Post Office Scheme : नवी दिल्ली : पोस्ट ऑफिसच्या या योजना या दमदार असतात आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी लाभदायी असतात. नागरिकांना छोट्या गुंतवणुकीतून मोठी रक्कम उभारण्याचा गुंतवणूक पर्याय हवा असतो. पोस्ट ऑफिसची (Post Office) एक योजना असाच एक पर्याय उपलब्ध करून देते. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक (Investment)केल्यास तुमचा ३५ लाख रुपयांचा फायदा होऊ शकतो. पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक ही सुरक्षित आणि चांगली गुंतवणूक समजली जाते. शिवाय पोस्टाच्या योजनेत निश्चित परताव्यासह (Guaranteed Returns)भांडवलाची सुरक्षिततादेखील असते. या वैशिष्ट्यांमुळेच आजही अनेकांचा कल पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा असतो. पाहूया पोस्ट ऑफिसची अशीच एक जबरदस्त स्कीम. (Invest Rs 1,411 in Post Office Gram Suraksha Yojana & get big corpus of Rs 35 Lakh)
पोस्ट ऑफिसकडून रुरल पोस्टल लाइफ इन्श्युरन्स योजना चालवल्या जातात. सर्वसामान्य नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून यात योजनांची आखणी केली जाते. रुरल पोस्टल लाइफ इन्श्युरन्स योजनांची सुरूवात १९९५ मध्ये करण्यात आली होती. याअंतर्गत पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनादेखील (Post Office Gram Suraksha Yojana) चालवली जाते. या योजनेत छोट्या गुंतवणुकीद्वारे गुंतवणुकदार मोठी रक्कम मिळवू शकतात.
पोस्ट ऑफिसच्या ज्या योजनेबद्दल आपण जाणून घेत आहोत ती आहे पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना (Post Office Gram Suraksha Yojana). ही एक प्रकारची विमा योजना आहे. यामध्ये तुम्हाला दर महिन्याला १,५०० रुपयांची गुंतवणूक करावी लागते. मॅच्युरिटीच्या वेळेस तुम्हाला ३५ लाख रुपये मिळतात. पोस्ट ऑफिसच्या या दमदार योजनेबद्दल जाणून घेऊया. या योजनेत किमान सम अश्युअर्ड १०,००० रुपये असून गुंतवणुकदार १० लाख रुपयांपर्यतचा सम अश्युअर्ड घेऊ शकतात. ग्राम सुरक्षा योजनेत गुंतवणुकदाराला प्रिमियमम आपल्या सुविधेनुसार निवडता येतो.
जर तुम्ही या योजनेत १९ वर्षे वयापासून गुंतवणूक सुरू केली आणि १० लाख रुपयांची पॉलिसी घेतली तर ५५ वर्षांपर्यतसाठी तुमचा मासिक प्रीमियम १,५१५ रुपये, ५८ वयासाठी १,४६३ रुपये आणि ६० वर्षांसाठी १,४११ रुपये असणार आहे.
या शिवाय ग्राहक ३ वर्षांनंतर पॉलिसी सरेंडरदेखील करू शकतात. ही पॉलिसी इंडियो पोस्टमधून घेता येते. यामध्ये ग्राहकांना बोनसचा फायदादेखील मिळतो. पोस्ट ऑफिसने अलीकडच्या काळात आपल्या अनेक सुविधा ऑनलाइन स्वरुपातदेखील उपलब्ध करून दिल्या आहेत.