भारतीय रेल्वेत छोट्या उद्योगांना लाखो रूपये कमावण्याची संधी, ह्या आहेत अटी

काम-धंदा
Updated Mar 17, 2021 | 11:14 IST | टाइम्स नाऊ मराठी

जर तुम्ही एखादा लघु, किंवा मध्यम उद्योग करण्याचा विचार करत असाल तर भारतीय रेल्वे खात्यासोबत आपला उद्योग चालवू शकता. यातून तुम्हाला कमी खर्चात सुद्धा चांगला नफा मिळू शकतो.

Indian railway is giving  opportunity to MSME industries to earn profit over lakhs
प्रतिकात्मक फोटो   |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • वर्षाला ७० हजार कोटींचे उत्पादन विकत घेते रेल्वे
  • छोट्या व मध्यम उद्योजकांना रेल्वेत गुंतवणूक करण्याची संधी
  • दुसऱ्यांदा रजिस्ट्रेशन करायची गरज नाही

नवी दिल्ली:  भारतीय रेल्वेने आत्मनिर्भर भारत अभियाना अंतर्गत सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. तुम्ही जर नवीन उद्योग करायचा विचार करत असाल तर रेल्वेसोबत काम करून तुम्ही लाखो रूपये कमवू शकता. आता तुम्ही रेल्वेसोबत कमी खर्चात जास्त नफा देणारा उद्योग सुरू करू शकता. तुम्हालाही या अभियानासोबत काम करायचे असेल तर ही तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे. यातून तुम्ही चांगला वार्षिक नफा कमावू शकता.

रेल्वेला उत्पादन विकून करा कमाई 

भारतीय रेल्वे दर वर्षी तब्बल ७० हजार कोटींची उत्पादने विकत घेत असते. यामध्ये तांत्रिक आणि अभियांत्रिकी उत्पादनांसोबत रोजच्या वापरातल्या अनेक वस्तुूचा सामावेश असतो. तेव्हा एखादा छोटा उद्योग सुरू करण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.

तुम्ही जर रेल्वेसोबत उद्योग करण्यासाठी इच्छुक असाल तर https://ireps.gov.in आणि https://gem.gov.in या संकेतस्थळांवर रजिस्ट्रेशन करू शकता.

कसा सुरू कराल उद्योग

  1.  जी कंपनी आपले उत्पादन बाजारात सर्वात कमी भावाने विकते त्याच कंपनीकडून रेल्वे माल विकत घेत असते. त्यामुळे तुम्हाला अशीच कंपनी निवडावी लागेल जी आपले उत्पादन स्वस्तात विकायला तयार असेल.
  2. त्यानंतर तुमची एक डिजिटल सिग्नेचर बनवावी लागेल. त्यानंतर https://ireps.gov.in आणि https://gem.gov.in या संकेतस्थळावर तुम्ही टेंडर पाहू शकता.
  3. टेंडर भरत असताना आपल्याला येणारा खर्च आणि त्यातून होणाऱ्या फायद्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. त्यानुसारच टेंडर भरणे फायद्याचे ठरते.
  4. याव्यतिरिक्त तुमच्या मालाचे दर जर दुसऱ्या मालाशी स्पर्धा करणारे असतील तर तुम्हीला टेंडर मिळण्याची शक्यता जास्त असते. सेवा पुरवण्यासाठी काही तांत्रीक ज्ञान असणे फायद्याचे ठरू शकते.

याशिवाय एमएसएमई (MSME)साठी  रेल्वे  खाते एक मोठा निर्णय घेत आहे. रेल्वेच्या कोणत्याही टेंडरवर येणाऱ्या खर्चातील २५ टक्क्यांच्या खरेदीवर एमएसएमई ला १५ टक्क्यांपर्यंत प्राथमिकता दिली जाईल. तसेच, छोट्या उद्योगांना विविध प्राकारचे शुल्क भरण्यातही सवलत दिली जाणार आहे. 

दुसऱ्यांदा रजिस्ट्रेशन करायची गरज नाही

तुम्ही जर पूर्वीच रेल्वेत किंवा रेल्वेशी संलग्न एखाद्या संस्थेत माल पाठवण्यासाठी रजिस्ट्रेशन केलेले असेल तर, तुम्हाला परत एकदा रजिस्ट्रेशन करायची गरज नाही. एकदा रजिस्ट्रेशन झाल्यास लागलीच तुम्ही उद्योगाला सुरूवात करू शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी