Indian Railways: कन्फर्म रेल्वे तिकीट तुम्ही रद्द करताय? मग IRCTC चे हे नियम माहिती आहेत का? कसे वाचतील तुमचे पैसे

काम-धंदा
भरत जाधव
Updated Nov 23, 2021 | 16:36 IST

Indian Railways: रेल्वेचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही रेल्वेमध्ये तिकीट रिझर्व्हेशन (Train Reservation) करून प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप फायदेशीर आहे. जर तुमच्या इतर कामामुळे रिझर्व्हेशन केलेल्या तिकीटाने तुम्ही प्रवास करू शकत नसाल आणि ते तिकीट तुम्ही रद्द(Cancel) करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी फायद्याचा आहे.

Indian Railways Do you cancel train confirmation tickets
कन्फर्म रेल्वे तिकीट रद्द करताना घ्या काळजी   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • रेल्वे तिकीट रद्द करताना रेल्वे विभाग तुमच्याकडून शुल्क आकारते.
  • प्रत्येक क्लास अनुसार रेल्वे तिकीट रद्द करण्याचे नियम वेग-वेगळी असतात.
  • स्लीपर क्लासमधील कन्फर्म तिकीट रद्द करायचे असेल तर गाडी सुटण्याआधी म्हणजेच 30 मिनिट आधी तिकीट रद्द करावे.

Indian Railways: नवी दिल्ली : रेल्वेचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही रेल्वेमध्ये तिकीट रिझर्व्हेशन (Train Reservation) करून प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप फायदेशीर आहे. जर तुमच्या इतर कामामुळे रिझर्व्हेशन केलेल्या तिकीटाने तुम्ही प्रवास करू शकत नसाल आणि ते तिकीट तुम्ही रद्द(Cancel) करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी फायद्याचा आहे.  तिकीट रद्द करण्याआधी तुम्ही रेल्वेचे काही खास नियम जाणून घेतले पाहिजे, जेणेकरून तुमचं आर्थिक नुकसान होण्यापासून वाचेल. 

तिकीट रद्द करण्याआधी तुम्ही हे लक्षात ठेवा की, रेल्वे सुटण्याआधी साधरण अर्धा तासआधी बुकिंग केलेलं तिकीट रद्द केल्याने तुमच्या तिकीटाचे पैसे मिळतील. परंतु जर 30 मिनिटापेक्षा कमी वेळ राहिला असेल तर तुम्हाला एकही दमडी मिळणार नाही. अशाच काही नियमांविषयी आपण जाणून घेणार आहोत... 

कधी आणि कुठे मिळेल परतावा?

क्लास आणि वेळेनुसार आरक्षण Cancellation Charge वेग-वेगळी आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही कन्फर्म केलेले तिकीट रद्द केल्यास तुम्हाला किती परतावा मिळेल. याची पूर्ण माहिती erail.in मधूनही मिळू शकते. erail.in च्या होम पेजवर रिफंडचं सेक्शन आहे. यातून रिफंडची पूर्ण मार्गदर्शन सांगण्यात आले आहे. येथे भेट देऊन तुम्ही सर्व माहिती प्राप्त करू शकतात. 

तिकीट रद्द करण्याचे काय आहेत नियम?  

 रेल्वे विभागानुसार, जर तुमच्याकडे कन्फर्म रेल्वे तिकीट असेल तर तुम्हाला रिझर्व्हेशन केलेलं तिकीट रद्द करण्याचं असेल तर जर चार तासपेक्षा कमी वेळ तुमच्याकडे राहिला असेल तर तुम्हाला एकही पैसा मिळणार नाही. चार तासपेक्षा अधिकचा वेळ तुमच्याकडे असेल तर तुम्हाला 50 टक्क्यापर्यंत रिफंड मिळू शकतो. म्हणजेच तिकीट रद्द करायचा असेल तर तुम्हाला वेळ डोक्यात ठेवावी लागेल.   जर तिकीट कन्फर्म आहे आणि रेल्वे सुटण्याच्या 12 तास आधी आणि 48 तास आधी तिकीट रद्द केलं तर रेल्वे प्रति प्रवाशांच्या तिकीटाच्या एकूण मुल्यातून 25 टक्के किंवा तिकीट रद्द केल्यास प्रति प्रवाशी 60 रुपयांपेक्षा जास्त शुल्क भरावे लागेल.  

सेकंड क्लास (द्वितीय श्रेणी) चे तिकीट रद्द करण्याचे नियम 

जर तुम्हाला कन्फर्म तिकीट असेल आणि रेल्वे सुटण्याच्या आधी 48 तासाआधी तिकीट रद्द करत असाल तर रेल्वे तिकीट क्लासनुसार वेग-वेगळे शुल्क आकारत असते.सेकंड क्लासचं तिकीट रद्द करायचे असेल तर प्रति प्रवाशी 60 रुपये. सेकंड क्लास स्लीपरवर 120 रुपये, एसी-3 वर 180 रुपये, एसी-5 वर 200 आणि फर्स्ट एसी एझक्यूटिव्ह क्लासवर 240 रुपये शुल्क आकारले जाते.जर तुम्ही स्लीपर क्लासमध्ये रिझर्व्हेशन केले असेल तर आणि तुमचं तिकीट वेटिंग लिस्टमध्ये असेल तर रेल्वे गाडी सुटण्याआधी म्हणजेच 30 मिनिट आधी रेल्वे तिकीट रद्द करावे लागेल. 30 मिनिटाआधी तिकीट रद्द केले तर  रेल्वे प्रति यात्री 60 रुपये अशा दराने शुल्क वसूल करत असते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी