Indian Railways | विना तिकिट देखील तुम्ही प्रवास करू शकता, पाहा रेल्वेचा हा खास नियम

Indian Railways | जर तुम्हाला अचानक प्रवास करावा लागला, तर घाबरण्याची आवश्यकता नाही. पूर्वी अशा परिस्थितीत तत्काळ तिकिटाचाच पर्याय होता. मात्र त्यातही तिकिट मिळणे सोपे नव्हते. अशा परिस्थितीत एक असा पर्याय किंवा नियमआहे ज्याचा वापर करून तुम्ही विना रिझर्व्हेशनदेखील प्रवास करू शकता.

Indian Railways rule
भारतीय रेल्वेचे खास नियम 
थोडं पण कामाचं
  • विनातिकिटदेखील तुम्ही प्रवास करू शकता
  • प्लॅटफॉर्म तिकिटाशी संबंधित नियम
  • भारतीय रेल्वेचा खास नियम

Indian Railways | नवी दिल्ली : ट्रेनने (Train) प्रवास करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. आता तुम्ही ट्रेनने विना रिझर्व्हेशनदेखील प्रवास करू शकता. जर तुम्हाला अचानक प्रवास करावा लागला, तर घाबरण्याची आवश्यकता नाही. पूर्वी अशा परिस्थितीत तत्काळ तिकिटाचाच (Tatkal Ticket Booking Rules) पर्याय होता. मात्र त्यातही तिकिट मिळणे सोपे नव्हते. अशा परिस्थितीत एक असा पर्याय किंवा नियम (Indian Railways Rules)आहे ज्याचा वापर करून तुम्ही विना रिझर्व्हेशनदेखील प्रवास करू शकता. (Indian Railways : You can travel without ticket also, check the Indian Railways rule)

प्लॅटफॉर्म तिकिटावर प्रवास (Platform Ticket Rules)

जर तुमच्याकडे रिझर्व्हेशन नसेल आणि तुम्हाला रेल्वेने प्रवास करायचा असेल तर तुम्ही फक्त प्लॅटफॉर्म तिकिट घेऊन ट्रेनमध्ये चढू शकता. तुम्ही सहजपणे तिकिट चेकरकडे जाऊन तिकिट बनवू शकता. हा नियम इंडियन रेल्वेने बनवलेला आहे. यासाठी तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकिट घेऊन लगेच तिकिट तपासणीकडे संपर्क करावा लागेल. त्यानंतर तिकिट तपासणीस तुमच्या इच्छुक स्थळापर्यतचे तिकिट तुम्हाला बनवून देईल.

सीट रिकामे नसल्यास आहे हा पर्याय

ट्रेनमध्ये सीट रिकामे नसल्यास तिकिट तपासणीस तुम्हाला रिझर्व्ह सीट देण्यास मनाई करू शकतो. मात्र तो तुम्हाला प्रवास करण्यापासून रोखू शकत नाही. तुमच्याकडे जर रिझर्वेशन नसेल तर अशा परिस्थितीत प्रवाशाकडून २५० रुपये दंडासह तुमच्या प्रवास स्थळाच्या भाड्याएवढे भाडे देऊन तिकिट बनवून घ्या. रेल्वेच्या या महत्त्वाच्या नियमाला जाणून घ्या.

प्लॅटफॉर्म तिकिट (Benefits of Platform Ticket)

प्लॅटफॉर्म तिकिटाचा वापर करून प्रवासी ट्रेनमध्ये प्रवास करू शकतात. याशिवाय प्रवाशाला त्या स्टेशनहून भाडे भरावे लागले जिथून त्याने प्लॅटफॉर्म तिकिट घेतले आहे. भाडे वसूल करताना डिपार्टर स्टेशनदेखील त्याच स्टेशनला समजले जाईल. शिवाय तुम्ही ज्या डब्यातून प्रवास करत असाल त्याच डब्याच्या श्रेणीचे भाडे द्यावे लागेल.

तुमची सीट कुठपर्यत निश्चित असते

जर तुम्ही ट्रेनचे रिझर्व्हेशन केले आहे आणि काही कारणास्तव तुम्ही ट्रेन पकडू शकला नाहीत, तर तिकिट तपासणीत पुढील दोन स्टेशनांपर्यत तुमचे सीट दुसऱ्या कोणाला अॅलॉट करू शकत नाही. म्हणजेच दोन स्टेशनापर्यत तुम्ही ट्रेनमधील आपले सीट गाठून त्यावर पुढील प्रवास करू शकता. मात्र दोन स्टेशनानंतर तिकिट तपासणीस आरएसी असणाऱ्या प्रवाशाला सीट अॅलॉट करू शकतो. हा नियमदेखील तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. 

मुंबई उपनगरीय रेल्वे प्रशासनाने कोरोना काळात स्टेशनवर कमी गर्दी व्हावी यासाठी मुद्दाम महत्त्वाच्या स्टेशनचे प्लॅटफॉर्म तिकीट दहा रुपयांवरुन वाढवून थेट ५० रुपये केले होते. कोरोना नियंत्रणात येऊ लागल्यामुळे रेल्वेने ५० रुपयांचे प्लॅटफॉर्म तिकीट पुन्हा दहा रुपये केले आहे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल या स्टेशनवर ५० ऐवजी १० रुपयांतच प्लॅटफॉर्म तिकीट मिळेल.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी