Indian Railways: रेल्वेने प्रवाशांसाठी सुरू केली नवी स्लीपिंग पॉड्सची सुविधा, फोटो पाहूनच व्हाल खूश

Railway Sleeping Pods : भारतीय रेल्वेकडून (Indian Railway) प्रवाशांच्या सुविधांवर सातत्याने काम केले जाते आहे. लांबच्या प्रवासाला कंटाळलेल्या प्रवाशांसाठी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT)रेल्वे स्थानकावर नवीन सुविधा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर स्टेशनवर उतरल्यानंतर प्रवाशांना हॉटेल शोधण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही. रेल्वे प्रवाशांसाठी स्लीपिंग पॉड्सची (Sleeping Pods) सुविधा सुरू केली आहे.

Indian Railways new facility
भारतीय रेल्वेची नवी खास सुविधा 
थोडं पण कामाचं
  • मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT)रेल्वे स्थानकावर नवीन सुविधा सुरू करण्यात आली
  • रेल्वेने स्लीपिंग पॉड्सची सुविधा प्रवाशांसाठी सुरू केली
  • आता स्टेशनवर उतरल्यानंतर प्रवाशांना हॉटेल शोधण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही.

Indian Railways Sleeping Pods : नवी दिल्ली : भारतीय रेल्वेकडून (Indian Railway) प्रवाशांच्या सुविधांवर सातत्याने काम केले जाते आहे. लांबच्या प्रवासाला कंटाळलेल्या प्रवाशांसाठी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT)रेल्वे स्थानकावर नवीन सुविधा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर स्टेशनवर उतरल्यानंतर प्रवाशांना हॉटेल शोधण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही. रेल्वे प्रवाशांसाठी स्लीपिंग पॉड्सची (Sleeping Pods) सुविधा सुरू केली आहे. रेल्वेने सुरू केलेली सुविधा अशा प्रवाशांसाठी अतिशय खास आहे, जे अनेकदा एका शहरातून दुसऱ्या शहरात जातात आणि हॉटेल्स इत्यादींमध्ये राहतात. रेल्वेने सुरू केलेली ही नवी सुविधा काय आहे आणि तिचे वैशिष्ट्ये काय आहेत ते जाणून घेऊयात.(Indian Railway starts sleeping pods facility for passengers)

अधिक वाचा : Rupee at all-time low : रुपयाची घसरगुंडी थांबेना! पहिल्यांदाच पोचला 80 रुपये प्रति डॉलरच्या ऐतिहासिक नीचांकीवर

मुंबईत दुसऱ्यांदा सुरू झाली स्लीपइंड पॉडची सुविधा (Sleeping Pods)

भारतीय रेल्वेने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकावर प्रवाशांसाठी स्लीपिंग पॉड्सची सुविधा सुरू केली आहे. यापूर्वी 17 नोव्हेंबर 2021 रोजी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर प्रवाशांसाठी पॉड हॉटेल सुरू करण्यात आले होते. अशाप्रकारे, मुंबईत सुरू झालेली ही दुसरी स्लीप पॉड सेवा आहे.

अधिक वाचा : Gautam Adani : बिल गेट्सच्या 20 अब्ज डॉलरच्या देणगीनंतर गौतम अदानी बनले जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती

स्लीपिंग पॉड्समध्ये राहण्यासाठी लहान खोल्या आहेत

रेल्वेने दिलेल्या माहितीत, आरामदायी आणि किफायतशीर मुक्कामाचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय रेल्वेने हा पुढाकार घेतल्याचे सांगण्यात आले. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीही त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर या स्लीपिंग पॉडचे काही फोटो शेअर केले आहेत. वास्तविक, तुमच्या माहितीसाठी हे स्लीपिंग पॉड्स म्हणजे प्रवाशांना राहण्यासाठीच्या लहान खोल्या आहेत. त्यांना कॅप्सूल हॉटेल्स असेही म्हणतात.

पॉड हॉटेल या सुविधांनी सुसज्ज आहे

रेल्वे स्थानकावर असलेल्या वेटिंग रूमच्या तुलनेत त्यांचे भाडे कमी आहे. मात्र येथे प्रवाशांना त्यांच्या गरजेनुसार सुविधा मिळतात. यामध्ये एअर कंडिशनर रूममध्ये राहण्याच्या सुविधेसोबतच मोबाईल फोन चार्जिंग, लॉकर रूम, इंटरकॉम, डिलक्स बाथरूम आणि टॉयलेट इत्यादी अनेक सुविधा उपलब्ध आहेत.

अधिक वाचा : GST rate hike : जीएसटी दरात वाढ झाल्याने, काय महाग झाले आणि काय स्वस्त...पाहा यादी

40 स्लीपिंग पॉड्सपैकी 4 फॅमिली पॉड्स आहेत

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसएमटी) मुख्य मार्गावर रेल्वेने वेटिंग रुमजवळ एक नवीन स्लीपिंग पॉड हॉटेल सुरू केले आहे. त्याचे नाव नमः स्लीपिंग पॉड्स आहे. सीएसएमटीवर असलेल्या या स्लीपिंग पॉडमध्ये सध्या 40 स्लीपिंग पॉड्स असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. 30 सिंगल स्लीपिंग पॉड्स, 6 दुहेरी स्लीपिंग पॉड्स आणि 4 फॅमिली स्लीपिंग पॉड्स आहेत.

बुकिंगसाठी काय करावे

तुम्ही सीएसएमटी रेल्वे स्टेशनवर बनवलेले नमः स्लीपिंग पॉड्स ऑनलाइन किंवा काउंटरवर जाऊन दोन्हीही पद्धतीने बुक करू शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी