महिन्याला करा केवळ 500 रुपयांची गुंतवणूक अन् 11 वर्षांत व्हा लखपती, जाणून घ्या कसे

Investment Tips: प्रत्येकजण हा काही ना काही स्वप्न पाहतो. कोणाला नवी कार खरेदी करायची असते तर कोणाला नवं घर खरेदी करायचं असतं. मात्र, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पैशांची गरज असते आणि त्यासाठी गुंतवणूक करणे आवश्यक आहे. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • एसआयपीमध्ये गुंतवणूक करा अन् व्हा मालामाल
  • जाणून घ्या किती करावी लागेल गुंतवणूक

Investment tips and calculator: आपण पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठी रक्कम आवश्यक असते. मात्र, ज्यावेळी आपल्याकडे एखादी मोठी रक्कम नसते त्यावेळी अडचण निर्माण होते. त्यामुळे भविष्यात कोणतेही मोठं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर त्याची तयारी आतापासूनच करायला हवी. ही तयारी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान म्हणजेच SIP च्या रुपात असू शकते. एसआयपीमध्ये तुम्ही प्रत्येक महिन्याला छोटी-छोटी रक्कम जमा कराल तर अगदी सहजपणे तुम्ही पैसे जमा करु शकता. जर तुम्ही प्रत्येक महिन्याला केवळ 500 रुपये गुंतवणूक कराल तर मोठ्या रक्कमेचे मालक बनाल. (invest 500 every month and get lakh rupees in 11 years investment tips in marathi)

केवळ 11 वर्षांत होतील लाखो रुपये

जर तुम्ही 11 वर्षे प्रत्येक महिन्याला सिस्टमॅटिक इन्वेस्टमेंट प्लान म्हणजेच एसआयपीमध्ये केवळ 500 रुपये जमा केले तर तुमच्याकडे 5 लाखांहून अधिक रुपये जमा होतील. 11 वर्षे म्हणजेच 132 महिन्यांत तुमची एकूण गुंतवणूक 66,000 रुपये इतकी होईल. जर तुम्हाला 11 वर्षांच्या काळात 30 टक्के दराने दर वर्षाला रिटर्न्स मिळाले तर तुम्हाला एकूण 4,47,206 रुपये रिटर्न्स मिळतील. म्हणजेच 11 वर्षांनंतर तुमच्याकडे एकूण 513208 रुपये मिळतील.

SIP

(Source: Groww) 

काय आहे एसआयपी ? (What is SIP?) 

SIP (Mutual Fund) मध्ये गुंतवणूक करण्याचा एक पर्याय आहे. सिस्टमॅटिक इन्वेस्टमेंट प्लानमध्ये साप्ताहिक, मासिक किंवा तिमाहीच्या आधारे तुम्ही गुंतवणूक करु शकता. एक्सपर्ट्सच्या मते, एसआयपीमध्ये तुम्ही जेवढे जास्त वेळ गुंतवणूक कराल तेवढे रिटर्न्स तुम्हाला जास्त मिळतील. अनेक असे एसआयपी प्लान आहेत जेथे गुंतवणुकदारांना 25 ते 30 टक्के रिटर्न्स मिळाले आहेत.

(Disclaimer: टाइम्स नाऊ मराठी  कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. हे वृत्त केवळ तुमच्या माहितीसाठी देण्यात आले आहे. कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी एक्सपर्ट किंवा गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी