Multibagger stock | या शेअरने फक्त ३ महिन्यात केले १ लाखाचे २७ लाख

Multibagger stock | काही मल्टीबॅगर शेअरमध्ये गुंतवणूक केलेल्यांना मोठी कमाई करण्याची संधी मिळाली आहे. मागील फक्त एक ते दीड वर्षाच्या कालावधीतच गुंतवणुकदारांचा पैसा कित्येक पटींनी वाढला आहे. काही छुप्या रुस्तम शेअर्सनी गुंतवणुकदारांना प्रचंड नफा कमावून दिला आहे. एका रिअॅल्टी क्षेत्रातील कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. हा शेअर आहे राधे डेव्हलपर्स या कंपनीचा.

Multibagger Stock
मल्टीबॅगर शेअर 
थोडं पण कामाचं
  • या शेअरने गुंतवणुकदारांना करून दिली अभूतपूर्व कमाई
  • राधे डेव्हलपर्सच्या शेअरचा २६११ टक्क्यांचा परतावा
  • या शेअरमध्ये गुंतवलेल्या १ लाखाचे मूल्य आज २७ लाख रुपये

Multibagger stock | मुंबई: शेअर बाजाराच्या (Share Market)घोडदौडीमुळे यावर्षी अनेक शेअर्स मल्टीबॅगर ठरले आहेत. काही कंपन्यांना मागील काही कालावधीत चांगलेच सुगीचे दिवस आले आहेत. छोट्या छोट्या शेअर्सनीदेखील तडाखेबंद कमाई केली आहे. काही मल्टीबॅगर शेअरमध्ये गुंतवणूक केलेल्यांना मोठी कमाई करण्याची संधी मिळाली आहे. मागील फक्त एक ते दीड वर्षाच्या कालावधीतच गुंतवणुकदारांचा पैसा कित्येक पटींनी वाढला आहे. काही छुप्या रुस्तम शेअर्सनी गुंतवणुकदारांना प्रचंड नफा कमावून दिला आहे. एका रिअॅल्टी क्षेत्रातील कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. हा शेअर आहे राधे डेव्हलपर्स (Radhe Developers (India) Ltd)या कंपनीचा. राधे डेव्हलपर्स च्या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना बंपर कमाई करता आली आहे. हा शेअर सध्या ३४२.२० रुपये प्रति शेअरच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. (Share Market: Investment of Rs 1 Lakh in Radhe Developers (India) Ltd turned to Rs 27 Lakhs in 3 Months)

राधे डेव्हलपर्सचा २६११ टक्क्यांचा परतावा 

सध्या राधे डेव्हलपर्सचा शेअर ३४२.२० रुपयांच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. तीन महिन्यांपूर्वी म्हणजे १३ ऑगस्ट २०११ला राधे डेव्हलपर्सच्या शेअरची किंमत १२.६२ रुपये प्रति शेअर इतकी होती. इतक्या कमी किंमतीत मिळणाऱ्या या शेअरने तीनच महिन्यात जवळपास २६११ टक्क्यांचा छप्परफाड परतावा गुंतवणुकदारांना दिला आहे. या कालावधीत गुंतवणुकदारांचे पैसे कित्येक पटींनी वाढले आहेत.

एक लाखाच्या गुंतवणुकीचे २७ लाख रुपये

राधे डेव्हलपर्सच्या शेअरच्या किंमतीत ३ महिन्यांच्या कालावधीत जवळपास २७ पट वाढ झाली आहे. ३ महिन्यांपूर्वी या शेअरमध्ये गुंतवलेल्या १ लाखाचे मूल्य आज २७ लाख रुपये झाले आहे. या मल्टीबॅगर शेअरने सर्वसामान्य गुंतवणुकदारांना छोट्याशा गुंतवणुकीद्वारे मोठी संपत्ती उभी करून दिली आहे. कंपनीची स्थापना १९९५ मध्ये झाली होती. 

शेअर बाजाराची वाटचाल

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेला सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये सध्या घसरण दिसून येते आहे. मात्र तरीही शेअर बाजार विक्रमी पातळीवरच आहे. या वर्षभरात शेअर बाजाराने सध्या अभूतपूर्व तेजी दाखवली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी उच्चांकी पातळी नोंदवली आहे. यामुळे अनेक नवीन सर्वसामान्य गुंतवणुकदार शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे आकर्षित झाले आहेत. मागील दीड वर्षात अनेक छोटे गुंतवणुकदार शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे आकर्षित झाले आहेत. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. अर्थात शेअर बाजारात सावधपणे पावले उचलणेच योग्य ठरते. शेअर बाजारात संयमानेच पैसा कमावता येतो.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.) 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी