Investment | मोदी सरकारच्या योजनेचा लाभ पती-पत्नी दोघांना, दरमहा फक्त ४२ रुपये भरून मिळवा १० हजाराचे पेन्शन

Atal Pension Yojana : जर तुम्ही गुंतवणुकीसाठी (Investment) एखादी चांगली योजना शोधत असाल तर तुमच्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरेल. अनेक सर्वसामान्य गुंतवणुकदार कमी गुंतवणूक करू इच्छितात आणि त्यांना सुरक्षितता देखील हवी असते. जर तुम्हालाही कमीत कमी गुंतवणूक करायची असेल आणि सुरक्षित पर्याय हवा असेल तर तुमच्यासाठी अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana) हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

Atal Pension Yojana
अटल पेन्शन योजनेचे जबरदस्त फायदे 
थोडं पण कामाचं
  • निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी आर्थिक नियोजन आणि स्थैर्य आवश्यक
  • सुरक्षित गुंतवणूक आणि निश्चित पेन्शन मिळण्यासाठी अटल पेन्शन योजना हा एक दमदार पर्याय
  • लवकर गुंतवणूक सुरू करून अगदी नाममात्र रकमेत मिळवा पेन्शन

Atal Pension Yojana | नवी दिल्ली : आर्थिक स्थैर्यासाठी (Financial Stability) नियमित गुंतवणूक आवश्यक असते. त्यातही निवृत्तीनंतरच्या आयुष्याची तजवीज तरुणवयातच करणे योग्य ठरते. जर तुम्ही गुंतवणुकीसाठी (Investment) एखादी चांगली योजना शोधत असाल तर तुमच्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरेल. अनेक सर्वसामान्य गुंतवणुकदार कमी गुंतवणूक करू इच्छितात आणि त्यांना सुरक्षितता देखील हवी असते. जर तुम्हालाही कमीत कमी गुंतवणूक करायची असेल आणि सुरक्षित पर्याय हवा असेल तर तुमच्यासाठी अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana) हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. निवृत्तीनंतरच्या आयुष्य जगताना आर्थिक गरजा भागवण्यासाठी आणि चिंतामुक्त आयुष्य जगण्यासाठी पेन्शन उपयुक्त ठरते. (Investment : Atal Pension Yojana is best option for safe little investment to get benefit of Pension) 

अटल पेन्शन योजनेअंतर्गत दरमहा मिळणार पेन्शन

सरकारच्या या योजनेअंतर्गत पती आणि पत्नी या दोघांनाही आर्थिक लाभ मिळू शकतो. या योजनेमध्ये जर दोघांनीही गुंतवणूक केली तर दरमहा १०,००० रुपयांची रक्कम मिळू शकते. सध्या मोदी सरकार अटल पेन्शन योजनेअंतर्गत वयाच्या ६० वर्षांनंतर १,००० रुपयांपासून ते ५,००० रुपयांपर्यतच्या दरमहा पेन्शनची गॅंरटी देते आहे. हे पेन्शन एका व्यक्तीने गुंतवणूक केल्यास मिळणार आहे. मात्र जर पती-पत्नी दोघांनीही दरमहा गुंतवणूक केली तर हीच रक्कम १०,००० रुपयांपर्यत जाणार आहे. सरकार या योजनेमध्ये वयाच्या ४० वर्षांपर्यतच्या व्यक्तींचे अर्ज स्वीकारते. 
वय ४० वर्षांपर्यतची व्यक्ती यात गुंतवणूक करू शकते.

फक्त ४२ रुपयांनी ६० व्या वर्षी मिळेल दरमहा ५,००० रुपयांचे पेन्शन

अटल पेन्शन योजनेअंतर्गत दर महिन्याला एक निश्चित रकमेची गुंतवणूक केल्यास निवृत्तीनंतर १,००० रुपयांपासून ते ५,००० रुपयांपर्यतचे मासिक पेन्शन मिळणार आहे. प्रत्येक ६ महिन्यांमध्ये फक्त १,२३९ रुपयांची गुंतवणूक केल्यास वयाच्या ६० वर्षानंतर आजीवन ५,००० रुपये दरमहा पेन्शनची म्हणजे वार्षिक ६०,००० रुपये पेन्शनची गॅरंटी सरकार देते आहे. सध्याच्या नियमांनुसार वयाच्या १८व्या वर्षी या योजनेसाठी नोंदणी केल्यास आणि ५,००० रुपयांचे मासिक पेन्शन हवे असल्यास तुम्हाला दरमहा २१० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. जर दर तीन महिन्यांनी तुम्ही हे पैसे दिलेत तर ६२६ रुपये द्यावे लागतील आणि दर सहा महिन्यांनी पैसे भरल्यास १,२३९ रुपये भरावे लागतील. दर महा १,००० रुपयांचे पेन्सन मिळवण्यासाठी जर वयाच्या १८ वर्षापासून तुम्ही गुंतवणूक सुरू केली तर दरमहा फक्त ४२ रुपये द्यावे लागतील.

कमी वयात सुरू केल्यास मोठा फायदा

समजा ५,००० रुपयांचे दरमहा पेन्शन मिळवण्यासाठी तुम्ही अटल पेन्शन योजनेत वयाच्या ३५ वर्षी गुंतवणूक सुरू केली तर २५ वर्षांपर्यत दर सहा महिन्यांसाठी तुम्हाला ५,३२३ रुपये भरावे लागतील. अशा परिस्थितीत तुम्ही केलेली एकूण गुंतवणूक २.६६ लाख रुपये असेल. या गुंतवणुकीवर तुम्हाला ६० व्या वर्षानंतर दरमहा ५,००० रुपयांचे पेन्शन दिले जाईल. याउलट वयाच्या १८व्या वर्षीच या योजनेत गुंतवणूक सुरू केल्यास तुम्हाला एकूण फक्त १.०४ लाख रुपयांचीच गुंतवणूक करावी लागेल. म्हणजेच उशीरा गुंतवणूक सुरू केल्यास जास्त गुंतवणूक करावी लागेल

अटल पेन्शन योजनेतील महत्त्वाचे मुद्दे -

  1. तुम्ही पेमेंटसाठी ३ प्रकारचे पर्याय निवडू शकता. मासिक, तिमाही आणि सहामाही गुंतवणुकीचा पर्याय.
  2. इन्कम टॅक्सच्या कलम ८० क क ड अंतर्गत तुम्हाला यात प्राप्तिकरावर सूट मिळते.
  3. एक व्यक्ती फक्त एकच खाते सुरू करू शकते.
  4. जर वयाच्या ६० व्या वर्षाआधीच गुंतवणुकदाराचा किंवा खातेधारकाचा मृत्यू झाला तर तर त्याच्या पत्नीला पेन्शनचा लाभ मिळेल.
  5. जर खातेधारक आणि त्याची पत्नी या दोघांचाही मृत्यू झाला तर सरकार त्यांच्या नॉमिनीला पेन्शन देईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी