Solar Rooftop Yojana | घराच्या छतावर मोफत लावा सोलर पॅनल, २० वर्षे मोफत वीज, कमाईच कमाई

Solar Rooftop Yojana | बदलत्या जीवनशैलीमुळे वीजेचा खप (Electricity consumption)वाढतो आणि शिवाय वीजेवरील खर्चात वाढ होते आहे. अशावेळी मोफत वीज मिळवणे आणि त्यातून कमाईदेखील करणे असे दोन्ही फायदे तुम्ही मिळवू शकता. तुम्ही आपल्या घराच्या छतावर सोलर पॅनल (Solar Panel) लावू शकता. यातून तुम्हाला मोफत वीज मिळेल. शिवाय हे सोलर पॅनल लावण्यासाठी सरकार सहाय्यदेखील करते.

Solar Rooftop Yojana
सोलर रुफटॉप सब्सिडी योजना 
थोडं पण कामाचं
  • घराच्या छतावर मोफत बसवा सोलर पॅनल
  • केंद्र सरकारची सोलर रुफटॉप सब्सिडी योजना
  • २० वर्षांपर्यत मिळवा मोफत वीज

Solar Rooftop Yojana | नवी दिल्ली : वीजेच्या बिलात (Electricity bill)सातत्याने वाढ होते आहे. त्यातच इंधनाच्या दरात (Fuel prices)वाढ होते. महागाईमुळे (inflation) सर्वसामान्यांना मोठा फटका बसतो आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे वीजेचा खप (Electricity consumption)वाढतो आणि शिवाय वीजेवरील खर्चात वाढ होते आहे. अशावेळी मोफत वीज मिळवणे आणि त्यातून कमाईदेखील करणे असे दोन्ही फायदे तुम्ही मिळवू शकता. तुम्ही आपल्या घराच्या छतावर सोलर पॅनल (Solar Panel) लावू शकता. यातून तुम्हाला मोफत वीज मिळेल. शिवाय हे सोलर पॅनल लावण्यासाठी सरकार सहाय्यदेखील करते. सोलर रुफटॉप सब्सिडी योजना (Solar Rooftop Yojana) देशात सौरऊर्जेला चालना देण्यासाठी भारत सरकारकडून चालवण्यात येते आहे. सौरऊर्जेचे (Solar Energy) महत्त्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे. (Solar Rooftop Yojana : Install free solar panel on the roof of house & get free electricity)

सौरऊर्जेचे महत्त्व

अपारंपारिक ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार देशभरात सौरऊर्जेला चालना देते आहे. यासाठीच केंद्र सरकारकडून सोलर रुफटॉप बसवण्यासाठी सब्सिडीदेखील दिली जाते. यामुळे नागरिकांना मोफत सोलर पॅनल बसवून मिळतात. शिवाय यातून मोफत सौरऊर्जा मिळत राहते. त्यामुळे वीजेवरील खर्चाचीदेखील बचत होते.

२० वर्षापर्यत मोफत मिळते वीज

आपल्या घराच्या छतावर सोलर रुफटॉप लावून तुम्ही वीजेवर होणाऱ्या खर्चामध्ये ३० ते ५० टक्क्यांपर्यत बचत करू शकता. सोलर रुफटॉफमध्ये २५ वर्षापर्यत वीज मिळते. या सोलर रुफटॉप सब्सिडी योजनेत ५ ते ६ वर्षांमध्ये खर्चाची परतफेड होते. शिवाय यानंतर पुढील १९ -२० वर्षांपर्यत तुम्हाला मोफत सोलर वीजेचा फायदा मिळतो.

सोलर पॅनलसाठी किती जागा हवी

सोलर पॅनल लावण्यासाठी जास्त जागेची आवश्यकता नसते. एक किलोवॅट सौरऊर्जेसाठी १० चौ. मीटर जागेची गरज असते. केंद्र सरकारकडून ३ केव्ही पर्यत सोलर रुफटॉप प्लांटवर ४० टक्के सब्सिडी आणि तीन केव्हीनंतरच्या १० केव्ही पर्यत २० टक्के सब्सिडी दिली जाते. सोलर रुफटॉप सब्सिडी योजनेसाठी तुम्ही वीज कंपनीच्या जवळच्या कार्यालयात संपर्क करू शकता. अधिक माहितीसाठी mnre.gov.in या वेबसाइटवर जा.

पैशांची बचत

सोलर पॅनलमुळे वीजेचे प्रदूषण कमी होतेच शिवाय पैसेदेखील वाचतात. ग्रुप हाउसिंगमध्ये सोलर पॅनल लावल्याने वीजेवर होणारा खर्च ३० टक्के ते ५० टक्क्यांपर्यत कमी केला जाऊ शकतो. सोलर रुफटॉप सब्सिडी योजनेमध्ये ५०० केव्हीपर्यत सोलर रुफटॉप प्लांट लावल्यावर २० टक्के सब्सिडी केंद्र सरकार देते आहे.

असा करा ऑनलाइन अर्ज

  1. -ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी solarrooftop.gov.in या वेबसाइटवर जा.
  2. -आता होम पेजवर सौर छत साठी अर्ज करण्यसाठी क्लिक करा.
  3. -यानंतर आलेल्या पेजवर तुम्ही आपल्या राज्यावर क्लिक करा.
  4. -त्यानंतर तुमच्यासमोर सोलर रुफच्या अर्जाचे पेज ओपन होईल.
  5. -यात अर्ज भरून सब्मिट करा.
  6. -या प्रकारे तुम्ही सोलर रुफटॉप योजनेसाठी अर्जाची प्रक्रिया पूर्ण करू शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी