International Women's Day : दरवर्षी 8 मार्चला जागतिक महिला दिन साजरा केला जातो. या दिवशी देशभरात महिलांच्या सन्मानासाठी आणि हक्कांसाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. जर तुम्हाला घरातल्या स्त्रीला किंवा मुलीला काही भेटवस्तू द्यायची असेल तर आर्थिक भेटवस्तू देऊ शकता. मुलीच्या जन्मानंतर तिच्या आई-वडिलांना तिच्या भविष्याची चिंता लागलेली असते. मुलीच्या जन्मानंतर अल्पकालीन किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीचे पर्याय शोधत असतात. अशा पालकांसाठी आम्ही सरकारच्या विविध योजनांची माहिती देत आहोत. यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला मजबूत व्याजदर मिळू शकतात. जाणून घ्या या सरकारी योजनांबद्दल.
सुकन्या समृद्धी योजना ही एक स्मॉल सेविंग स्कीम आहे जी खासकरुन लहान मुलींसाठीच बनवली गेली आहे. या योजनेद्वारे, तुम्ही तुमच्या 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीसाठी गुंतवणूक करू शकता आणि तिच्या भविष्यासाठी फंड बनवू शकता. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही 18 वर्षे आणि 21 वर्षे वयाच्या मुलींसाठी मोठा निधी तयार करू शकता. या योजनेअंतर्गत जमा केलेल्या रकमेवर 7.6 टक्के व्याजदर दिला जातो. या योजनेत तुम्ही दरवर्षी 250 ते 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर खात्यात जमा केलेले पैसे अंशतः काढता येतात. त्याचवेळी, वयाच्या 21 नंतर, ती खात्यातून जमा केलेले सर्व पैसे काढू शकते.
अधिक वाचा : सुपरफिट सुष्मिता सेनला अचानक हार्ट अटॅक कसा आला? जाणून घ्या
पब्लिक प्रोविडेंट फंड ही सुध्दा एक चांगली स्कीम आहे. या योजनेचा परिपक्वता कालावधी 15 वर्षे आहे. हीदेखील एक सरकारी हमी योजना आहे, ज्यामध्ये तुम्ही वार्षिक 500 ते 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. यामध्ये तुम्हाला 3 वर्षांनंतर कर्जाची सुविधा मिळू शकते.
अधिक वाचा : रणबीर कपूर दाढी का करत नाही? अशी कोणती भीती सतावतेय
महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट (Mahila Samman Savings Certificate) ही एक नवीन स्कीम आहे जी सरकारद्वारे बजेट 2023 मध्ये सादर केली होती. या योजनेद्वारे तुम्ही तुमच्या मुलीसाठी किंवा घरातील कोणत्याही महिलेसाठी गुंतवणूक करू शकता. ही योजना खास कमी उत्पन्न गटातील महिलांसाठी तयार करण्यात आली आहे. मार्च 2023 मध्ये या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला 2025 पर्यंत मॅच्युरिटी रक्कम मिळेल.