Inflation | महागाईची कमाल! गरीबांपेक्षा श्रीमंत जास्त बेहाल

Inflation Effect : देशातील ग्रामीण भागासाठी महागाईदर ४.४ टक्के होता. ग्रामीण आणि शहरी भागातील मिडल इन्कम ग्रुपवर महागाईचा प्रभाव पडला आहे. शहरी भागातील गरीबांना महागाईचा जास्त दणका बसला आहे. ऑक्टोबर मध्ये किरकोळ महागाईदर वाढला आहे. कन्झ्युमर प्राइस इंडेक्स म्हणजे किरकोळ महागाईदर ४.४८ टक्के होता. तर सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाईदर ४.३५ टक्के होता. ऑक्टोबर २०२० मध्ये किरकोळ महागाईदर ७.६१ टक्क्यांवर पोचला होता.

Inflation Effect
महागाईचा दणका 
थोडं पण कामाचं
  • सर्वात श्रीमंत (Rich) लोकांना गरीबांच्या (Poor)तुलनेत महागाईचा सर्वात जास्त फटका
  • शहरी महागाई वाढण्यास मुख्य कारण पेट्रोलियम पदार्थांच्या किंमतीतील वाढ
  • ग्रामीण भागातील अन्नधान्याची महागाई कमी असल्याने एकूण महागाईचा प्रभाव तुलनेने कमी

Inflation Effect | नवी दिल्ली : क्रिसिल (Crisil) या पंतमानांकन एजन्सीने म्हटले आहे की सर्वात श्रीमंत (Rich) लोकांना गरीबांच्या (Poor)तुलनेत महागाईचा सर्वात जास्त फटका बसतो आहे. क्रिसिलच्या म्हणण्यानुसार २० टक्के सर्वात गरीब लोक अन्नधान्य, खाद्यपदार्थांवर (Food) सर्वात जास्त खर्च करतात. यामध्ये ऑक्टोबर २०२१ मध्ये घट झाली आहे. तर दुसरीकडे २० टक्के सर्वात श्रीमंत बिगर अन्न पदार्थांवर सर्वाधिक खर्च करतात. या वस्तू मागील महिन्यात महाग झाल्या आहेत. ऑक्टोबर २०२१ मध्ये महागाईदर (Inflation) वाढून  ४.५ टक्के झाला आहे. (Inflation Effect | Urban affected more badly than rural India due to inflation)

इंधनाचा मोठा फटका शहरी भागाला

एका अहवालानुसार ऑक्टोबरमध्ये शहरी महागाई वाढण्यास मुख्य कारण पेट्रोलियम पदार्थांच्या किंमतीतील वाढ हे आहे. अर्बन कमोडिटी मध्ये याचे प्रमाण ६५ टक्के आहे. कच्चे तेल, इंधन यामुळे शहरी भागातील महागाई वाढली आहे. तर ग्रामीण भागातील अन्नधान्याची महागाई कमी असल्याने एकूण महागाईचा प्रभाव तुलनेने कमी होता. सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात ग्रामीण भागात महागाईदर कमी होता.

ग्रामीण श्रीमंतांसाठी महागाईदर ४.४ टक्के

देशातील ग्रामीण भागासाठी महागाईदर ४.४ टक्के होता. ग्रामीण आणि शहरी भागातील मिडल इन्कम ग्रुपवर महागाईचा प्रभाव पडला आहे. शहरी भागातील गरीबांना महागाईचा जास्त दणका बसला आहे. ऑक्टोबर मध्ये किरकोळ महागाईदर वाढला आहे. कन्झ्युमर प्राइस इंडेक्स म्हणजे किरकोळ महागाईदर ४.४८ टक्के होता. तर सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाईदर ४.३५ टक्के होता. ऑक्टोबर २०२० मध्ये किरकोळ महागाईदर ७.६१ टक्क्यांवर पोचला होता.

ग्रामीण भागाला महागाईचा तुलनेने कमी फटका

ऑक्टोबरमध्ये ग्रामीण भागातील किरकोळ महागाईदर ४.०७ टक्के होता. तर शहरी भागासाठी हाच आकडा ५.०४ टक्के होता. सप्टेंबरमध्ये ग्रामीण भागातील महागाईदर ४.१३ टक्के होता, तर शहरी भागात महागाईदर ४.५७ टक्के होता. तर ऑक्टोबर २०२० मध्ये ग्रामीण भागात महागाईदर ७.७५ टक्के होता. शहरी भागात महागाईदर ७.३३ टक्के होता.

अन्नधान्याच्या किंमतीत वाढ

देशातील किरकोळ महागाईदर मागील वर्षी याच कालावधीत ७.६१ टक्क्यांच्या विक्रमी पातळीवर पोचला होता. तर ऑगस्ट महिन्यात भारतातील किरकोळ महागाई दर ५.३० टक्के होता. जुलै महिन्यात देशातील किरकोळ महागाई ५.५९ टक्के इतकी होती. ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइस इंडायसेसनुसार अन्नधान्य आणि वस्तूंशी निगडीत महागाईदर १४७.४ वर पोचला आहे. याआधी हा महागाईदर १४६.६ होता. सप्टेंबर भाजीपाल्याशी निगडीत महागाईदर १६२.३ होता, तोच वाढून ऑक्टोबर महिन्यात १८५.३ वर पोचला आहे.

कपडे, पादत्राणे, इंधन झाले महाग

मांस आणि मासे यासाठीचा महागाईदर सप्टेंबर महिन्यात २०४ होता त्यात वाढ होत तो २०४.६ झाला आहे. तर साखर आणि तत्सम पदार्थांचा महागाईदर सप्टेंबरमध्ये ११९.७ होता, ऑक्टोबरमध्ये तो वाढून १२१.९ वर पोचला आहे. खाद्यतेल आणि तत्सम पदार्थांशी निगडीत महागाईदर सप्टेंबरमध्ये १८८ होता. तर ऑक्टोबरमध्ये तो १९०.५वर पोचला आहे. अन्न आणि मद्य, रान, तंबाखू, कपडे, पादत्राणे, इंधन इत्यादी बाबींशी निगडीत महागाईदरात ऑक्टोबरमध्ये चांगलीच वाढ झाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी