Indian Railways Update: नवरात्रीमध्ये ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेची खास सुविधा, व्हाल खूश...

IRCTC Vrat Thali : नवरात्रीमध्ये अनेकजण उपवास करतात. असे प्रवासी रेल्वेने प्रवास करतात तेव्हा त्यांच्यासमोर खाण्यापिण्याचा प्रश्न उपस्थित होतो. आता ही बाब लक्षात घेऊन रेल्वेने एक नवी सुविधा सुरू केली आहे. आयआरसीटीसी नवरात्रीच्या काळात खास उपवासाची म्हणजे व्रताची थाळी पुरवणार आहे. शिवाय यात व्हरायटीदेखील असणार आहे. 26 सप्टेंबर 2022 ते 05 ऑक्टोबर 2022 पर्यंत ही सुविधा उपलब्ध असणार आहे.

IRCTC new facility
आयआरसीटीसीची नवी सुविधा 
थोडं पण कामाचं
  • भारतीय रेल्वेची नवरात्रीमध्ये खास सुविधा
  • नवरात्रीत व्रत ठेवणाऱ्यांना आता रेल्वेत मिळणार खास उपवासाची थाळी
  • पाहा कोणत्या थाळ्या असणार आणि किती किंमत असणार

IRCTC Update : नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन नवनवीन सुविधा सुरू करत असते. या सुविधा सुरू करताना रेल्वे(Indian Railway) भारतीय जनमानस, परंपरा या गोष्टीदेखील विचारात घेत असते. आता नवरात्रीचा उत्सव (navratri 2022) सुरू झाला आहे. नवरात्रीमध्ये अनेकजण उपवास करतात. ही बाब लक्षात घेऊन रेल्वेने एक नवी सुविधा सुरू केली आहे. या नवरात्रीमध्ये (navratri), जर तुम्हीही ट्रेनमध्ये प्रवास करणार असाल किंवा तुम्ही तुमचे तिकीट आधीच बुक केले असेल, तर तुमच्यासाठी एक मोठा दिलासा देणारी बाब असणार आहे. रेल्वेकडून प्रवाशांसाठी खास उपवास थाळी (Vrat Thali) उपलब्ध करून दिली जात आहे. म्हणजेच यावेळी ट्रेनमध्ये प्रवास करताना तुम्हाला खास उपवासाचे जेवण मिळणार आहे. रेल्वे विभागाने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. (Indian Railway to offer special fasting thali in navratri 2022)

अधिक वाचा :  मिशन BMC, आता मुंबईत भाजप करणार मराठी गरबा महोत्सवाचे आयोजन

रेल्वेचे ट्विट 

भारतीय रेल्वेने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, नवरात्रीच्या शुभ उत्सवानिमित्त भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी उपवासाच्या थाळीची सुविधा आणली आहे. 26 सप्टेंबर 2022 ते 05 ऑक्टोबर 2022 पर्यंत तुम्हाला ट्रेनमध्ये स्पेशल फास्टिंग मेनू मिळेल. तुम्ही कॉल करूनही ऑर्डर देऊ शकता ही सुविधा IRCTC कडून जवळपास 400 स्थानकांवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. या प्लेटच्या सोयीसाठी, प्रवासी 1323 वर कॉल करू शकतात. या नंबरवर कॉल करून तुम्ही तुमची डिनर प्लेट बुक करू शकता. बुकिंग केल्यानंतर उपवासाची स्वच्छ थाळी मिळेल.

ऑर्डर कशी द्यायची

ट्रेनमध्ये प्रवास करताना तुम्ही 'फूड ऑन ट्रॅक' अॅपवरून नवरात्री स्पेशल थाळी ऑर्डर करू शकता किंवा रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट http://ecatering.irctc.co.in वरूनही ऑर्डर करू शकता.

अधिक वाचा : Maharashtra Rain: येत्या दोन दिवसात 'या' राज्यात मुसळधार पाऊस, हवामान विभागानं दिला Yellow Alert

रेल्वेच्या उपवास थाळीची किंमत 

आयआरसीटीसीच्या या खास उपवास थाळीमध्ये तुम्हाला 4 प्रकार मिळतील. थाळीची किंमत किती असेल ते पाहूया-

  1. 99 रुपये - फळे, उपवासाची भजी, दही
  2. 99 रुपये - २ पराठे, बटाटा करी, साबुदाणा खीर
  3. 199 रुपये - 4 पराठे, 3 भाज्या, साबुदाणा खिचडी
  4. 250- पनीर पराठा, व्रत मसाला आणि आलू पराठा दिला जाईल.

अधिक वाचा : पुण्यातील PFI च्या घोषणाबाजीनंतर मनसे आक्रमक, मनसैनिकांकडून 'हर हर महादेव' आंदोलन

भारतीय रेल्वे (Indian Railway) हेच सर्वसामान्यांचे प्राधान्याचे साधन असते. लाखो लोक याचा दररोज फायदा घेतात. मात्र काही कारणास्तव अनेकवेळा ट्रेन (Train) उशीरा येतात. त्यामुळे मग अशा परिस्थितीत प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर वाट पाहण्याशिवाय पर्याय राहत नाही. जर तुमची ट्रेन नियोजित वेळापत्रकापेक्षा उशीरा धावत असेल तर IRCTC तुम्हाला जेवण आणि एक थंड पेय देते. हे जेवण तुम्हाला IRCTC कडून अगदी मोफत दिले जाते. जेव्हा ट्रेनला उशीर झालेला असतो तेव्हा प्रवाशांना IRCTC च्या कॅटरिंग पॉलिसी अंतर्गत नाश्ता आणि हलके जेवण दिले जाते. शताब्दी, राजधानी आणि दुरांतो या एक्स्प्रेस गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही सुविधा खूपच उपयुक्त ठरते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी