Indian Railways | पुढील ७ दिवस सहा तासांसाठी बंद राहणार तिकिट बुकिंगशी संबंधित या रेल्वे सेवा

Indian Railways | रेल्वे मंत्रालयाने रविवारी यासंदर्भात माहिती देताना म्हटले आहे की प्रवांशाशी निगडीत सेवा पुन्हा सुरळीत करण्यासाठी पॅसेंजर रिझर्व्हेशन सेवा म्हणजे तिकिट रिझर्व्हेशन सेवा, करन्ट बुकिंग, कॅन्सेलेशन, चौकशी इत्यादी सेवा पुढील सात दिवसांसाठी म्हणजे १४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून २१ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यतच्या कालावधीत रात्री ६ तासांसाठी उपलब्ध असणार नाहीत. रेल्वे मंत्रालयाने सांगितले की रात्री ११:३० वाजेपासून ते सकाळी ५:३० वाजेपर्यत ६ तासांसाठीच्या कालावधीत पॅसेंजर रिझर्व्हे

Indian Railways
भारतीय रेल्वे सेवा 
थोडं पण कामाचं
  • रेल्वे प्रशासनाने रेल्वे प्रवाशांसाठी (Railway passengers) एक महत्त्वाची सूचना जाहीर केली
  • १४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून २१ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यत म्हणजेच एक आठवड्यासाठी तिकिट बुकिंग (Ticket Booking), चौकशी आणि रिझर्व्हेशनशी (Railway reservation)निगडीत सर्वच सेवा बंद राहणार
  • रात्री ११:३० वाजेपासून ते सकाळी ५:३० वाजेपर्यत ६ तासांसाठीच्या कालावधीत पॅसेंजर रिझर्व्हेशन सेवा बंद

Indian Railways | नवी दिल्ली :  रेल्वे मंत्रालयाने (Ministry of Railways) रेल्वे प्रवाशांसाठी (Railway passengers) एक महत्त्वाची सूचना जाहीर केली आहे. पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टमशी (PRS services)निगडीत ही सूचना आहे. रेल्वे मंत्रालयाने ही माहिती दिली आहे की १४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून २१ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यत म्हणजेच एक आठवड्यासाठी तिकिट बुकिंग (Ticket Booking), चौकशी आणि रिझर्व्हेशनशी (Railway reservation)निगडीत सर्वच सेवा बंद राहणार आहेत. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार प्रवासी सेवांना सुरळीत करण्यासाठी आणि कोरोना (Corona Pandemic)आधीच्या स्थितीत टप्प्या टप्प्याने आणण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. (Indian Railways | For next 7 days Railways PRS services wil be down for 6 hours daily)

सहा तासांसाठी पीआरएस सेवा बंद

रेल्वे मंत्रालयाने रविवारी यासंदर्भात माहिती देताना म्हटले आहे की प्रवांशाशी निगडीत सेवा पुन्हा सुरळीत करण्यासाठी पॅसेंजर रिझर्व्हेशन सेवा म्हणजे तिकिट रिझर्व्हेशन सेवा, करन्ट बुकिंग, कॅन्सेलेशन, चौकशी इत्यादी सेवा पुढील सात दिवसांसाठी म्हणजे १४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून २१ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यतच्या कालावधीत रात्री ६ तासांसाठी  उपलब्ध असणार नाहीत. रेल्वे मंत्रालयाने सांगितले की रात्री ११:३० वाजेपासून ते सकाळी ५:३० वाजेपर्यत ६ तासांसाठीच्या कालावधीत पॅसेंजर रिझर्व्हेशन सेवा उपलब्ध असणार नाहीत. अर्थात या पीआरएस सेवेव्यतिरिक्त इतर सर्व चौकशी सेवा सुरू राहणार आहेत.

ट्रेनवरून काढण्यात आला स्पेशल चा टॅग

कोरोना महामारीच्या संकटकाळात विस्कळीत झालेली रेल्वे सेवा आता हळूहळू पूर्वीप्रमाणेच सुरळीत होते आहे. रेल्वे प्रशासन यासाठीदृष्टीने वेगाने पावले उचलते आहे. याच दिशेने आणखी एक पाऊल उचलताा भारतीय रेल्वेने ट्रेनचे स्पेशल स्टेटसदेखील रद्द केले आहे. आता रेल्वेगाड्यांवर जुने नंबर दिसणार आहेत आणि जुन्या भाड्यानेच प्रवास उपलब्ध करून दिला जाणार आहे. आता ट्रेनच्या नंबरवरून '0' काढला जाणार आहे आणि सर्व ट्रेन कोरोना आधीच्याच नंबरनुसार धावणार आहेत. रेल्वे प्रशासनाने आता मेल आणि एक्सप्रेस ट्रेनवरून स्पेशल टॅग काढण्याचा आणि कोरोना महामारी आधीचेच भाडे लागू करण्याचा आदेश शुक्रवारी दिला आहे.

रेल्वेगाड्या रद्द

भारतीय रेल्वे १ डिसेंबर २०२१ ते २६ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत धावणार असलेल्या सहा जोडी गाड्या रद्द करणार आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनाने थंडीच्या दिवसांत निर्माण होणाऱ्या तांत्रिक अडचणींचे कारण देत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात दरम्यान सहा जोडी गाड्या रद्द करणार असल्याचे जाहीर केले. तसेच काही गाड्यांच्या मार्गात बदल केला आहे. पश्चिम रेल्वेने १ डिसेंबर २०२१ ते २६ फेब्रुवारी २०२२ पर्यंत वांद्रे, अहमदाबाद, वलसाड, उज्जैन येथून येणाऱ्या किंवा जाणाऱ्या बारा गाड्या रद्द केल्या आहेत. 

मागील वर्षी कोरोना महामारी लक्षात घेता अनावश्यक प्रवासी कमी करण्यासाठी भारतीय रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांसहीत अनेक श्रेणीच्या लोकांना कन्सेसशनल तिकिटे देणे थांबवले होते. रेल्वेने हे देखील म्हटले होते की ज्येष्ठ नागरिकांसाठी देण्यात आलेल्या सुविधा मागे घेण्यात आल्या होत्या. कोरोना महामारीचे गांभीर्य लक्षात घेता कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसंदर्भातील मृत्यूचा धोका लक्षात घेता ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या सुविधा मागे घेण्यात आल्या होत्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी