Indian Railway MegaBlock And Cancel Trains : मुंबई : मध्य रेल्वेवर (Central Railway) रविवारी (Sunday) आज पुन्हा एकदा 14 तासांचा मेगाब्लॉक (Mega block) घेण्यात येत आहे. हा मेगाब्लॉक ठाणे (Thane) आणि दिवा(Diva) दरम्यान डाऊन जलद मार्गिकेवर (Down fast lane) असणार आहे. डाऊन फास्ट मार्गिकेवर मेगा ब्लॉकची सुरुवात शनिवारी मध्यरात्रीनंतर 1 वाजून 20 मिनिटांनी होईल, तर रविवारी दुपारी 3 वाजून 20 मिनिटांपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. याचबरोबर देशभरातील 1012 इतर रेल्वे गाड्या (Trains) रद्द करण्यात आल्या आहेत. देशातील अनेक भागात थंडी आणि धुक्याने कहर केला असून, त्यामुळे गाड्या सतत रद्द केल्या जात आहेत.
दरम्यान आज मुंबईच्या दिशेने येणाऱ्या अप फास्ट मार्गिकेवर दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी सुरू होईल आणि 2 वाजून 30 मिनिटांनी संपेल. या मेगा ब्लॉकच्या दरम्यान अप आणि डाऊन दिशेला धीम्यामार्गीकेवर लोकल धावतील. मेगा ब्लॉकच्या दरम्यान ठाणे स्टेशनच्या दोन नंबर प्लॅटफॉर्मवर एक्सप्रेस आणि मेल गाड्या थांबणार नाहीत, असं मध्य रेल्वेनं सांगितलं आहे. रविवार, 23 जानेवारी रोजी मध्य रेल्वे ठाणे आणि दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान डाऊन फास्ट मार्गावर 14 तासांचा पायाभूत सुविधांसाठी ब्लॉक करण्यात येत आहे. या दरम्यान ठाणे-दिवा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर 2 तासांचा पायाभूत सुविधा ब्लॉक आहे. जुनी लाईन सध्याच्या फास्ट लाईनशी जोडण्यासाठी आणि ठाणे-दिवा 5व्या आणि 6व्या लाईनच्या संदर्भात क्रॉसओव्हर सुरू करण्यासाठी हे केले जात आहे.
मध्य रेल्वेवरील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामांसाठी आतापर्यंत अनेक मोठे जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आले आहेत. मात्र अजूनही दोन मेगाब्लॉक शिल्लक असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले आहे. यापैकी पहिला मेगा ब्लॉक येत्या 22 आणि 23 जानेवारीला घेण्यात येईल. तर दुसरा मेगाब्लॉक हा 72 तासांचा असेल, जो फेब्रुवारीच्या 4 ते 6 तारखेच्या दरम्यान घेण्यात येण्याची शक्यता आहे. या दोन मेगाब्लॉकनंतर पाचवी आणि सहावी मार्गिका कार्यन्वित होईल, असंही एमआरव्हीसीनं सांगितलं आहे. मुंबईच्या या स्थितीबरोबर देशात वाहतूक करणाऱ्या इतर रेल्वे गाड्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत. थंडी आणि धुक्यांमुळे या रद्द करण्यात आल्या आहेत. अनेक गाड्यांचे वेळापत्रक बदलले जात आहे, तर काही वळवल्या जात आहेत. तुम्ही ट्रेनने प्रवास करणार असाल तर त्याआधी जाणून घ्या तुमच्या ट्रेनची स्थिती काय आहे. आज १०१२ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 8 गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे, तर 10 गाड्या वळवण्यात आल्या आहेत.
रेल्वेने आज कोणत्या गाड्या रद्द केल्या आहेत. त्याबद्दल जाणून घेण्यासाठी वेबसाइट https://enquiry.indianrail.gov.in/mntes किंवा तुम्ही NTES अॅपची मदत घेऊ शकता. जिथे तुम्हाला ट्रेन नंबर टाकून ट्रेनची संपूर्ण माहिती मिळेल. याशिवाय, तुम्ही पूर्ण किंवा अंशतः रद्द केलेल्या गाड्यांची यादी देखील पाहू शकता.