मुलांचे शिक्षण आणि मुलीच्या लग्नाची चिंता सतावतेय तर हा उपाय करेल तुम्हाला निश्चिंत

काम-धंदा
Updated Apr 07, 2021 | 15:18 IST | टाइम्स नाऊ मराठी

सुरक्षित गुंतवणूक म्हणून तुम्ही पीपीएफ अकाऊंट सुरू करू शकता. यात तुम्हाला १५ वर्षांचा कालावधी असतो.

money
मुलांचे शिक्षण, मुलीच्या लग्नाची चिंता सतावतेय, हा आहे उपाय 

थोडं पण कामाचं

  • पीपीएफ अकाऊंट तुम्ही कोणत्याही बँक अथवा ऑनलाईन अथवा ऑफलाईन उघडू शकता.
  • जर पीपीएफ अकाऊंटमध्ये पैसे जमा करता आले नाही तर यासाठी छोट्या रकमेची म्हणजेच ५० रूपयांची पेनल्टी लागते
  • पीपीएफ अकाऊंटवर लोन घेण्याचीही सुविधा आहे.

मुंबई: अनेकदा लोक गुंतवणूक(Investment) करताना विचार करतात की कुठे आणि किती गुंतवावे? रिटर्न(return) कसे मिळणार. ही गुंतवणूक किती सुरक्षित आणि भविष्यात किती सरलतेने रिटर्न देईल. आम्ही तुम्हाला अशा एका गुंतवणुकीबद्दल सांगत आहोत जी साधी आणि सुरक्षित आहे. 

या गुंतवणुकीचे अनेक फायदे आहेत. तु्म्ही जर  PPF (पब्लिक प्रोव्हिडंट फंड) मध्ये गुंतवणूक करत आहात तर काही काळानंतर तुम्हाला चांगले रिटर्न मिळू लागतात. हे पैसे तुमच्या मुलांचे शिक्षण अथवा मुलीच्या लग्नाच्या खर्चासाठी मदत करू शकतात. तुम्ही हा पैसा घरातील आणखी काही मोठ्या खर्चासाठी वापरू शकता. 

या गुंतवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे पीपीएफ खात्यात वार्षिक १.५ लाख रूपयांच्या गुंतवणुकीलर सेक्स ८०सी अंतर्गत टॅक्समध्ये सूट मिळते. सोबतच यावर मिळणाऱ्या व्याजावर कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही. याशिवाय याच्या मॅच्युरिटीच्या वेळेस मिळणारी रक्कमही टॅक्सच्या कक्षेच्या बाहेर आहे.

जाणून घ्या कसे खोलावे PPF अकाउंट:

पीपीएफ अकाऊंट तुम्ही कोणत्याही बँक अथवा ऑनलाईन अथवा ऑफलाईन उघडू शकता. पोस्टातही हे खाते उघडता येते. यासाठी १५ वर्षांचा कमीत कमी लॉकिंग कालावधी आहे. तुम्ही हे पुढे ५-५ वर्षांसाठीही वाढवू शकता. यासाठी कमीत कमी ५०० रूपये आणि जास्तीत जास्त १.५ लाख रूपये जमा करता येतात.यात एका वर्षात कमीत कमी एक वेळा आणिअधिकाधिक १२ वेळा पैसे जमा केले जाऊ शकतातत. 

पैसे जमा करणे न जमले तर

जर पीपीएफ अकाऊंटमध्ये पैसे जमा करता आले नाही तर यासाठी छोट्या रकमेची म्हणजेच ५० रूपयांची पेनल्टी लागते. यानंतर पैसे जमा करून पुन्हा अकाऊंट सुरू केले जाऊ शकते. तुम्हाला दोन वर्षे पैसे भरता आले नाही. दोन वर्षानंतर अकाऊंट रि अॅक्टिव्हेट केले तर तेव्हापासून १५ वर्षांचे काऊंटिंग सुरू केले जाते. 

पीपीएफ अकाऊंटवर मिळवू शकता लोन

पीपीएफ अकाऊंटवर लोन घेण्याचीही सुविधा आहे. यात तुम्ही कोणालाही नॉमिनी ठेवू शकता. हे अकाऊंट पोस्टातून बँकेत अथवा बँकेतून पोस्टातही ट्रान्सफर करता येते. या अकाऊंटचा आणखी एक फायदा म्हणजे तुम्हाला गरज असल्यास तुम्ही मध्येच पैसेही काढू शकता. मात्र यात टर्म अँड कंडीशन्स वेगळ्या आहेत. 

असे मिळते व्याज आणि मॅच्युरिटीची रक्कम

असे समजा की तुम्ही दर महिन्याला पीपीएफ अकाऊंटमध्ये एक हजार रूपये गुंतवत आहात. म्हणजेच वर्षाला १२ हजार रूपये झाले. १५ वर्षात तुमची एकूण गुंतवणूक १.८० लाख रूपये होते. या गुंतवणुकीवर तुम्हाला १.४५ लाखांचे व्याज मिळेल. म्हणजेच १५ वर्षानंतर तुम्हाला सव्वा तीन लाख रूपये मिळतील. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी