Investment: अवघ्या ३ हजार रुपयांना पाहा कसं बनवाल ११ कोटींचा फंड!

काम-धंदा
Updated Jun 15, 2019 | 20:27 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

Mutual Fund: पैशांची बचत करणं हे सर्वच व्यक्तींसाठी खूप आवश्यक असतं. त्याशिवाय आपण भविष्यातील आपल्या गरजा पूर्ण करू शकत नाही. जाणून घ्या बचतीचा एक अनोखा मार्ग...

Investment
अशी करा आपली गुंतवणूक, मिळवा चांगले रिटर्न्स  |  फोटो सौजन्य: Getty Images

मुंबई: आपल्याला जर सांगितलं ३ हजार रुपयांचे ११ कोटी रुपये करून दाखवतो. तर आपला विश्वास बसणार नाही. पण आजच्या घडीला ते शक्य आहे. मात्र असं करण्यासाठी आपल्याला अगदी अनुशासित पद्धतीनं एक योजना बनवावी लागेल. त्यानुसार रक्कम इन्व्हेस्ट करावी लागेल, रिस्क घ्यावी लागेल आणि मोठ्या काळासाठी रक्कम इन्व्हेस्ट करणं यात गरजेचं आहे. मात्र जर आपण असं केलं तर वरील रक्कम आपण मिळवू शकता.

यासाठी आपल्या खूप मोठ्या प्रमाणात पैसा इन्व्हेस्ट करणं गरजेचं नाही. आपल्या सुरूवातीच्या करिअरच्या वर्षामध्ये आपण लहान-लहान इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि हळुहळू ही इन्व्हेस्टमेंट वाढवत जायचं. इथं आपण ३००० हजार रुपयांपासून सुरू करून ११ कोटींचा फंड कसा जमवू शकतो, ते पाहा.

लहान वय, लहान सुरूवात

आपण आपल्या करिअरच्या सुरूवातीपासून इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता. आपल्या आयुष्यातील या काळामध्ये मिळकत आणि बचत साहजिकच कमी असेल. त्यामुळे इन्व्हेस्ट करणारी रक्कमही लहानच असेल. आपल्या क्षमतेनुसारच जितक्या लवकर सुरू करता येईल, तितक्या लवकर इन्व्हेस्टमेंट सुरू करावी.

कम्पाऊंडेड ग्रोथ आपली रक्कम वाढविण्याची सर्वात चांगली पद्धत आहे. जितका अधिक काळ आपण इन्व्हेस्टमेंटला द्याल, तितका जास्त फायदा आपल्याला मिळेल. उदाहरणार्थ. जर आपण २५ वर्षाचे असाल तर वयाच्या ६० वर्षांचे होतांना तुम्हाला कामातून निवृत्ती घ्यायची असेल तर आपल्याला तब्बल ३५ वर्ष इन्व्हेस्टमेंटसाठी मिळतात. आपण अवघ्या ३ हजार रुपये दर महिना इथपासून गुंतवणूकीला सुरूवात करावी.

‘इक्टिटी म्युच्युअल फंड’ या आयपीमध्ये गुंतवणूक करा

‘इक्विटी म्यूचुअल फंड’ लहान-लहान गुंतवणूकदारांसाठी खूप चांगला पर्याय आहे. आपण कोणत्याही प्रतिष्ठित ‘इक्विटी म्यूचुअल फंड’मध्ये एक सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान म्हणजेच SIP सुरू करू शकता. यात आपण एक किंवा जास्त फंडची निवड करू शकता. ज्या फंडमध्ये इन्व्हेंस्टमेंट करायचीय यासाठी आपण एखाद्या योग्य तज्ज्ञाकडून मार्गदर्शन घ्यावं किंवा इंटरनेटवर रिसर्च करून ते ठरवावं.

अधिक काळासाठी इक्विटी गुंतवणूक आपल्याला फिक्स्ड डिपॉझिट (FD) किंवा पीपीएफ (PPF) सारख्या योजनांद्वारे चांगले रिर्टन्स मिळू शकतात. मात्र इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्यातील रिस्क फॅक्टरही आपण समजून घेतलं पाहिजे. इक्विटीवर शेअर मार्केटच्या चढ-उताराचा परिणाम होतो. त्यासाठी अधिक वर्षांची गुंतवणूक काळ आपल्याकडे हवा. इक्विटी घेण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी आपण किती जोखीम घेऊ शकतो, ही आपली क्षमता ओळखून ठेवली पाहिजे.

इन्व्हेस्टमेंट वाढवत जावी

आपण दरवर्षी आपली इन्व्हेस्टमेंट वाढवत जात आपलं लक्ष्य साध्य करण्यासाठी जोमानं पुढे सरकत जावं. जसजशी आपली मिळकत सॅलरी वाढते, तसतशी आपण आपली गुंतवणूक करण्याची क्षमता सुद्धा वाढवावी. उदाहरणार्थ आपण २५ व्या वर्षी गुंतवणूक सुरू केली तर ती वयाच्या ४० वर्षांपर्यंत जास्त होणार नाही. तेव्हा आपल्याला त्या वय आणि पगारानुसार आपली गुंतवणूक वाढवावी लागेल.

म्हणून दरवर्षी १५ टक्क्यांनी आपली इन्व्हेस्टमेंट वाढवावी. याचा अर्थ असा की आपल्या योजनेत जर पहिल्या वर्षी ३ हजार रुपये प्रत्येक महिन्याला आपण गुंतवणूक केली असेल, तर दुसऱ्या वर्षी १५% अधिक म्हणजे रक्कम ३४५० करावी आणि तिसऱ्या वर्षी ३९६८. अशाप्रकारे दरवर्षी आपली महिन्याची गुंतवणूक वाढवत जावी.

आपल्याला रिटर्न्स किती मिळतात?

एक गोष्ट लक्षात ठेवा इक्विटीमध्ये आपल्याला रिटर्नची कधीच गॅरंटी नसते. याशिवाय खूप वर्ष केलेली गुंतवणूक की त्यावेळेच्या बाजारातील चढ-उतारानुसार खाली किंवा वर होऊ शकते. इतक्या मोठ्या काळात तसं पाहिलं गेलं तर इक्विटी मार्केटमध्ये डबल डिजिट रिर्टन्स देण्याची क्षमता असते. जाणून घ्या रिटर्न्सचे काही परिणाम. जर आपण ३ हजार रुपये दर महिन्याला इन्व्हेस्ट करता तर १२ टक्के आपल्याला रिटर्न मिळेल तर ३५ वर्षांमध्ये आपला फंड ११ कोटी रुपये होईल. पाहा तो कसा...

investment

आणि अशाप्रकारे लहान गुंतवणूक करत आपण मोठ्या काळासाठी इन्व्हेस्टमेंट करून एक मोठी रक्कम जमा करू शकतो.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Investment: अवघ्या ३ हजार रुपयांना पाहा कसं बनवाल ११ कोटींचा फंड! Description: Mutual Fund: पैशांची बचत करणं हे सर्वच व्यक्तींसाठी खूप आवश्यक असतं. त्याशिवाय आपण भविष्यातील आपल्या गरजा पूर्ण करू शकत नाही. जाणून घ्या बचतीचा एक अनोखा मार्ग...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola