Indian Railways | प्रवाशांना मोठा दिलासा! कोरोना काळात वाढलेले भाडे कमी करण्यासंदर्भात रेल्वेमंत्र्यांची घोषणा

Train Fare | पुढील दोन-अडीच महिन्यात ट्रेनवरून स्पेशल टॅग काढला जाईल. याचबरोबर प्रवाशांना कोरोना संकटाआधीच्या व्यवस्थेनुसार कमी भाडे द्यावे लागणार आहे. रेल्वे मंत्रालय परिस्थितीवर नजर ठेवून आहे

Indian Railways
भारतीय रेल्वे 
थोडं पण कामाचं
  • लवकरच ट्रेनवरून स्पेशल टॅग हटवला जाणार
  • कोरोना काळात वाढलेले भाडे कमी करण्याची रेल्वे मंत्र्यांकडून घोषणा
  • ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि विशेष श्रेणीच्या प्रवाशांसाठी आधीप्रमाणेच रेल्वेभाड्यात सवलत दिली जाणार

Train Fare | नवी दिल्ली: रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Railway Minister Ashwini Vaishnav) यांनी लवकरच ट्रेनवरून स्पेशल टॅग हटवण्याची आणि वाढलेले भाडे कमी करण्याची घोषणा केली आहे. मंगळवारी ओडिशामधील (Odisha)झारसुगुडा दौऱ्यावर असताना रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की कोरोना महामारीचे (Corona Pandemic) संकट कमी होत असतानाच आता रेल्वे गाड्यांची वाहतुकदेखील सुरळीत होते आहे. पुढील दोन-अडीच महिन्यात ट्रेनवरून स्पेशल टॅग (Special Tag on Train) काढला जाईल. याचबरोबर प्रवाशांना कोरोना संकटाआधीच्या व्यवस्थेनुसार कमी भाडे (Reduction in Railway Fare) द्यावे लागणार आहे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि विशेष श्रेणीच्या प्रवाशांसाठी आधीप्रमाणेच रेल्वेभाड्यात सवलत दिली जाणार आहे. रेल्वे मंत्रालय परिस्थितीवर नजर ठेवून आहे. रेल्वे मंत्र्यांनी दक्षिण-पूर्व रेल्वे आणि पूर्व किनाऱ्यावरील रेल्वे अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीनंतर ही घोषणा केली. (Indian Railways : Railway Minister Ashwini Vaishnav announced that soon special tag on trains will be removed & increased fare will be reduced)

झारसुगुडाला वेगळे डिव्हिजन देण्याबद्दल विचार

रेल्वेमंत्र्यांनी म्हटले की तीन रेल्वे विभागात विभागले गेलेल्या झारसुगुडाला वेगळे डिव्हिजन देण्यासाठीच्या मागणीचा किंवा याला पूर्व किनाऱ्यावरील विभागात समाविष्ट करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होते आहे. रेल्वे मंत्रालय यावर विचार करते आहे. रेल्वे मंत्री म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वेचे जे पूर्वोद्यचे धोरण ठेवले आहे त्यात ओडिशाचे स्थान प्रमुख आहे. येथील समस्या एक-एक करत सोडवल्या जात आहेत.

स्टेशन वर प्यायले चहा, लोकांशी केली चर्चा

रेल्वे मंत्र्यांनी झारसुगुडा स्टेशनवरील एका स्टॉलवर चहाचा आनंद घेतला. याचा व्हिडिओदेखील रेल्वे मंत्र्यांनी आपल्या ट्विटर अकाउंट शेअर केला आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.  रेल्वे मंत्र्यांनी सांगितले की २५,००० पेक्षा जास्त पोस्ट ऑफिसमध्ये रेल्वे तिकिटांचीदेखील विक्री होते आहे. लोक यामध्ये रस घेत आहेत. याची कक्षा आणखी वाढवण्यात येईल. त्यांनी म्हटले की पोस्टाचे भवितव्य उज्ज्वल आहे. लोकांना स्पीड पोस्ट आणि पार्सल सिस्टम आवडते आहे. अनेक नव्या योजनांद्वारे पोस्ट विभागात सुधारणा केल्या जात आहेत. अश्विनी वैष्णव हे रेल्वे मंत्रालयाबरोबरच माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स विभागाचेही मंत्री आहे.

कोरोना महामारीच्या संकटकाळात रेल्वे विभागाने परिस्थितीनुरुप आपल्या कामकाजात बदल केले होते. प्रवाशांसाठी खास ट्रेन या काळात सोडण्यात आल्या होत्या. अर्थात या परिस्थितीत रेल्वेने भाडेवाढ केली होती, त्याचबरोबर इतर सवलती कमी केल्या होत्या. मात्र आता पुन्हा रेल्वे पुर्वपदावर येते आहे आणि आधीप्रमाणेच रेल्वेभाडे आणि सवलती सुरू करण्यात येणार आहेत. भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठ्या रेल्वे जाळ्यांपैकी एक आहे. दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. सर्वसामान्य नागरिकांसाठी रेल्वेचे महत्त्व मोठे आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी