Railways Will Run Special train ख्रिसमस आणि नवीन वर्षाला प्रवाशांना निश्चित जागा मिळतील! रेल्वे विशेष ट्रेन चालवणार

काम-धंदा
Updated Nov 20, 2021 | 14:57 IST | टाइम्स नाऊ मराठी

Indian Railway To Run Special Trains For New Year, Christmas ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या दिवशी घरी जाणाऱ्या प्रवाशांना मडगाव ते पनवेल दरम्यान नवीन विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहे. शनिवार, २० नोव्हेंबरपासून विशेष गाड्यांसाठी सीट बुकिंग सुरू होईल. या विशेष गाड्यांमध्ये प्रवास करण्यासाठी प्रवासी तिकीट काउंटरवरून तिकीट खरेदी करू शकतात. याशिवाय तिकीट ऑनलाइनही बुक करता येणार आहे.

Indian Railway To Run Special Trains For New Year, Christmas
Railways Will Run Special train ख्रिसमस आणि नवीन वर्षाला फिरायला जाणाऱ्या प्रवाशांना निश्चित जागा मिळतील! रेल्वे विशेष ट्रेन चालवणार   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ख्रिसमस आणि नवीन वर्षाला घरी जाणाऱ्या प्रवाशांना निश्चित जागा मिळतील
  • मडगाव ते पनवेल दरम्यान नवीन विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहे
  • शनिवार, २० नोव्हेंबरपासून विशेष गाड्यांसाठी सीट बुकिंग सुरू होईल

Indian Railway To Run Special Trains For New Year, Christmas मुंबई : ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा रेल्वे प्रवाशांच्या संख्येत वाढ होणार हे नक्की. या प्रसंगी प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी IRCTC ने मध्य रेल्वेच्या सहकार्याने विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. रेल्वेच्या अधिकृत निवेदनानुसार, ख्रिसमस आणि नवीन वर्षासाठी चालवल्या जाणार्‍या विशेष गाड्यांसाठी सीट बुकींग शनिवार, 20 नोव्हेंबरपासून सुरू होईल. या विशेष गाड्यांमध्ये प्रवास करण्यासाठी प्रवासी तिकीट काउंटरवरून तिकीट खरेदी करू शकतात. याशिवाय तिकीट ऑनलाइनही बुक करता येणार आहे. 

ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त धावणाऱ्या विशेष ट्रेनचा तपशील पुढीलप्रमाणे 


गाडी क्रमांक ०१५९६, मडगाव - पनवेल विशेष गाडी

मडगाव ते पनवेल धावणारी ही विशेष गाडी दर रविवारी दुपारी ४ वाजता मडगावहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३.१५ वाजता पनवेलला पोहोचेल. मडगाव ते पनवेल दरम्यान चालवण्यात येणारी ही विशेष ट्रेन २१ नोव्हेंबर २०२१ ते २ जानेवारी २०२२ या कालावधीतच चालवली जाईल.

गाडी क्रमांक ०१५९५, पनवेल - मडगाव विशेष गाडी

परतीच्या दिशेने हीच गाडी दर सोमवारी सकाळी ६.०५ वाजता पनवेलहून सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी ६.४५ वाजता मडगावला पोहोचेल. पनवेल ते मडगाव दरम्यान ही स्पेशल रन 22 नोव्हेंबर 2021 ते 3 जानेवारी 2022 पर्यंतच चालवली जाईल.

मडगल ते पनवेल आणि नंतर पनवेल ते मडगाव या दरम्यान धावणारी ही गाडी करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, सावर्डा, चिपळूण या दरम्यान धावणार आहे. खेड प्रवासादरम्यान माणगाव आणि रोहा रेल्वे स्थानकावर थांबेल.

कोविड-19 नियमांचे पालन करावे लागेल

रेल्वेच्या निवेदनात म्हटले आहे की, ख्रिसमस आणि नवीन वर्षासाठी चालवल्या जाणार्‍या या विशेष गाड्यांबद्दल अधिक माहितीसाठी, प्रवासी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट देऊ शकतात. याशिवाय, ते NTES अॅप देखील डाउनलोड करू शकतात. या विशेष गाड्यांमधील प्रवाशांना सर्व कोविड नियमांचे पालन करावे लागेल. प्रवासादरम्यान प्रवाशांना मास्क घालावे लागतील आणि सोशल डिस्टन्सिंगचेही पालन करावे लागेल. याशिवाय प्रवाशांना वेळोवेळी हात स्वच्छ ठेवावे लागणार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी