Foreign Reserves | परकी चलनसाठा बनला देशाचा मोठा आधारस्तंभ, नाहीतर झाली असती श्रीलंका, पाकिस्तानसारखी गत, पाहा कसे

RBI : रकीय चलनाच्या साठ्याची उच्च पातळी हे कोणत्याही अर्थव्यवस्थेसाठी अतिशय सकारात्मक लक्षण आहे. शेजारच्या श्रीलंकेची दिवाळखोरीची परिस्थिती निर्माण झाली कारण श्रीलंकेचा परकीय चलन साठा संपुष्टात आला होता. पाकिस्तानचीही तीच स्थिती आहे. हे टाळण्यासाठी दोन्ही देश चढ्या दराने कर्ज घेण्याच्या तयारीत आहेत. त्याचबरोबर भारतीय अर्थव्यवस्थेला साठ्यामुळे अतिरिक्त सुरक्षा मिळाली आहे.

India Foreign Reserves
भारताची परकी गंगाजळी 
थोडं पण कामाचं
  • भारताच्या परकी गंगाजळीत घट मात्र सोन्याच्या साठ्यात झाली वाढ
  • सरलेल्या आठवड्यात परकी चलनसाठा ६७ कोटी डॉलरने घसरून ६३४.२८७ अब्ज डॉलरच्या पातळीवर आला
  • या आर्थिक वर्षात देशाच्या राखीन निधीत ५ लाख कोटी रुपयांची वाढ

India Foreign Reserves | मुंबई : देशाच्या परकी गंगाजळीत (India Foreign Reserves)सरलेल्या आठवड्यात ६७ कोटी डॉलरने घसरून ६३४.२८७ अब्ज डॉलरच्या पातळीवर आला आहे. सरलेल्या आठवड्यासाठी रिझर्व बॅंकेने (RBI) जाहीर केलेल्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे.  याआधी १४ जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात, देशाचा परकीय चलन साठा (Foreign Reserves) २.२२ अब्जने वाढून ६३४.९६५ अब्ज डॉलर झाला होता. ३ सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात देशाच्या परकीय चलनाच्या साठ्याने ६४२.४५३ अब्ज डॉलर्सचा उच्चांक गाठला होता. सध्या हा साठा या पातळीच्या जवळ आहे आणि वरच्या पातळींपासून केवळ एक टक्का कमी झाला आहे. देशाचा सोन्याचा साठा मात्र वाढला आहे. रिझर्व्ह बँकेने यासंदर्भातील आकडेवारी जाहीर केली आहे. (India's Foreign Reserves this week declined to $634.287 Billion)

विक्रमी पातळीवर पोचून मग घट

देशाच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत पुन्हा एकदा घट झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २१ जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात ६७ कोटी डॉलरची घट झाली आहे. मात्र, आठवडाभरात देशातील सोन्याच्या साठ्यात वाढ झाली आहे. याआधी, १४ जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात, गंगाजळीत मोठी वाढ झाली होती, सध्या देशाचा परकीय चलन साठा त्याच्या विक्रमी उच्चांकापेक्षा फक्त एक टक्का खाली आहे. आठवडाभरात परकीय चलनाच्या साठ्यातील ४ विभागांपैकी सोने वगळता, तिन्ही विभागांमध्ये घट झाली आहे.

सोन्याच्या साठ्यात वाढ

रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आठवडाभरात सोन्याच्या साठ्यात वाढ झाली आहे आणि देशातील सोन्याचा साठा एका आठवड्यात ५६.७ कोटी डॉलरने वाढून ४०.३३७ अब्ज डॉलरच्या पातळीवर पोहोचला आहे. सोन्याच्या साठ्यात वाढ होऊनही, चलन साठ्यात घट झाल्यामुळे परकीय चलन मालमत्तेमध्ये म्हणजे फॉरेन करन्सी असेट (FCA)घट झाली, या आठवड्यात मालमत्ता १.५५ अब्ज डॉलरने घसरून ५६९.५८२ अब्ज डॉलरच्या पातळीवर आली. परकीय चलन संपत्ती डॉलरच्या अटींमध्ये दर्शविली जाते आणि त्यात युरो, पाउंड आणि येन सारख्या चलनांचाही समावेश डॉलरसह होतो. विशेष रेषांखन हक्क (SDR) आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसोबत (IMF) असलेले राखीव हक्क यामध्ये या आठवड्यात घट झाली आहे.

देशाच्या रिझर्व्हमध्ये सातत्याने वाढ 

आकडेवारीनुसार, देशाच्या राखीव निधीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या आर्थिक वर्षात त्यात ५ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. त्याचबरोबर परकीय चलनाच्या मालमत्तेत ३.१४ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे, सोन्याच्या साठ्यात ५२ हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. परकीय चलनाच्या साठ्याची उच्च पातळी हे कोणत्याही अर्थव्यवस्थेसाठी अतिशय सकारात्मक लक्षण आहे. शेजारच्या श्रीलंकेची दिवाळखोरीची परिस्थिती निर्माण झाली कारण श्रीलंकेचा परकीय चलन साठा संपुष्टात आला होता. पाकिस्तानचीही तीच स्थिती आहे. हे टाळण्यासाठी दोन्ही देश चढ्या दराने कर्ज घेण्याच्या तयारीत आहेत. त्याचबरोबर भारतीय अर्थव्यवस्थेला साठ्यामुळे अतिरिक्त सुरक्षा मिळाली आहे. तसेच, कोरोना महामारीच्या काळात, परकी चलनसाठ्याच्या जोरावरच देश रेटिंग एजन्सींचा विश्वास जिंकण्यात देखील यशस्वी ठरला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी