How to Make Money Double: या योजनेत पैसे गुंतवा आणि मिळवा दुप्पट पैसे; पैसे बुडण्याचाही नाही धोका 

काम-धंदा
Updated Jun 22, 2022 | 12:17 IST | टाइम्स नाऊ मराठी

How to Make Money Double । जर एखाद्या योजनेत पैसे गमावण्याचा धोका नसेल आणि पैसे दुप्पट होत असतील तर तिथे गुंतवणूक करू इच्छित नाही अशी व्यक्ती असू शकत नाही. या महागाईच्या जगात आर्थिक स्वातंत्र्य हवे असेल, तर बचत करणे अत्यंत गरजेचे आहे.

Invest in this plan and get double the money, There is no risk of losing money
या योजनेत पैसे गुंतवा आणि मिळवा दुप्पट पैसे, वाचा सविस्तर   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • किसान विकास पत्र (KVP) ही पोस्ट ऑफिसची योजना आहे.
  • या योजनेचे नाव किसान विकास पत्र आहे.
  • किसान योजनेत कोणतीही वयस्कर व्यक्ती अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने खाते उघडू शकते.

How to Make Money Double । मुंबई : जर एखाद्या योजनेत पैसे गमावण्याचा धोका नसेल आणि पैसे दुप्पट होत असतील तर तिथे गुंतवणूक करू इच्छित नाही अशी व्यक्ती असू शकत नाही. या महागाईच्या जगात आर्थिक स्वातंत्र्य हवे असेल, तर बचत करणे अत्यंत गरजेचे आहे. तुमचा मोठा खर्च भागवण्यासाठी तुम्ही गुंतवणूक करणे आवश्यक आहे. परंतु सध्या असे अनेक गुंतवणुकीचे पर्याय आहेत जे असुरक्षित आहेत आणि त्यात कोणतेही खात्रीशीर नियम नाहीत. दरम्यान आज आपण अशा योजनेबद्दल भाष्य करणार आहोत, ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही दिलेल्या कालावधीत तुमची रक्कम दुप्पट करू शकता. लक्षणीय बाब म्हणजे या योजनेचे नाव किसान विकास पत्र आहे. (Invest in this plan and get double the money, There is no risk of losing money). 

अधिक वाचा : विश्वकप विजेता खेळाडू चक्क पेट्रोल पंपावर लोकांना देतोय चहा

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत करा गुंतवणुक 

किसान विकास पत्र (KVP) ही पोस्ट ऑफिसची योजना आहे. ही एक छोटी बचत योजना आहे. या योजनेद्वारे तुम्ही तुमची रक्कम दुप्पट करू शकता. ही योजना भारतीय टपाल कार्यालयांद्वारे प्रमाणपत्राच्या स्वरूपात दिली जाते. या योजनेत किमान १ हजार रुपयांची गुंतवणूक करता येते. त्यानंतर १०० च्या पटीत गुंतवणूक वाढवता येते. या योजनेत गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही. ही एक निश्चित दर बचत योजना आहे. किसान विकास पत्रामध्ये सध्या ६.९ टक्के चक्रवाढ व्याज दिले जात आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यावर, तुमची रक्कम १२४ महिन्यांत म्हणजेच १० वर्षे आणि ४ महिन्यात दुप्पट होते.

ही कागदपत्रे द्यावी लागतील

किसान विकास पत्रामध्ये खाते उघडण्यासाठी KVP अर्ज, वयाचा पुरावा, आधार कार्ड, रहिवाशी दाखला, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. लक्षणीय बाब म्हणजे तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन ग्राहक किसान विकास पत्र खरेदी करू शकतात. KVP प्रमाणपत्रे रोख, चेक, पे ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे देखील खरेदी करता येतात.

ही लोक उघडू शकतात खाते

किसान विकास पत्र योजनेअंतर्गत, कोणतीही वयस्कर व्यक्ती अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने खाते उघडू शकते. अल्पवयीन मुलाचे वय १० वर्षे पूर्ण झाल्यानंतर खाते त्याच्या नावावर होते. याशिवाय तीन व्यक्ती एकाच वेळी एकत्र खातेही उघडू शकतात. किसान विकास पत्र देशभरातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून खरेदी केले जाऊ शकते.

जाणून घ्या किती द्यावा लागतो टॅक्स

आयकर नियमांनुसार, किसान विकास पत्रातून मिळणाऱ्या व्याजावर उत्पन्नाचा टॅक्स लागतो. हे उत्पन्न 'इतर स्रोत' या शीर्षकाखाली करपात्र आहे. या व्याजावर गुंतवणूकदाराला दोन पर्याय मिळतात. पहिली म्हणजे 'कॅश बेसिस' कर आकारणी आणि दुसरी वार्षिक व्याजावरील कर.

ट्रान्सफरही करू शकतात KVP

ग्राहक त्यांचे किसान विकास पत्र खाते पोस्ट ऑफिसच्या एका शाखेतून दुसऱ्या शाखेत हस्तांतरित अर्थात ट्रान्सफर करू शकतात. KVP देखील एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित केले जाऊ शकते. यामध्ये नॉमिनी सुविधा देखील उपलब्ध आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी