Post Office Scheme: ही योजना देईल लाखोंचा परतावा...फक्त 500 रुपयांनी सुरू करा तुमचे खाते

Post Office Investment : तुम्हाला जर आर्थिक स्थैर्य हवे असेल, श्रीमंत व्हायचे असेल तर गुंतवणूक (Investment) करणे आवश्यक आहे. सर्वसामान्य माणसासमोर गुंतवणूक करताना दोन बाबी येतात. पहिली म्हणजे किती परतावा मिळणार आणि दुसरी म्हणजे किती जोखीम आहे. जोखीम आणि परताव्याचा उत्तम ताळमेळ म्हणजे पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक योजना. पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक (Post Office Scheme) ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते.

Post Office Investment
पोस्ट ऑफिसची गुंतवणूक 
थोडं पण कामाचं
  • जोखीम आणि परताव्याचा उत्तम ताळमेळ म्हणजे पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक योजना
  • ेअर बाजार (Share Market) आणि म्युच्युअल फंडांमध्ये (Mutual Fund)परतावा चांगला आहे, परंतु या गुंतवणूक प्रकारांमध्ये जोखीमदेखील आहे.
  • या योजनेत तुम्ही तुमच्या सोयीनुसार एक वर्ष, दोन वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी गुंतवणूक करू शकता.

Post Office RD Scheme:नवी दिल्ली : तुम्हाला जर आर्थिक स्थैर्य हवे असेल, श्रीमंत व्हायचे असेल तर गुंतवणूक (Investment) करणे आवश्यक आहे. सर्वसामान्य माणसासमोर गुंतवणूक करताना दोन बाबी येतात. पहिली म्हणजे किती परतावा मिळणार आणि दुसरी म्हणजे किती जोखीम आहे. जोखीम आणि परताव्याचा उत्तम ताळमेळ म्हणजे पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक योजना. पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक (Post Office Scheme) ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. वास्तविक, शेअर बाजार (Share Market) आणि म्युच्युअल फंडांमध्ये (Mutual Fund)परतावा चांगला आहे, परंतु या गुंतवणूक प्रकारांमध्ये जोखीमदेखील आहे. मात्र अनेकांना जोखीम घ्यायची नसते. अशा परिस्थितीत तुम्ही अशा ठिकाणी गुंतवणूक करता जिथे तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित असतात आणि तुम्हाला कोणताही धोका न घेता चांगला परतावा मिळतो. जर तुम्हालाही अशी गुंतवणूक करायची असेल जिथे चांगला परतावा मिळेल आणि जोखीमदेखील नसेल तर पोस्ट ऑफिसची ही योजना तुमच्यासाठी चांगली ठरू शकते. पोस्ट ऑफिसच्या या स्कीममध्ये खाते उघडून तुम्ही चांगली कमाई करू शकता. (Invest in Post Office RD scheme and earn good returns)

अधिक वाचा : Best Prepaid Plan : फक्त 49 रुपयांच्या रिचार्जमध्ये चालणार 180 दिवस, एअरटेल, जिओ, व्होडाफोन, बीएसएनल सर्वांवर भारी

100 रुपयांपासून करा सुरुवात 

पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेव्हिंग स्कीम रिकरिंग डिपॉझिटमधील (Post Office small savings recurring deposit) गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे. या योजनेत तुम्ही 100 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. शिवाय यात जास्तीत जास्त किती रक्कम गुंतवायची यावर मर्यादा नाही. आवर्ती ठेव म्हणजे आरडी योजनेत तुम्ही तुमच्या सोयीनुसार एक वर्ष, दोन वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी गुंतवणूक करू शकता. या योजनेत पोस्ट ऑफिस दर तिमाहीला व्याज देखील देते.

अधिक वाचा : Hemant Soren आमदारांना घेऊन पोहोचले लातरातुला, धरणावर बांधलेल्या रिसॉर्टमध्ये शिफ्ट

कर्जदेखील मिळते

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही व्यक्ती आपले खाते उघडू शकते. पालक आपल्या अल्पवयीन मुलासाठी खाते उघडू शकतात. या पोस्ट ऑफिस योजनेतून तुम्ही कर्ज देखील मिळवू शकता. कर्ज घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पोस्ट ऑफिस शाखेशी संपर्क साधावा लागेल. तुम्ही हे कर्ज 12 हप्त्यांमध्ये देखील जमा करू शकता. तुम्ही तुमच्या खात्यात जमा केलेल्या रकमेच्या 50% एवढ्या रकमेचे कर्ज म्हणून घेऊ शकता.

अधिक वाचा : Ganesh Chaturthi 2022 Ekdant Katha: गणपती बाप्पाला का म्हणतात एकदंत, जाणून घ्या या मागील कथा

असे मिळतील 16 लाख  

आरडी योजनेत दरमहा 16,000 रुपयांची गुंतवणूक केली तर 10 वर्षांनंतर तुम्हाला 26 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम हाती येईल. समजा तुम्ही दरमहा 16,000 रुपये जमा केले, तर एका वर्षात तुम्ही एक लाख 92 हजार रुपये जमा कराल. त्याचप्रमाणे तुम्ही या योजनेत 10 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर तुमची एकूण गुंतवणूक 19,20,000 रुपये होईल. यानंतर, प्लॅनच्या मॅच्युरिटीनंतर, तुम्हाला परतावा म्हणून 6,82,359 रुपये मिळतील. अशा प्रकारे तुम्हाला 10 वर्षांनंतर एकूण 26,02,359 रुपये मिळतील. अशा प्रकारे तुम्ही पोस्टाच्या आरडीमध्ये गुंतवणूक करून लाखो रुपये कमवू शकता.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी