IRCTC's new luggage rule: भारतीय रेल्वेने सामानावर घातली मर्यादा, पाहा मार्गदर्शक तत्त्वे आणि बुकिंग कसे करायचे...

IRCTC Rule : भारतीय रेल्वे मंत्रालयाने (Ministry of Railways) नुकतेच नवीन सामान नियम (new luggage rule) लागू केले आहेत. या नव्या नियमानुसार प्रवाशांना परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा जास्त सामान घेऊन जायचे असेल तर त्यासाठी मोठा दंड भरावा लागणार आहे. रेल्वेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रवासाच्या वर्गानुसार प्रवासी रेल्वेच्या डब्यात 40 ते 70 किलो वजनाचे मोठे सामान घेऊन जाऊ शकतात. तुम्ही बुकिंग न करता जादा सामान घेऊन जात असल्याचे आढळल्यास, तुम्हाला आता मानक किंमतीच्या सहापट पैसे द्यावे लागतील.

IRCTC's new luggage rule
रेल्वेचा सामानासंदर्भातील नवा नियम 
थोडं पण कामाचं
  • भारतीय रेल्वेचा नवा नियम
  • रेल्वेने सामानावर घातली मर्यादा
  • पाहा कोणत्या डब्यातून किती सामान नेता येणार

Indian Railways update : नवी दिल्ली : भारतीय रेल्वे मंत्रालयाने (Ministry of Railways) नुकतेच नवीन सामान नियम (new luggage rule) लागू केले आहेत. या नव्या नियमानुसार  प्रवाशांना परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा जास्त सामान घेऊन जायचे असेल तर त्यासाठी मोठा दंड भरावा लागणार आहे. रेल्वेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रवासाच्या वर्गानुसार प्रवासी रेल्वेच्या डब्यात 40 ते 70 किलो वजनाचे मोठे सामान घेऊन जाऊ शकतात. तुम्ही बुकिंग न करता जादा सामान घेऊन जात असल्याचे आढळल्यास, तुम्हाला आता मानक किंमतीच्या सहापट पैसे द्यावे लागतील. याशिवाय जादा सामान असल्यास प्रवाशांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ शकते. किमान सामान शुल्क 30 रुपये आहे. आयआरसीटीसीच्या सामानाच्या मर्यादेसंदर्भातील नव्या मर्यादा आणि मार्गदर्शक तत्वे जाणून घ्या.(Indian Railway issues new rule & guidelines for luggage)

अधिक वाचा : First private train in India : रेल्वेच्या इतिहासातील महत्त्वाची घटना! भारतातील पहिली खाजगी ट्रेन कोईम्बतूर येथून शिर्डीसाठी रवाना

वेगवेगळ्या कोचमधील मर्यादा

भारतीय रेल्वेवरील सामानाचे शुल्क तुम्ही प्रवास करत असलेल्या कोचच्या म्हणजे डब्याच्या प्रकारावर आधारित आहे. तुम्ही एसी फर्स्ट क्लासमध्ये प्रवास केल्यास तुम्ही 70 किलोपर्यंत सामान आणू शकता. तर एसी सेकंड क्लासने प्रवास केल्यास ५० किलो नेऊ शकता आणि जर तुम्ही एसी थर्ड क्लासमध्ये प्रवास केलात तर 40 किलो नेता येणार आहे. स्लीपर क्लाससाठी 40 किलो आणि द्वितीय श्रेणीसाठी सामानाच्या वजनाची मर्यादा 35 किलो आहे.

अधिक वाचा : Gold-Silver Rate Today, 17 June 2022: जून महिना सुगीचा! सोन्यातील घसरण सुरूच, चांदीही उतरली, पाहा काय आहे भाव...

सामान कसे बुक करायचे?

प्रवाशाने नियोजित प्रस्थानाच्या किमान अर्धा तास आधी बुकिंग स्टेशनच्या सामान कार्यालयात पोचले पाहिजे. तुम्ही तुमची तिकिटे ऑर्डर करता तेव्हा तुम्ही सामान आरक्षित देखील करू शकता. रेल्वे मंत्रालयाने लोकांना शक्य तितक्या कमी सामानासह प्रवास करण्याची शिफारस केली आहे.

याचबरोबर आयआरसीटीसीने तिकिट बुकिंग संदर्भात एक नवीन सेवा सुरू केली आहे. त्यामुळे प्रवाशांना कन्फर्म तिकिट मिळणे सोपे ठरणार आहे. तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल आणि तुम्हाला नेहमी रेल्वे तिकिट बुक करण्याची आवश्यकता भासत असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता तुम्हाला रेल्वे तिकिटासाठी (Railway Ticket) कुठेही जाण्याची गरज नाही आणि एजंटचीही गरज भासणार नाही. रेल्वेने प्रवाशांसाठी खास सुविधा सुरू केली आहे. तत्काळ तिकिटांसाठी रेल्वेने आता नवीन अॅप म्हणजे आयआरसीटीसी तत्काल तिकिट अॅप ( IRCTC Tatkal Ticket App)लाँच केले आहे. हे अॅप फक्त आयआरसीटीसीच्या (IRCTC) वेबसाइटवर उपलब्ध आहे. या अॅपद्वारे तुम्ही तुमच्या घरच्या आरामात क्षणार्धात तत्काळ तिकिटे बुक करू शकता. यामध्ये तुम्हाला कोणतेही अतिरिक्त पेमेंट करावे लागणार नाही.

अधिक वाचा : CNG Home Delivery : फोन करा आणि घरबसल्या मिळवा सीएनजी

अनेकवेळा असे घडते की, रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अचानक प्रवास करावा लागतो. मात्र अचानक ट्रेनमध्ये कन्फर्म तिकीट मिळणे अवघड झाले आहे. या प्रकरणात, तुम्ही एकतर एजंटशी संपर्क साधा किंवा तत्काळ तिकिटासाठी प्रयत्न करा. पण तत्काळ तिकीट मिळवणेही सोपे नाही. अशा स्थितीत रेल्वेच्या या सेवेमुळे सर्वसामान्यांची सोय होणार आहे. IRCTC च्या प्रीमियम भागीदाराकडून कन्फर्म तिकिट या नावाने हे अॅप दाखवले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी