Multibagger Stock: या 1 रुपयाच्या शेअरने बनवले करोडपती, एक लाखाचे झाले 7.32 कोटी

Share Market Investment : शेअर बाजारात पैसे गुंतवून चांगली कमाई करता येते. शेअर बाजारात मागील काही कालावधीत काही शेअर्स हे मल्टीबॅगर्स ठरले आहेत. काही मल्टीबॅगर आणि पेनी शेअर्सनी काही वर्षांत गुंतवणुकदारांना बंपर परतावा दिला आहे. अशाच एका जबरदस्त शेअरबद्दल जाणून घेऊया. या शेअरची किंमत 1 रुपयांवरून 790.80 च्या पातळीवर पोचली आहे. या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी करोडोंची कमाई केली आहे.

Multibagger Stock
मल्टीबॅगर शेअर 
थोडं पण कामाचं
  • शेअर बाजारात मागील काही कालावधीत काही शेअर्स हे मल्टीबॅगर्स ठरले आहेत
  • या शेअरची किंमत 1 रुपयांवरून 790.80 च्या पातळीवर पोचली
  • या शेअरने गुंतवणुकादारांना शेकडो पटींनी पैसा कमावून दिला आहे.

Multibagger Penny Stock:मुंबई :  शेअर बाजारात पैसे गुंतवून चांगली कमाई करता येते. शेअर बाजारात मागील काही कालावधीत काही शेअर्स हे मल्टीबॅगर्स ठरले आहेत. काही मल्टीबॅगर आणि पेनी शेअर्सनी काही वर्षांत गुंतवणुकदारांना बंपर परतावा दिला आहे. अशाच एका जबरदस्त शेअरबद्दल जाणून घेऊया. या शेअरची किंमत 1 रुपयांवरून 790.80 च्या पातळीवर पोचली आहे. या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी करोडोंची कमाई केली आहे. हा शेअर आहे, आरती इंडस्ट्रीज (Aarti Industries) या कंपनीचा. या शेअरने गुंतवणुकादारांना शेकडो पटींनी पैसा कमावून दिला आहे. (Investment in multibagger stock of Aarti Industries turned Rs 1 lakh into Rs 7.3 crore)

अधिक वाचा : Sonali Phogat : एकटीच सांभाळ करत होती मुलीचा, 6 वर्षांपूर्वी फार्महाऊसवर सापडला होता पतीचा मृतदेह

73,122 टक्के परतावा दिला
आरती इंडस्ट्रीज असे या कंपनीचे नाव आहे. आरती इंडस्ट्रीजने आपल्या गुंतवणुकदारांना 73,122 टक्के बंपर परतावा दिला आहे. केवळ 23 वर्षात गुंतवणुकदारांचे 1 लाख रुपये 7.32 कोटी झाले आहेत.

शेअरमधील तेजी कायम
आज आरती इंडस्ट्रीजचा शेअर 0.53 टक्क्यांच्या वाढीसह 790.80 च्या पातळीवर व्यवहार करत होता. त्याच वेळी, 1 जानेवारी 1999 रोजी या स्टॉकची किंमत 1.08 रुपये होती. गेल्या 23 वर्षात या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना 73,122.22 टक्के परतावा दिला आहे. या कालावधीत शेअरचे मूल्य 789.72 रुपयांनी वाढले आहे.

1 लाखाचे झाले 7.32 कोटी 
जर तुम्ही 23 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख गुंतवले असते, तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य आज 7.32 कोटी झाले असते. या मल्टीबॅगर शेअरने गुंतवणुकादारांसाठी मोठी संपत्ती निर्माण केली आहे. 

अधिक वाचा : Maharashtra Ministers bunglow: राज्यातील नवनियुक्त मंत्र्यांना बंगल्याचे वाटप, पाहा कुठला बंगला कुणाच्या वाट्याला

5 वर्षात 211% परतावा 
जर आपण मागील 5 वर्षांच्या कालावधीतील परतावा पाहिला तर 1 सप्टेंबर 2017 रोजी शेअरची किंमत 211.56 रुपये होती. गेल्या 5 वर्षांत कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना 273.79 टक्के परतावा दिला आहे. या काळात हा शेअर 579.24 रुपयांनी वाढला आहे.

1 वर्षात स्टॉक किती घसरला?
यावर्षी आतापर्यत या स्टॉकमध्ये घसरण झाली आहे. जानेवारीमध्ये या शेअरची किंमत 1017 रुपयांच्या पातळीवर होती. आतापर्यत हा शेअर 22.27 टक्क्यांनी घसरला आहे. याशिवाय, गेल्या एका वर्षात स्टॉकचे मूल्य 13.18 टक्क्यांनी घसरले आहे.

अधिक वाचा : Kids Makeup : मुलांचा हट्ट पुरवण्यासाठी त्यांचा मेकअप करताय? जाणून घ्या साईड इफेक्ट्स

52 आठवड्यांचा रेकॉर्ड आणि किंमत
जर आपण आरती इंडस्ट्रीजच्या 2 आठवड्यांच्या विक्रमी स्तरावर नजर टाकली तर तो 1,168.00 रुपये आहे. याशिवाय, 52 आठवड्यांचा नीचांक 668.85 रुपये आहे. कंपनीचे उत्पन्न वार्षिक आधारावर 15.3 टक्क्यांनी वाढून 283 कोटी रुपये झाले आहे. तर पहिल्या तिमाहीत हेच 245 कोटी रुपये होते.. कंपनीचे मार्जिन पहिल्या तिमाहीमध्ये 16.3 टक्क्यांवरून 13.0 टक्क्यांपर्यंत घसरले आहे.

कंपनीचा व्यवसाय काय आहे?
कंपनीचा फार्मास्युटिकल्सचा व्यवसाय आहे. आरती इंडस्ट्रीज लिमिटेड (AIL) रसायने तयार करते, ती फार्मास्युटिकल्स, अॅग्रोकेमिकल्स, पॉलिमर, अॅडिटीव्ह, सर्फॅक्टंट्स, रंगद्रव्ये आणि रंगांमध्ये वापरली जाते. याव्यतिरिक्त, फर्म फार्मास्युटिकल आणि अन्न/पेय उद्योगांसाठी API, इंटरमीडिएट्स आणि xanthine डेरिव्हेटिव्ह्ज तयार करते.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.)


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी