Indian Railways | रेल्वे तिकिटाचे बुकिंग करताना नक्की मिळेल लोअर बर्थ, IRCTC ने सांगितली प्रक्रिया

IRCTC : अनेकवेळा असे होते की तिकिट बुकिंग करताना ज्येष्ठ नागरिकांना आग्रह धरूनदेखील लोअर बर्थ मिळत नाही. त्यामुळे त्यांना प्रवास करताना त्रास होतो. मात्र आता भारतीय रेल्वेकडून माहिती देण्यात आली आहे की ज्येष्ठ नागरिकांना निश्चितरित्या लोअर बर्थ कसा मिळेल.

Indian Railways
भारतीय रेल्वे 
थोडं पण कामाचं
  • सणासुदीच्या काळात रेल्वे बुकिंग करणे हे अवघड गोष्ट
  • तिकिट बुकिंग करताना ज्येष्ठ नागरिकांना लोअर बर्थची आवश्यकता असते
  • रेल्वेकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी लोअर बर्थच्या बुकिंगसाठी खास तरतूद

Indian Railways | नवी दिल्ली : सणासुदीच्या मोसमात रेल्वेने (Indian Railway) प्रवास करायचा असल्यास रिझर्व्हेशन मिळते ही एक मोठी अडचण असते. मात्र आता एक पर्याय तुमच्या उपयोगी पडू शकते. भारतीय रेल्वेकडून ट्रेनमधून प्रवास करताना ज्येष्ठ नागरिकांना लोअर बर्थसाठी (Lower Birth) प्राधान्य दिले जाते. मात्र अनेकवेळा असे होते की तिकिट बुकिंग करताना ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizen) आग्रह धरूनदेखील लोअर बर्थ मिळत नाही. त्यामुळे त्यांना प्रवास करताना त्रास होतो. मात्र आता भारतीय रेल्वेकडून माहिती देण्यात आली आहे की ज्येष्ठ नागरिकांना निश्चितरित्या लोअर बर्थ कसा मिळेल. (Indian Railways: When you will get confirm booking of lower birth, IRCTC clarifies about the rule)

ज्येष्ठ नागरिकांना मिळणार लोअर बर्थ

ट्विटरवर एका प्रवाशाने भारतीय रेल्वेला प्रश्न विचारला होता की ज्येष्ठ नागरिकांना हमखास लोअर बर्थ मिळेल याची शाश्वती नसते. यावर विचार करण्यात यावा. प्रवाशाने रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनाच टॅग करत लिहिले आहे की सीटचे बुंकिंग करण्याची पद्धत काय आहे. मी तीन ज्येष्ठ नागरिकांसाठी लोअर बर्थला प्राधान्य देत तिकिट बुकिंग केली होती. तेव्हा १०२ बर्थ उपलब्ध होते. मात्र असे असूनदेखील त्यांना मिडल बर्थ, अपर बर्थ आणि साइड लोअर बर्थ देण्यात आला. यामुळे सुधारणा झाली आहे. 

IRCTC चे उत्तर

आयआरसीटीसीने ट्विटरवर या प्रश्नावर आपले स्पष्टीकरण दिले आहे. आयआरसीटीसीने उत्तर दिले आहे की महोदय लोअर बर्थ/ ज्येष्ठ नागरिक कोटा बर्थ फक्त ६० वर्षे आणि त्याहून अधिक, ४५ वर्षे त्याहून अधिक वयाची महिला यांच्यासाठी लोअर बर्थ निश्चित करण्यात आले आहे. ही तरतूद ही जेव्हा ज्येष्ठ नागरिक एकट्याने किंवा दोन जण मिळून प्रवास करत असतील त्यासाठी आहे. आयआरसीटीसीने पुढे म्हटले आहे की जर दोनपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक आणि एक ज्येष्ठ नागरिक असेल आणि दुसरा ज्येष्ठ नागरिक नसेल तर रेल्वेची ही सुविधा मिळणार नाही.

ज्येष्ठ नागरिकांसाठीची सुविधा प्रलंबित

मागील वर्षी कोरोना महामारी लक्षात घेता अनावश्यक प्रवासी कमी करण्यासाठी भारतीय रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांसहीत अनेक श्रेणीच्या लोकांना कन्सेसशनल तिकिटे देणे थांबवले होते. रेल्वेने हे देखील म्हटले होते की ज्येष्ठ नागरिकांसाठी देण्यात आलेल्या सुविधा मागे घेण्यात आल्या होत्या. कोरोना महामारीचे गांभीर्य लक्षात घेता कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसंदर्भातील मृत्यूचा धोका लक्षात घेता ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या सुविधा मागे घेण्यात आल्या होत्या.

भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी आणि चांगली सेवा पुरवण्यासाठी नेहमी विविध योजना, तरतूदी राबवत असते. रेल्वे हे आजही देशातील प्रवासाचे सर्वात महत्त्वाचे साधन आहे. रेल्वे भाडे आणि आरामदायी प्रवास लक्षात घेता आजही नागरिक रेल्वे प्रवासालाच प्राधान्य देतात. कोरोना काळात रेल्वे प्रशासनाकडून विविध तरतूदी आणि सुविधा प्रवाशांसाठी सुरू करण्यात आल्या होत्या.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी