Edible Oil Update | इंडोनेशियाची पाम तेलाची निर्यात आजपासून बंद, अदानी-बाबा रामदेव यांची दिवाळी...

Palm Oil Market : आधीच महागाईला (Inflation) तोंड देणाऱ्या सर्वसामान्यांना आता आणखी फटका बसणार आहे. खाद्य तेलाच्या किंमतीत (Edible Oil price)वाढ होणार आहे. त्याचा फटका सर्वसामान्य माणसांना बसून त्यांचे बजेट कोलमडणार आहे. कारण इंडोनेशियाने पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. आजपासून (28 एप्रिल) इंडोनेशियाने पाम तेलावरील बंदी लागू केली आहे. इंडोनेशियाच्या या निर्णयाचा भारताला मोठा फटका बसणार आहे.

Edible Oil update
भारतात खाद्य तेल महागणार 
थोडं पण कामाचं
  • इंडोनेशियाची आजपासून पाम तेलाची निर्यातबंदी
  • भारतातील खाद्य तेलाच्या किंमती कडाडणार
  • अदानी विल्मर आणि रुचि सोया या कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत तुफान तेजी

Palm Oil Export Ban : नवी दिल्ली : आधीच महागाईला (Inflation) तोंड देणाऱ्या सर्वसामान्यांना आता आणखी फटका बसणार आहे. खाद्य तेलाच्या किंमतीत (Edible Oil price)वाढ होणार आहे. त्याचा फटका सर्वसामान्य माणसांना बसून त्यांचे बजेट कोलमडणार आहे. कारण इंडोनेशियाने पाम तेलाच्या निर्यातीवर (Indonesia banns Palm Oil Export) बंदी घातली आहे. आजपासून (28 एप्रिल) इंडोनेशियाने पाम तेलावरील बंदी लागू केली आहे.  इंडोनेशियाच्या या निर्णयाचा भारताला मोठा फटका बसणार आहे. तर दुसरीकडे खाद्य तेलाच्या कंपन्यांना मात्र मोठी कमाईची संधी मिळाली आहे.(Indonesia banned palm oil export from today, Adani-Wlimar, Ruschi stock show boom)

अधिक वाचा : टपाल विभागाच्या पेमेंट बँकेसाठी ८२० कोटींचा निधी

भारताची खाद्य तेलाची आयात

भारत हा खाद्य तेलाचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. भारत आपल्या आवश्यकतेच्या जवळपास 50 टक्के खाद्य तेल आयात करतो. भारत आपल्या गरजेच्या 50 टक्के पाम तेलाची आयात इंडोनेशियाकडूनच करतो. त्यामुळे इंडोनेशियाच्या या निर्णयाचा भारतावर प्रतिकूल परिणाम होणार आहे. इंडोनेशियामध्ये खाद्य तेलाच्या भावात वाढ झाली आहे. तेथील किंमतींचे नियंत्रण करण्यासाठी इंडोनेशियाच्या सरकारने पाम तेलाची निर्यात रोखण्याचा निर्णय घेतला आहे.

अधिक वाचा : Bank holidays : मे महिन्यात तब्बल 11 दिवस बँकांना सुट्टी, महत्त्वाचे कामे या पाच दिवसांतच मिटवा

खाद्य तेलाच्या किंमतीत वाढ

याआधीच युक्रेन आणि रशियात सुरू असलेल्या युद्धामुळे सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. रशिया आणि युक्रेन हे सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाचे सर्वात मोठे निर्यातदार देश आहेत. त्यातच आता इंडोनेशियाने पाम तेलाची निर्यात रोखली आहे. याचा विपरित परिणाम होत भारतातील खाद्य तेलाच्या किंमती कडाडण्याची शक्यता आहे.

अदानी विल्मर आणि रुचि सोया

खाद्य तेलाच्या बाजारपेठेवर अदानी विल्मर आणि रुचि सोया या दोन कंपन्यांचे वर्चस्व आहे. साहजिकच खाद्य तेलाच्या किंमतीत वाढल्याने अदानी विल्मर आणि रुचि सोया या दोन कंपन्यांना दणकून फायदा होणार आहे. अदानी विल्मर ही अदानी समूहाची कंपनी आहे. तर रुचि सोयाची मालकी बाबा रामदेव यांच्या पतंजलि आयुर्वेद लि.कडे आहे.

अधिक वाचा : Ration Card Update | रेशनकार्ड संदर्भात मोठी बातमी, लवकर करा हे काम, नाहीतर मोठे नुकसान...

अदानी विल्मलच्या शेअरमध्ये तेजी

अदानी विल्मरच्या शेअरमध्ये मागील काही दिवसांपासून सातत्याने अप्पर सर्किट लागत आहेत. शेअरमध्ये जोरदार तेजी आहे. मागील फक्त पाचच दिवसात हा शेअर 25 टक्के वाढला आहे. अदानी विल्मर कंपनीची शेअर बाजारात नोंदणी झाल्यापासूनच या शेअरच्या किंमतीत तेजी दिसून येते आहे. 

रुचि सोयाच्या शेअरचीही घोडदौड

मागील काही दिवसांपासून रुचि सोयाच्या शेअरमध्ये तेजी आहे. मागील पाच दिवसात या शेअरच्या किंमतीत 16 टक्के वाढ झाली आहे. विशेष म्हणजे रुचि सोयाकडे पामची शेती करण्यासाठी जवळपास 3 लाख हेक्टरची जमीन आहे. पाम तेलाच्या बाजारपेठेत कंपनीचा वाटा 12 टक्के इतका आहे. 

त्यामुळेच खाद्य तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्यांना मोठा दणका बसणार असला तरी अदानी आणि बाबा रामदेव यांच्या कंपन्यांची मात्र दणकून कमाई होणार आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी