आरामदायक आणि सुरक्षित आहे. हे लक्षात घेऊन रेल्वेने (Indian Railway)प्रवाशांसाठी अनेक नियमही केले आहेत. यातील अनेक नियम (Railway Rules)रात्री प्रवास करणाऱ्यांसाठी आहेत. तुम्हीही अनेकदा ट्रेनने प्रवास करत असाल तर तुम्हाला रेल्वेशी संबंधित प्रत्येक नियम माहित असणे आवश्यक आहे. नुकतेच रेल्वे बोर्डाने रात्रीच्या प्रवासाचे नियम अपडेट केले होते. रेल्वेशी संबंधित नियम जाणून घेऊया, ज्यामुळे तुम्ही प्रवासाचा पुरेपूर आनंद घेऊ शकता. (Indian Railway have rule for using middle berth & ticket checking, check Railway rule)

अधिक वाचा : Gold-Silver Rate Today, 14 July 2022:मोठी संधी! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, पाहा किती झाला भाव...

थ्री टायर कोचमध्ये आहे हा नियम

थ्री टायर डब्यातून प्रवास करताना सर्वात मोठी समस्या मधल्या बर्थची असते. अनेकदा खालच्या बर्थवरचा प्रवासी रात्री उशिरापर्यंत बसून राहतो, त्यामुळे मधल्या बर्थवरील प्रवाशाला इच्छा असूनही आराम करता येत नाही. याशिवाय असे देखील घडते की मधल्या बर्थचे प्रवासी रात्री उशिरापर्यंत लोअर बर्थवर बसतात, त्यामुळे खालच्या बर्थवर झोपायला त्रास होतो.

मधला बर्थ उघडण्याची आणि बंद होण्याची वेळ

तुमच्यासोबतही असे कधी घडले असेल तर रेल्वेच्या नियमांची माहिती नक्कीच मिळवा. हे नियम जाणून घेतल्यावरच तुम्ही रेल्वेच्या नियमांचा संदर्भ घेऊ शकता. नियमानुसार रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत मधला बर्थ उघडता येतो. म्हणजेच, जर तुमच्याकडे लोअर बर्थ असेल तर रात्री 10 नंतर मिडल बर्थ किंवा वरच्या बर्थचा प्रवासी तुमच्या सीटवर बसू शकत नाही. तुम्ही त्याला रेल्वेच्या नियमांचा संदर्भ देऊन त्याच्या सीटवर जाण्यास सांगू शकता. मधल्या बर्थच्या प्रवाशाने दिवसा त्याची सीट उघडली तरीही, तुम्ही त्याला नियम सांगून तसे करण्यास नकार देऊ शकता.

अधिक वाचा : Adani Vs Ambani: 5Gच्या मैदानात आमने-सामाने येणार अंबानी आणि अदानी, तेही 2 डॉलरसाठी, काय असणार टेलिकॉमचे भवितव्य?

टीटीई तिकीटही तपासू शकत नाही

प्रवासी अनेकदा तक्रार करतात की झोपल्यानंतर ते टीटीई कोचमध्ये तिकीट तपासण्यासाठी येताता आणि प्रवाशांना जागे करतात. यामुळे प्रवाशांची झोपमोड होते आणि त्रास होतो. प्रवाशांचा हा त्रास दूर करण्यासाठी आणि प्रवास सोईस्कर करण्यासाठी नियमानुसार टीटीई रात्री १० ते सकाळी 6 या वेळेत तिकीट तपासू शकत नाही. पण जर तुमचा प्रवास रात्री 10 नंतर सुरू झाला तर हा रेल्वे नियम लागू होत नाही.

अधिक वाचा : Income Tax : आपल्या बँक खात्यात करू नका एवढे व्यवहार, नाही तर पडेल इन्कम टॅक्सची धाड

मोठ्याने बोलण्यावर बंदी

रात्रीच्या वेळी सहप्रवाशांद्वारे मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी ऐकणे किंवा व्हिडिओ पाहणे अशा तक्रारी प्रवाशांकडून रेल्वे बोर्डाकडे येतात. रात्रीच्या वेळी काही प्रवाशांचे गट मोठ्याने बोलत असल्याच्याही तक्रारी येत असतात. हे पाहता रेल्वेने 10 वाजल्यानंतर इअरफोनशिवाय गाणी ऐकण्यास, व्हिडिओ पाहण्यास किंवा मोठ्याने बोलण्यास बंदी घातली आहे.

रेल्वे कर्मचाऱ्यांची जबाबदारी

जर तुमचा सहप्रवासी तुमचे ऐकत नसेल तर तुम्ही यासाठी ट्रेनमध्ये उपस्थित असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांकडे तक्रार करू शकता. घटनास्थळी येऊन तुमची समस्या सोडवण्याची जबाबदारी रेल्वे कर्मचाऱ्यांची आहे. त्यानंतरही सहप्रवासी सहमत नसेल, तर त्याच्यावर रेल्वेच्या नियमानुसार कारवाई होऊ शकते.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी