Inflation Rate | ऑक्टोबर महिन्यात देशातील महागाईदर ४.४८ टक्क्यांवर

Retail Inflation | देशातील किरकोळ महागाईदर मागील वर्षी याच कालावधीत ७.६१ टक्क्यांच्या विक्रमी पातळीवर पोचला होता. तर ऑगस्ट महिन्यात भारतातील किरकोळ महागाई दर ५.३० टक्के होता. जुलै महिन्यात देशातील किरकोळ महागाई ५.५९ टक्के इतकी होती. देशातील किरकोळ किंवा रिटेल महागाई ही कन्झ्युमर प्राइस इंडेक्सद्वारे मोजली जाते. सीपीआय वाढून ४.४८ टक्क्यांवर पोचला आहे.

Retail inflation rises
किरकोळ महागाईदरात वाढ 
थोडं पण कामाचं
  • किरकोळ महागाईदरात (inflation) वाढ होत तो ४.४८ टक्क्यांवर पोचला आहे
  • सप्टेंबर महिन्यात कन्झ्युमर प्राइस इंडेक्स ४.३५ टक्के
  • भाजीपाल्याच्या किंमतीत (vegetable prices)झालेल्या मोठ्या वाढीमुळे महागाईदरात एकदम वाढ झाली

Retail Inflation | नवी दिल्ली: ऑक्टोबर महिन्यात (October)देशातील किरकोळ महागाईदरात (inflation) वाढ होत तो ४.४८ टक्क्यांवर पोचला आहे. अन्नधान्य आणि उत्पादने, मांस, मासे, साखर, खाद्यतेल, अन्न, दारू, पान, गुटखा, कपडे, पादत्राणे इत्यादी श्रेणीतील वस्तूंच्या किंमतीत ऑक्टोबर महिन्यात वाढ झाली आहे. देशातील किरकोळ किंवा रिटेल महागाई ही कन्झ्युमर प्राइस  इंडेक्स (Consumer Price Index) (CPI)द्वारे मोजली जाते. सीपीआय वाढून ४.४८ टक्क्यांवर पोचला आहे. सप्टेंबर महिन्यात कन्झ्युमर प्राइस  इंडेक्स ४.३५ टक्क्यांवर होता. भाजीपाल्याच्या किंमतीत (vegetable prices)झालेल्या मोठ्या वाढीमुळे महागाईदरात एकदम वाढ झाली आहे. सांख्यिकी विभागाकडून आलेल्या आकडेवारीतून ही बाब दिसते आहे. (Inflation Rate : In October Retail inflation rises to 4.48%)

अन्नधान्याच्या किंमतीत वाढ

देशातील किरकोळ महागाईदर मागील वर्षी याच कालावधीत ७.६१ टक्क्यांच्या विक्रमी पातळीवर पोचला होता. तर ऑगस्ट महिन्यात भारतातील किरकोळ महागाई दर ५.३० टक्के होता. जुलै महिन्यात देशातील किरकोळ महागाई ५.५९ टक्के इतकी होती. ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइस इंडायसेसनुसार अन्नधान्य आणि वस्तूंशी निगडीत महागाईदर १४७.४ वर पोचला आहे. याआधी हा महागाईदर १४६.६ होता. सप्टेंबर भाजीपाल्याशी निगडीत महागाईदर १६२.३ होता, तोच वाढून ऑक्टोबर महिन्यात १८५.३ वर पोचला आहे.

कपडे, पादत्राणे, इंधन झाले महाग

मांस आणि मासे यासाठीचा महागाईदर सप्टेंबर महिन्यात २०४ होता त्यात वाढ होत तो २०४.६ झाला आहे. तर साखर आणि तत्सम पदार्थांचा महागाईदर सप्टेंबरमध्ये ११९.७ होता, ऑक्टोबरमध्ये तो वाढून १२१.९ वर पोचला आहे. खाद्यतेल आणि तत्सम पदार्थांशी निगडीत महागाईदर सप्टेंबरमध्ये १८८ होता. तर ऑक्टोबरमध्ये तो १९०.५वर पोचला आहे. अन्न आणि मद्य, रान, तंबाखू, कपडे, पादत्राणे, इंधन इत्यादी बाबींशी निगजीत महागाईदरात ऑक्टोबरमध्ये चांगलीच वाढ झाली आहे.

महागाईदर ४ टक्के राखण्याचे आरबीआयचे उद्दिष्ट

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने महागाईदराचे उद्दिष्ट ४ टक्के ठेवले आहे. म्हणजेच किमान २ टक्के आणि कमाल ६ टक्के या दरम्यान महागाईदर राखण्याचा रिझर्व्ह बॅंकेचा प्रयत्न आहे. तर २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी कन्झ्युमर प्राइस इंडेक्स ५.७ टक्के राखण्याचा रिझर्व्ह बॅंकेचा प्रयत्न आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कन्झ्युमर प्राइस इंडेक्स ५.९ टक्के राखण्याचे रिझर्व्ह बॅंकेचे उद्दिष्ट होते. तिसऱ्या तिमाहीत ५.३ टक्के आणि शेवटच्या तिमाहीत कन्झ्युमर प्राइस इंडेक्स ५.८ टक्के राखण्याचे रिझर्व्ह बॅंकेचे उद्दिष्ट आहे.

कच्च्या तेलामुळे महागाई वाढणार

डॉलरच्या किंमतीत झालेली वाढ आणि घसरण याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर प्रत्यक्ष आणि मोठा परिणाम होत असतो. इंधन आणि अनेक वस्तूंचा व्यापार डॉलरमध्ये होत असतो. भारत मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आणि वस्तूंची आयात करतो. भारत जगातील कच्च्या तेलाचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. डॉलरच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होणार आहे. कच्चे तेल महागल्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढणार आहे आणि परिणामी किरकोळ बाजारात वस्तूंचे भाव वाढणार आहेत. त्यामुळे भारतात महागाई दर वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय भारत सरकारची चालू खात्याची तूटदेखील वाढणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी