Asian Paint सोबतच 'हे' 5 स्टॉक्स तुम्हाला करु शकतात मालामाल

Share Market: गेल्या वर्षी होळीपासून ते आतापर्यंत तब्बल 38 स्टॉक्स हे मल्टिबॅगर बनले आहेत. ब्रोकरेजने आता असेच काही स्टॉक्स सांगितले आहेत जे येत्या काळात मोठा परतावा देऊ शकतात.

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

Share Market updates: भारतीय शेअर बाजारात अनेक असे स्टॉक्स आहेत ज्यांनी गुंतवणुकदारांना मोठा परतावा मिळवून दिला आहे. सेन्सेक्समध्ये गेल्यावर्षी होळी पासून ते आतापर्यंत 3.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. गुंतवणुकदारांना गेल्या एका वर्षभरात कॅपिटल गुड्स, ऑटो, एफएमसीजी, बँक आणि ऑटो स्टॉक्सच्या माध्यमातून सर्वाधिक पैसे मिळवून दिले आहेत. जाणून घेऊयात अशा काही स्टॉक्सबाबत जे येत्या काळात तुम्हाला चांगला परतावा मिळवून देऊ शकतात.

Hadged चे फाऊंडर आणि सीईओ राहुल घोष यांच्या मते, एशियन पेंट्स या स्टॉकला खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या मते, हा स्टॉक येत्या काळात 2996 रुपयांपासून ते 3150 रुपयांपर्यंत मजल मारु शकतो.

हे पण वाचा : ऑफिसमध्ये लागत असेल डुलकी तर या टिप्सने पळवा झोप

कॅनरा बँक : गुंतवणुकदारांनी कॅनरा बँकेच्या शेअर्सकडेही लक्ष द्यायला हवे. हा स्टॉक वीक्ली चार्टवर खूपच पॉझिटिव्ह दिसत आहे. 294 रुपयांच्या लेवलवर हा स्टॉक खरेदी करता येऊ शकतो. या स्टॉकसाठी 320 रुपयांचं टार्गेट दिलं आहे.

एलकेपी सिक्युरिटीजचे सिनिअर टेक्निकल अ‍ॅनलिस्ट रूपक डे यांच्या मते, एसबीआय हा स्टॉक खरेदीसाठी उत्तम आहे. गुंतवणुकदार 610 रुपयांच्या टार्गेट प्राईससह स्टेट बँकेचे शेअर्स खरेदी करु शकतात. या स्टॉकसाठी 590 रुपयांवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

हे पण वाचा : या टिप्स वापरा बोअरिंग रिलेशनशिपमध्ये येईल ताजेपणा

जिंदाल स्टील : या स्टॉकने वीक्ली टाईमफ्रेमवर पियरसिंग लाईन पॅटनर बनवला आहे. डेली चार्टवर मूविंग अ‍ॅव्हरेजच्या वर जात आहे. एक्सपर्टच्या मते या स्टॉकसाठी 630 रुपयांचं टार्गेट देण्यात आलं आहे. या स्टॉकला 570 वर रेसिस्टंट आहे. 

जियोजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे चीफ मार्केट स्ट्रॅटेजिस्ट आनंद जेम्स यांच्या मते, ओबेरॉय रिअ‍ॅलिटी या स्टॉकमध्ये 876 ते 890 दरम्यान खरेदीची चांगली संधी आहे. हा स्टॉक 940 ते 1040 रुपयांच्या टार्गेट प्राईससह खरेदी केला जाऊ शकतो.

(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. टाइम्स नाऊ मराठी या वृत्ताला दुजोरा देत नाही. वरील स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्याचा आम्ही तुम्हाला सल्ला देत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी