India Foreign Reserves | देशाचा परकी चलनसाठ्यात घसरण, १.१४ अब्ज डॉलरने घटून ६४०.८ अब्ज डॉलरवर

India Foreign Reserves | मागील आठवड्यात परकी गंगाजळीत १.९१ अब्ज डॉलरची वाढ होत ती ६४२.०१ अब्ज डॉलरवर आली होती. तर भारताच्या परदेशी चलनाच्या साठ्यात (एफसीए) (FCA)घट झाली आहे. एफसीए ८८.१ कोटी डॉलरने घटून ५७७.५८ अब्ज डॉलरवर आला आहे. यात डॉलरबरोबरच युरो, पौंड आणि येनसारख्या चलनांचा समावेश असतो. मागील काही महिन्यांपासून देशाच्या परकी चलनसाठ्यात (Foreign Reserves) सातत्याने वाढ होत होती.

India Foreign Reserves
भारताचा परकी चलनसाठा  
थोडं पण कामाचं
  • भारताच्या परदेशी चलनाच्या साठ्यात (एफसीए) (FCA)घट
  • आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसोबत असलेले विशेष रेखांकन हक्क १.७ कोटी डॉलर्सने घटून १९.२८ अब्ज डॉलरवर
  • अमेरिकेच्या चलना व्यतिरिक्त युरो, पौंड आणि येनचासुद्धा समावेश भारताच्या परकी चलनाच्या साठ्यात असतो

India Foreign Reserves | मुंबई : भारताच्या परकी गंगाजळीत (India Foreign Reserves)सरलेल्या आठवड्यात १.१४ अब्ज डॉलरची घट होत तो ६४०.८ अब्ज डॉलरच्या पातळीवर आला आहे. सरलेल्या आठवड्यासाठी रिझर्व बॅंकेने (RBI) जाहीर केलेल्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे. मागील आठवड्यात परकी गंगाजळीत १.९१ अब्ज डॉलरची वाढ होत ती ६४२.०१ अब्ज डॉलरवर आली होती. तर भारताच्या परदेशी चलनाच्या साठ्यात (एफसीए) (FCA)घट झाली आहे. एफसीए ८८.१ कोटी डॉलरने घटून ५७७.५८ अब्ज डॉलरवर आला आहे. यात डॉलरबरोबरच युरो, पौंड आणि येनसारख्या चलनांचा समावेश असतो. मागील काही महिन्यांपासून देशाच्या परकी चलनसाठ्यात 
(Foreign Reserves) सातत्याने वाढ होत होती. (India's Foreign Reserves this week declined to record $640.87 Billion)

रिझर्व्ह बॅंकेने दिलेल्या आकडेवारीनुसार फॉरेन करन्सी अॅसेट्समध्येदेखील (एफसीए) घसरण झाली आहे. परकी गंगाजळीचा हा महत्त्वाचा घटक असतो. यामध्ये अमेरिकन डॉलरबरोबरच युरो, पौंड आणि येनसारख्या चलनांचा समावेश आहे. या चलनांमध्ये झालेली वृद्धी किंवा घसरण याचा परिणाम एफसीएवर होत असतो. परकी गंगाजळीमध्ये महत्वाच्या देशांच्या चलनाच्या साठ्याचा महत्वाचा हिस्सा असतो. यात अमेरिकन डॉलर हा महत्वाचा घटक असतो. अमेरिकेच्या चलना व्यतिरिक्त युरो, पौंड आणि येनचासुद्धा समावेश भारताच्या परकी चलनाच्या साठ्यात असतो. मागील वर्षी जून महिन्यात परकी चलनसाठा पहिल्यांदाच ५०० अब्ज डॉलरवर पोचला होता.

विशेष रेखांकन हक्क

रिझर्व्ह बॅंकेने दिलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसोबत असलेले विशेष रेखांकन हक्क १.७ कोटी डॉलर्सने घटून १९.२८ अब्ज डॉलरवर पोचले आहेत. याशिवाय आंतरराष्ट्रीय नाणेनिधीबरोबर असलेले देशाचे राखीव हक्क १.४ कोटी डॉलरने घटून ५.२२ अब्ज डॉलरवर आले आहेत.

देशातील सोन्याची मागणी

सप्टेंबरमध्ये देशातील सोन्याच्या मागणीत ४७ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. सोन्याची एकूण मागणी १३९.१० टन इतकी होती. मागील वर्षी याच कालावधीत सोन्याची मागणी ९४.६० टन इतकी होती. याशिवाय दागिन्यांच्या मागणीतदेखील ५८ टक्के वाढ झाली आणि ती ९६.२० टन होती. जाणकारांच्या मते आगामी काही महिन्यात सोने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय बाजारात २,००० डॉलरवर पोचण्याची शक्यता आहे.

अर्थव्यवस्थेला परकी गंगाजळीचा आधार

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी परकी गंगाजळीचे महत्त्व मोठे आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया शेअर बाजारात येत असलेले पैसे आणि एफडीआय सातत्याने आपल्या कंटिजन्सी फंडमध्ये जमा करत असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. कोरोना महामारीच्या संकटकाळात परकी चलनसाठा भक्कम असणे आवश्यक आहे. त्यामुळे देशाच्या क्रेडिट रेटिंगवर सकारात्मक परिणाम होईल. शिवाय यामुळे आंतरराष्ट्रीय गुंतवणुकदार अधिक प्रमाणात भारतात आकर्षित होण्याची शक्यता आहे. सध्या भारतात गुंतवणुकदारांचे स्वागतच करण्यात येते आहे.

कोरोनामुळे उद्योग-धंद्यावर विपरित परिणाम झाल्याने मागील वर्षी निर्यात घटली होती. मात्र मागील तिमाहीपासून यात सुधारणा होते आहे. मागील वर्षी परकी चलनसाठ्याने विक्रमी पातळी गाठली होती. मात्र लॉकडाऊननंतर अर्थव्यवस्थेने उचल खाल्ल्यानंतर परकी चलनसाठ्यात मोठी सुधारणा झाली आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी