Post Office Investment | या योजनेत करा फक्त १५०० रुपयांची गुंतवणूक, मिळतील ३५ लाख, जाणा विस्ताराने

Post Office | पोस्ट ऑफिसची (Post Office) एक योजना असाच एक दमदार पर्याय आहे. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक (Investment)केल्यास तुमचा ३५ लाख रुपयांचा फायदा होऊ शकतो. पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक ही सुरक्षित आणि चांगली गुंतवणूक समजली जाते. पोस्टाच्या योजनेत निश्चित परताव्यासह (Guaranteed Returns)भांडवलाची सुरक्षिततादेखील असते. त्यामुळे आजही अनेकांचा कल पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा असतो.

Post Office Gram Suraksha Yojana
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना 
थोडं पण कामाचं
 • पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना आहे गुंतवणुकीचा दमदार प्लॅन
 • दरमहा करा फक्त १,५०० रुपयांची गुंतवणूक
 • या योजनेत १९ ते ५५ वर्षे वयोगटातील कोणतीही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकते

Post Office Scheme | नवी दिल्ली : छोट्या गुंतवणुकीतून मोठी रक्कम उभारण्याचा गुंतवणूक पर्याय सर्वानाच हवासा असतो. पोस्ट ऑफिसची (Post Office) एक योजना असाच एक दमदार पर्याय आहे. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक (Investment)केल्यास तुमचा ३५ लाख रुपयांचा फायदा होऊ शकतो. पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक ही सुरक्षित आणि चांगली गुंतवणूक समजली जाते. पोस्टाच्या योजनेत निश्चित परताव्यासह (Guaranteed Returns)भांडवलाची सुरक्षिततादेखील असते. त्यामुळे आजही अनेकांचा कल पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा असतो. पाहूया पोस्ट ऑफिसची एक जबरदस्त स्कीम. (Invest liitle money in Post Office Gram Suraksha Yojana & get big corpus)  

दरमहा करा १,५०० रुपयांची गुंतवणूक

पोस्ट ऑफिसच्या ज्या योजनेबद्दल आपण जाणून घेत आहोत ती आहे पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना (Post Office Gram Suraksha Yojana). ही एक प्रकारची विमा योजना आहे. यामध्ये तुम्हाला दर महिन्याला १,५०० रुपयांची गुंतवणूक करावी लागते. मॅच्युरिटीच्या वेळेस तुम्हाला ३५ लाख रुपये मिळतात. याबद्दल जाणून घेऊया.

पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना (Post Office Gram Suraksha Yojana)

 1. या योजनेत १९ ते ५५ वर्षे वयोगटातील कोणतीही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकते. ही एक प्रकारची विमा योजना आहे.
 2. या योजनेअंतर्गत किमान विमा रक्कम १०,००० रुपये आहे.
 3. याशिवाय कमाल विमा रक्कम १० लाख रुपये आहे.
 4. या योजनेचा प्रीमियम तुम्ही मासिक, तिमाही, सहामाही आणि वार्षिक आधारावर भरू शकता.
 5. याशिवाय प्रीमियम पेमेंटवर ३० दिवसांची सूट मिळते.
 6. ३१ ते ३५ लाख रुपयांपर्यतचा मिळतो फायदा.

पाहा कसे मिळतील ३५ लाख

जर तुम्ही या योजनेत १९ वर्षे वयापासून गुंतवणूक सुरू केली आणि १० लाख रुपयांची पॉलिसी घेतली तर ५५ वर्षांपर्यतसाठी तुमचा मासिक प्रीमियम १,५१५ रुपये, ५८ वयासाठी १,४६३ रुपये आणि ६० वर्षांसाठी १,४११ रुपये असणार आहे.

 1. ५५ वर्षांसाठी ३१.६० लाख रुपयांचा फायदा मॅच्युरिटीच्यावेळेस मिळेल.
 2. ५८ वर्षांसाठी ३३.४० लाख रुपयांचा फायदा मॅच्युरिटीच्यावेळेस मिळेल.
 3. ६० वर्षांसाठी ३४.६० लाख रुपयांचा फायदा मॅच्युरिटीच्यावेळेस मिळेल.

पॉलिसी सरेंडरचादेखील आहे ऑप्शन

या शिवाय ग्राहक ३ वर्षांनंतर पॉलिसी सरेंडरदेखील करू शकतात. ही पॉलिसी इंडियो पोस्टमधून घेता येते. यामध्ये ग्राहकांना बोनसचा फायदादेखील मिळतो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी