IRCTC Destination Alert Service : आता प्रवाशांना स्टेशन सुटण्याची चिंता न करता झोपता येणार, रेल्वेने सुरू केली वेकअप अलर्ट सुविधा...

IRCTC Update : भारतीय रेल्वे (Indian Railway)आपल्या प्रवाशांसाठी सातत्याने चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्नशील असते. रेल्वे प्रवाशांच्या गरजा ओळखून नवनवीन सुविधा सुरू करत असते. आता प्रवाशांसाठी रेल्वेने एक जबरदस्त सुविधा सुरू केली आहे. प्रवाशांना आता स्टेशन चुकण्याची चिंता न करता ट्रेनमध्ये झोपता येणार आहे. लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी रेल्वेने वेकअप अलर्ट सुविधा (Destination alert service) सुरू केली आहे. प्रवाशाला ज्या स्टेशनवर उतरायचे आहे ते स्टेशन येण्याच्या 20 मिनिटे आधी माहिती दिली जाईल.

IRCTC Destination alert service
आयआरसीटीसी डेस्टिनेशन अलर्ट सेवा  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • भारतीय रेल्वेने सुरू केली नवी जबरदस्त सुविधा
  • आयआरसीटीसीने सुरू केली डेस्टिनेशन अलर्ट वेकअप अलार्म सुविधा
  • आता रेल्वे प्रवासात झोपा बिनधास्तपणे

Indian Railways New service : नवी दिल्ली : भारतीय रेल्वे (Indian Railway)आपल्या प्रवाशांसाठी सातत्याने चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्नशील असते. रेल्वे प्रवाशांच्या गरजा ओळखून नवनवीन सुविधा सुरू करत असते. आता प्रवाशांसाठी रेल्वेने एक जबरदस्त सुविधा सुरू केली आहे. प्रवाशांना आता स्टेशन चुकण्याची चिंता न करता ट्रेनमध्ये झोपता येणार आहे. लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी रेल्वेने वेकअप अलर्ट सुविधा म्हणजेच डेस्टिनेशन अलर्ट सेवा (Destination alert service) सुरू केली आहे. या अंतर्गत, प्रवाशाला त्याला ज्या स्टेशनवर उतरायचे आहे ते स्टेशन येण्याच्या 20 मिनिटे आधी याची माहिती दिली जाईल. आयआरसीटीसीने सुरू केलेल्या या भन्नाट सुविधेमुळे अनेक प्रवाशांना मोठाच दिलासा मिळणार आहे. तुम्ही आता रेल्वेने प्रवास करताना निर्धास्तपणे झोपू शकणार आहात. (Indian Railway starts Destination alert service for passengers who are worried about missing the station)

अधिक वाचा : EPFO Update: मोठी बातमी! या तारखेला तुमच्या पीएफ खात्यात जमा होणार पैसे, जाणून घ्या कसे तपासायचे

रेल्वे प्रवासात धोपा बिनधास्तपणे

आपल्या प्रवाशांना चांगली सेवा देण्याच्या प्रयत्नात आणखी एक भर म्हणून, भारतीय रेल्वेने डेस्टिनेशन अलर्ट वेकअप अलार्म सुविधा (Destination alert service) सुरू केली आहे. प्रवासादरम्यान अनेकवेळा झोपेमुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे प्रवाशांचे स्टेशन मागे राहते, स्टेशन कधी येऊन गेले ते त्यांच्या लक्षात येत नाही. किंवा अचानक स्टेशन आल्याचे लक्षात आल्यावर प्रवासी डब्यातून घाईघाईन उड्यादेखील मारतात. रात्रीच्या प्रवासात हे जास्त घडते. प्रवाशांची अनेकवेळा त्यामुळे त्रेधातिरपिट उडते. याचा अनुभव तुम्हीदेखील घेतला असेल. अनेकवेळा झोप लागल्यामुळे आपले स्टेशन निघून आले आहे आणि आपण आता खूपच पुढे आले आहोत हे लक्षात आल्यावर तर प्रवासी हवालदिल होतात. प्रवाशांच्या या अडचणींची दखल आता आयआरसीटीसीने (IRCTC) घेतली आहे. त्यामुळे रेल्वेने आता डेस्टिनेशन अलर्ट वेकअप अलार्म सुविधा सुरू केली आहे.

अधिक वाचा : PM Kisan Update: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पीएम किसानसाठीची eKYC साठी मुदत सरकारने वाढवली, ही आहे नवीन अंतिम मुदत

रेल्वेच्या वतीने आयव्हीआरएसच्या माध्यमातून 139 क्रमांकाच्या चौकशी सेवेवर अलार्म सेवा सुरू करण्यात आली आहे. प्रवासी चौकशी प्रणाली क्रमांक 139 वर अलर्टची सुविधा मागू शकतात. ही सुविधा घेणाऱ्या प्रवाशाला 20 मिनिटे अगोदर कॉल करून त्याला ज्या स्टेशनवर उतरायचे आहे त्या स्टेशनविषयी माहिती दिली जाते.

ही डेस्टिनेशन अलर्ट सुविधा घेण्याची प्रक्रिया 

रेल्वेच्या म्हणण्यानुसार, यासाठी, प्रवाशाला प्रथम IRCTC च्या भागीदार उपक्रम IRCTC च्या मोबाइल नंबर 139 वरून कॉल किंवा मेसेज करावा लागेल. कॉल आल्यावर भाषा निवडावी लागते. त्यानंतर डेस्टिनेशन अलर्टसाठी आधी 7 नंबर आणि नंतर 2 नंबर दाबावे लागतील. त्यानंतर प्रवाशांकडून 10 अंकी पीएनआर क्रमांक विचारला जाईल. त्यानंतर पीएनआर नंबर डायल केल्यानंतर खात्री करण्यासाठी 1 डायल करावा लागेल. या प्रक्रियेनंतर, सिस्टम PNR नंबरची पडताळणी करेल आणि प्रवाशाला ज्या स्टेशनवर उतारयाचे आहे त्यासाठी वेकअप अलर्ट फीड करेल. यानंतर, पुष्टीकरणाचा एसएमएस मोबाइलवर येईल.

अधिक वाचा : MHADA lottery : पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये लवकरच म्हाडाची लॉटरी, सर्वसामान्यांसाठी 4744 नवीन घरं...

इतके शुल्क भरावे लागेल

ज्या अंतर्गत प्रवाशाला ज्या स्टेशनवर उतरायचे आहे ते येण्याच्या 20 मिनिटे आधी मोबाईलवर वेकअप कॉल येईल. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशाला प्रति अलर्ट 3 रुपये एसएमएस शुल्क आकारले जाईल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की सध्या, आयआरसीटीसीने (IRCTC) ही सुविधा रात्री 11 ते सकाळी 7 या वेळेत उपलब्ध करून दिली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी