लॉकडाऊनमध्ये Swiggy ला मिळाल्या चिकन बिर्याणीच्या ५.५ लाख ऑर्डर्स

काम-धंदा
Updated Jul 25, 2020 | 20:55 IST | टाइम्स नाऊ मराठी

फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीने खुलासा केला आहे की देशव्यापी लॉकडाऊनदरम्यान भारतात 5.5 लाख चिकन बिर्याणीच्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत.

Swiggy food delivery boy
लॉकडाऊन काळातल्या ऑर्डर्सबद्दल स्विगीचा मोठा खुलासा  |  फोटो सौजन्य: IANS

थोडं पण कामाचं

  • फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीने फूड ऑर्डर्सबाबत खुलासा केला
  • रिपोर्टप्रमाणे दररोज रात्री आठपर्यंत सरासरी 65,000 फूड ऑर्डर्स केल्या गेल्या
  • स्विगीने जवळपास 1,20,000 बर्थडे केक डिलिव्हर केले आहेत

नवी दिल्ली: कोरोना व्हायरसच्या संकटामुळे देशव्यापी लॉकडाऊनदरम्यान भारतात स्विगीवरून 5.5 लाख चिकन बिर्याणीच्या ऑर्डर्स केल्या गेल्या आहेत. स्विगीने एका रिपोर्टमध्ये याचा खुलासा केला आहे. तसेच जवळपास 323 मिलियन कांदा आणि 56 मिलियन किलो केळीही किराणा सामान म्हणून डिलिव्हर करण्यात आली आहेत. रिपोर्टप्रमाणे दररोज रात्री आठपर्यंत सरासरी 65,000 फूड ऑर्डर्स केल्या गेल्या आहेत. सामान्यतः ही वेळ रात्रीच्या जेवणाची असते, त्यामुळे ही वेळ सर्वात व्यस्त असते.

लॉकडाऊनदरम्यान गेल्या काही महिन्यांमध्ये जवळपास 1,29,000 चॉको लाव्हा केक ऑर्डर करण्यात आले आहे. यानंतर गुलाबजाम आणि चिक बटरस्कॉच मूस केकच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. लॉकडाऊनदरम्यान स्विगीने जवळपास 1,20,000 बर्थडे केक डिलिव्हर केले आहेत. आकडेवारीनुसार, कोरोनाच्या संकटामुळे 47,000 फेस मास्कसोबत सॅनिटायझर आणि हँडवॉशच्या 73,000हून जास्त सॅनिटायझरच्या बाटल्याही डिलिव्हर करण्यात आल्या आहेत.

कंपनीकडून सांगण्यात आले आहे, ‘खाद्यपदार्थांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास जे लोक जेवण बनवत नाहीत त्यांना या बिर्याणीमुळे दिलासा मिळाला.’ यादरम्यान आम्हाला 5.5 लाख बिर्याणीच्या ऑर्डर मिळाल्या.’ यानंतर बटर नान आणि मसाला डोसा यांनी अनुक्रमे 3.35 आणि 3.31 ऑर्डर्सरह दुसरा आणि तिसरा नंबर मिळवला. रिपोर्टप्रमाणे झटपट नूडल्सची जवळपास 3,50,000 पाकिटे ऑर्डर करण्यात आली. याशिवाय स्विगीच्या ‘होप, नॉट हंगर’ या उपक्रमाने 10 कोटीपेक्षा जास्त रक्कम जमवली, ज्यातून लॉकडाऊनदरम्यान 30 लाख लोकांना जेवण पुरवण्यात आले.

सामान्यतः स्विगीला दिवसाकाठी 2.5 ते 3 मिलियन ऑर्डर्स मिळतात, पण कोरोनाच्या लॉकडाऊनच्या या काळात अनेक उपहारगृहे, हॉटेल्स बंद असल्याने आणि इतर कारणांनी ही संख्या 60-70 टक्क्यांनी कमी झाली.

जगभरात कोरोनाच्या संकटाने हाहाकार उडवला आहे. या विषाणूचा प्रसार आणि संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी संपूर्ण भारतात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. तेव्हापासून या संपूर्ण काळात उपहारगृहे, हॉटेल्स तसेच ऑनलाईन डिलिव्हरीही बंदच होती. पण हऴूहऴू आणि टप्प्याटप्प्याने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आली आणि उपहारगृहे, हॉटेल्स आणि खाद्यपदार्थ तसेच किराणा सामानाची होम डिलिव्हरीही सुरू झाली आहे. त्यामुळे घरच्या घरी आपले आवडते खाद्यपदार्थ लोकांना मिळू लागले आहेत आणि यातही लोकांनी सगळ्यात जास्त पसंती चिकन बिर्याणीला दिल्याचे स्विगी कंपनीने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार समोर येत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी