Indian Railway Rule | रेल्वेचा नवा नियम, मोठ्या आवाजातील संगीत, मोठ्याने बोलणे यावर बंदी, नाहीतर दंड...

Loud Music Ban : आता यापुढे प्रवाशांना डब्यात मोठ्या आवाजाचा त्रास होणार नाही. भारतीय रेल्वेद्वारे मोठ्या आवाजात संगीत (Loud Music)आणि मोठ्या आवाजात बोलण्यावर (Loud Talking)बंदी घालून घातली आहे. जो प्रवासी मोठ्याने बोलताना किंवा मोठ्या आवाजात संगीत वाजवताना पकडला जाईल त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. याशिवाय प्रवाशांची गैरसोय झाल्यास रेल्वे कर्मचारी जबाबदार असतील.

Indian Railways bans loud music
रेल्वेचा नवा नियम, मोठ्या आवाजातील संगीतावर बंदी 
थोडं पण कामाचं
  • मोठ्या आवाजात संगीत आणि फोनवर मोठ्याने बोलण्याची परवानगी नाही
  • रेल्वे कर्मचारी प्रवाशांना नियमांचे पालन करण्याची सूचना देतील
  • नियम मोडल्यास रेल्वे कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल

Railway Rule update : नवी दिल्ली :  प्रवाशांसाठी (Passengers) प्रवास अधिक आरामदायी आणि सुखकर करण्यासाठी भारतीय रेल्वेने (Indian Railways) नवीन नियम तयार केले आहेत. आता यापुढे प्रवाशांना डब्यात मोठ्या आवाजाचा त्रास होणार नाही. भारतीय रेल्वेद्वारे मोठ्या आवाजात संगीत (Loud Music) आणि मोठ्या आवाजात बोलण्यावर (Loud Talking) बंदी घालून घातली आहे. जो प्रवासी मोठ्याने बोलताना किंवा मोठ्या आवाजात संगीत वाजवताना पकडला जाईल त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. याशिवाय प्रवाशांची गैरसोय झाल्यास रेल्वे कर्मचारी जबाबदार असतील. यासंदर्भात अनेक तक्रारी रेल्वे मंत्रालयाकडे (Railway Ministry) आल्याने हा नियम लागू करण्यात आला आहे. (Indian Railways bans loud music, loud talking on trains, imposes fine)

रेल्वे कर्मचारी ठेवतील लक्ष

प्रवाशांना कोणतीही गैरसोय होऊ नये याची खात्री करण्यासाठी, आरपीएफ, तिकीट तपासक, कोच अटेंडंट आणि केटरिंगसह रेल्वे कर्मचारी, प्रवाशांना सुव्यवस्था आणि सभ्य सार्वजनिक वर्तन राखण्यास सांगण्याची जबाबदारी असेल. एका अहवालानुसार, पश्चिम रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अहवालानुसार, रेल्वेने एक विशेष मोहीम राबवली, ज्यामध्ये ऑनबोर्ड रेल्वे कर्मचार्‍यांनी प्रवाशांना इयरफोनशिवाय संगीत ऐकणे किंवा मोठ्याने फोनवर बोलणे टाळण्याचे शिष्टाचारांचे पालन करण्याचे सल्ला दिले.

नियम न पाळणाऱ्या प्रवाशांवर होणार कारवाई

या व्यतिरिक्त, नवीन नियमांमध्ये असे देखील म्हटले आहे की ग्रुपमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रात्री उशिरापर्यंत बोलण्याची परवानगी दिली जाणार नाही आणि रात्री १० नंतर रात्री वगळता सर्व दिवे बंद केले जातील. नियमांचे पालन न करणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे कायद्यातील तरतुदीनुसार कडक कारवाई केली जाईल.

प्रवाशांना द्यावे लागणार स्टेशन युजर चार्ज

नव्या वर्षात रेल्वे प्रवाशांच्या (Railway passengers) खिशावरील भार वाढणार आहे. लवकरच तुम्हाला ट्रेनने (Train) प्रवास करण्यासाठी ५० रुपये जास्त शुल्क द्यावे लागणार आहे. रेल्वे मंत्रालयाने (Ministry of Railway)विमानतळाप्रमाणेच विकसित केलेल्या रेल्वे स्टेशनवर विकास शुल्क म्हणजे डेव्हलपमेंट फी (Station Development Fee)आकारण्याचा निर्णय घेतला आहे. हे शुल्क प्रवाशांना युजर चार्जच्या रुपात द्यावे लागणार आहे. विमानतळाच्या धर्तीवर विकसित करण्यात आलेल्या रेल्वे स्टेशनवर आता प्रवाशांकडून युजर चार्ज लावला जाणार आहे. हे शुल्क १० ते ५० रुपयांच्या दरम्यान असणार आहे. देशभरात ४०० रेल्वे स्टेशनना आंतरराष्ट्रीय पातळीवरील सुविधाप्रमाणेच विकसित करण्याचा प्रयत्न रेल्वे विभागाकडून केला जातो आहे. यामध्ये बहुतांश रेल्वे स्टेशन हे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप प्रकारातील आहेत. गांधीनगर आणि भोपालचे रानी कमलावती रेल्वे स्टेशन याआधीच विकसित होऊन तयार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रेल्वे स्टेशनचे उद्घाटन देखील केले आहे. 

रेल्वे बोर्डाकडून प्रवाशांवर युजर चार्ज लावण्यास मंजूरी देण्यात आली आहे. वेगवेगळ्या श्रेणीमधून प्रवास करणाऱ्या सर्व लोकांवर चार्जदेखील वेगवेगळा लागणार आहे. याचा समावेश तिकिटातच केला जाणार आहे. रेल्वे मंत्रालयाच्या आदेशानुसार १० रुपयांपासून ते ५० रुपयांपर्यतचा युजर चार्ज लागणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी