Investment Tips | यशस्वीरित्या गुंतवणूक कशी करायची, जाणून घ्या ही ५ सूत्रे

Investment Tips | संपत्ती निर्मितीची प्रक्रिया ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. आपण केलेल्या गुंतवणूकीतून मोठी रक्कम उभी राहण्यास काही कालावधी लागतो. त्यासाठी संयम ठेवण्याची आवश्यकता असते.

Investment Tips
गुंतवणुकीची सूत्रे 
थोडं पण कामाचं
  • श्रीमंत एका दिवसात होता येत नाही
  • गुंतवणुकीतील सातत्य राखा
  • छोटी पण नियमित गुंतवणूक करा

Investment Tips | मुंबई: आर्थिक सुबत्ता आयुष्यातअ श्रीमंत होणे हे प्रत्येकाच स्वप्न असते. त्यासाठी सर्वजण आयुष्यभर कष्ट करत असतात. मात्र संपत्ती निर्मितीची प्रक्रिया ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. आपण केलेल्या गुंतवणूकीतून मोठी रक्कम उभी राहण्यास काही कालावधी लागतो. त्यासाठी संयम ठेवण्याची आवश्यकता असते. चटकन श्रीमंत होण्याची (How to become rich) अपेक्षा ठेवू नका. त्यामुळे फायदा तर होणार नाहीच परंतु एखाद्या संकटात सापडण्याचीच शक्यता अधिक असते. संपत्ती निर्मितीसाठी योग्य पद्धतीने गुंतवणूक करणे सर्वात महत्त्वाचे असते. योग्य पद्धतीने गुंतवणूक करत श्रीमंत होण्यासाठीची ५ सूत्रे लक्षात घेऊया. (Investment Tips: Top 5 tips for Successful investment)

१. छोटी पण नियमित गुंतवणूक

म्युच्युअल फंडातील एसआयपी हा गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय आहे. यातून दरमहा छोट्याशा गुंतवणुकीने मोठी रक्कम जमा करता येते. एसआयपीसारख्या चक्रवाढ व्याजाचा लाभ देणाऱ्या गुंतवणूक प्रकारात गुंतवणूक केल्यास मोठी रक्कम उभी राहते. 

२. एका रात्रीत श्रीमंत होता येत नाही

संपत्ती किंवा मोठी रक्कम उभी करण्यास कालावधीही अधिक लागतो. त्यामुळेच जितक्या लवकर गुंतवणुकीची सुरूवात करू शकाल तितक्या लवकर करणे श्रेयस्कर ठरेल. त्यामुळे तुमच्या गुंतवणूकीवर अधिक लाभ मिळवता येईल. विशीत सुरू केलेली गुंतवणूक तिशीतील गुंतवणूकीपेक्षा अधिक संपत्ती निर्माण करते. कारण लवकर गुंतवणूक सुरू केल्यामुळे जास्त कालावधी मिळतो आणि बचतही अधिक केली जाते पर्यायाने गुंतवणूकीची रक्कमही अधिक असते. लवकर सुरू केलेल्या गुंतवणुकीची फळेदेखील लवकर चाखता येतात.

३. गुंतवणुकीत हवे सातत्य

सातत्यबद्धपणे गुंतवणूक करत राहणे हा गुंतवणुकीसाठीचा महत्त्वाचा नियम आहे. नियमितपणे गुंतवणूक करणे हा गुंतवणुकीचा पाया आहे. शिस्तबद्धपणे वर्षानुवर्षे केलेली नियमित गुंतवणूक तुमचे संपत्ती निर्मितीचे स्वप्न पूर्ण करते. नियमितपणे गुंतवणूक केल्यास थोड्या रकमेच्या गुंतवणुकीचा लाभही मोठा असतो. थोडक्‍यात लहान रक्कम दीर्घ काळ नियमितपणे गुंतवल्यास फायदा निश्‍चितपणे होता. छोट्या रकमेतूनही मोठी रक्कम उभारता येते.

४. नियोजनपूर्वक गुंतवणूक

पोर्टफोलिओ म्हणजे विविध गुंतवणूक प्रकारात तुम्ही केलेली गुंतवणूक. गुंतवणुकीचे नियोजन करण्यासाठी पोर्टफोलिओ विचारपूर्वक तयार केला पाहिजे. गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ तयार करताना आपले वय, उत्पन्न , जोखीम क्षमता, गुंतवणुकीचा कालावधी लक्षात घ्या. निश्चित उत्पन्न योजना उदा. बॅंक एफडी किंवा एनसीडी, पोस्टाच्या योजना, सोने, म्युच्युअल फंड, शेअर, रिअल इस्टेट हे सर्वसामान्यांसाठी उपलब्ध गुंतवणुकीचे पर्याय आहेत. यासाठी करबचतीचे नियोजनही करायला हवे. आपल्या आर्थिक उद्दिष्टांनुसार आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारांमधील गुंतवणूकीचे प्रमाण ठरवावे. मात्र विविध गुंतवणूक प्रकारात गुंतवणूक करावी. वैविध्यपूर्ण गुंतवणुकीमुळे जोखीम कमी होते.

५. जोखीम घेण्याचे महत्त्व

इक्विटीसारख्या जोखीमयुक्त प्रकारात गुंतवणूक करण्यास तरुण वयात मागे हटता कामा नये. तरुण वयात जोखीम क्षमता अधिक असते त्यामुळे इक्विटी प्रकारात अधिक गुंतवणूक करावी. कारण त्यात परतावाही अधिक असतो. तर वय वाढल्यावर जोखीम क्षमता कमी होते, त्यामुळे सुरक्षित आणि तुलनेने कमी परतावा योजनांवर भर द्यावा.  हे सर्व करताना आपण लक्षात ठेवले पाहिजे की आर्थिक संपन्नतेसाठी गुंतवणूक आवश्यक आहे. म्हणूनच गुंतवणूक करणे जोखमीचे (जास्त परतावा देणारे पर्याय) तर असतेच परंतु गुंतवणूकच न करणे हे जास्त जोखमीचे असते. अर्थात इथे जोखीम घेणे याचा अर्थ जास्त चढ उतार असलेल्या गुंतवणूक प्रकारासंदर्भात आहे. जोखीम घेणे म्हणजे सट्टा लावणे असे अजिबात नाही.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी