Race for IPL media rights :आयपीएलच्या मीडिया हक्कांसाठी स्पर्धा झाली तीव्र...6 खेळाडू रिंगणात

IPL Streaming : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या मीडिया हक्कांसाठीच्या बोलीमध्ये सहा खेळाडूंचा म्हणजे सहा कंपन्यांचा सहभाग होण्याची शक्यता आहे. इकॉनॉमिक टाईम्सनुसार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) हक्कधारक डिस्नेस्टार तसेच Sony Pictures Networks India (SPN), Zee Entertainment Enterprises (ZEE) आणि Viacom18 कडून भारताच्या हक्कांसाठी तांत्रिक बोली प्राप्त झाली. बाकीच्यांसाठी Times Internet आणि FunAsia यांची बोली उर्वरित जगासाठी (टीव्ही आणि डिजिटल)असणार आहे.

Race for IPL media rights
आयपीएल मीडिया हक्कांसाठी शर्यत 
थोडं पण कामाचं
  • आयपीएलच्या मीडिया हक्कांसाठी दिग्गज कंपन्या स्पर्धेत
  • क्रिकेट प्रक्षेपणासाठी जोरदार शर्यत
  • 12 जून रोजी आयपीएलच्या मीडिया हक्कांसाठी ई-लिलाव

IPL media rights : मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या मीडिया हक्कांसाठीच्या बोलीमध्ये सहा खेळाडूंचा म्हणजे सहा कंपन्यांचा सहभाग होण्याची शक्यता आहे. इकॉनॉमिक टाईम्सनुसार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) हक्कधारक डिस्नेस्टार तसेच Sony Pictures Networks India (SPN), Zee Entertainment Enterprises (ZEE) आणि Viacom18 कडून भारताच्या हक्कांसाठी तांत्रिक बोली प्राप्त झाली. बाकीच्यांसाठी Times Internet आणि FunAsia यांची बोली उर्वरित जगासाठी (टीव्ही आणि डिजिटल)असणार आहे. पुढील पाच वर्षांसाठी, म्हणजे 2023-2027 या कालावधीसाठी, 12 जून रोजी पैशांचा पाऊस पाडणाऱ्या आयपीएलच्या मीडिया हक्कांसाठी ई-कॉशन होणार आहे. आघाडीच्या अमेरिकन कंपन्या Amazon आणि Google यांनी निविदा दस्तऐवज उचलताना सुरुवातीला स्वारस्य दाखवल्यानंतर तांत्रिक बोली सबमिट न करून लिलावापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. (IPL media rights race may have 6 players in bidding)

अधिक वाचा : IPL Media Rights : अॅमेझॉनची आयपीएल मीडिया हक्कांच्या शर्यतीतून माघार...अंबानींच्या रिलायन्सचा मार्ग सोपा

कोण कोण लावणार बोली

पहिल्या तीन पॅकेजमध्ये चार बोलीदारांनी स्वारस्य दाखवले: इंडिया टीव्ही (पॅकेज ए), इंडिया डिजिटल (पॅकेज बी) आणि नॉन-एक्सक्लुझिव्ह, इंडिया डिजिटल (पॅकेज सी) तर टाईम्स इंटरनेट आणि फनएशिया यांनी उर्वरित जागतिक पॅकेजसाठी (पॅकेज डी) बोली लावली. एका अनामिक स्पोर्ट्स मार्केटिंग एक्झिक्युटिव्हचा हवाला देत अहवालात ज्यांना बोलीच्या तपशीलांची माहिती होती, असे म्हटले आहे की, उच्च राखीव किंमत आणि डिजिटलसाठी अनन्य डिजिटल अधिकारांमुळे Amazon आणि Google सारख्या काही टेक डोमेन बोलीदारांना त्रास झाला.

अधिक वाचा : Bank Privatization: या सरकारी बँकेचे जुलैमध्ये होणार खासगीकरण! तयारी सुरू झाली...तुमचे खातेही आहे का या बॅंकेत?

स्पर्धकांना सर्व हक्कांसाठी बोली लावण्याची परवानगी नाही, तथापि, पहिल्या पॅकेजचा विजेता दुसऱ्या पॅकेजच्या यशस्वी बोली लावणाऱ्याला हक्कांसाठी आव्हान देऊ शकतो, दुसऱ्या पॅकेजचा अंतिम विजेता नंतर पॅकेजच्या विजेत्याला आव्हान देऊ शकतो.

अॅमेझॉन शर्यतीतून बाहेर

आयपीएलच्या मीडिया हक्कांसंदर्भात अॅमेझॉन आणि रिलायन्समधील स्पर्धेची मोठी चर्चा सुरू होती. मात्र आता या चर्चेला विराम मिळाला आहे. कारण अॅमेझॉनने आयपीएलच्या मीडिया हक्कांच्या स्पर्धेतून माघार घेतली आहे. असे म्हटले जाते की क्रिकेट स्ट्रीमिंग (Cricket Streaming)सुरू करेपर्यंत तुम्ही भारतात ओटीटीची (OTT)शर्यत जिंकू शकत नाही. लाइव्ह क्रिकेट हे भारताच्या व्हिडिओ-स्ट्रीमिंग उद्योगातील "सोनेरी कोंबडी" बनले आहे. त्यामुळे, लिलावाच्या अवघ्या दोन दिवस आधी (12 जून रोजी) 2023-27 साठी आयपीएलच्या मीडिया हक्कांच्या (IPL Media Rights) विक्रीचा समावेश असलेल्या बोली स्पर्धेतून अॅमेझॉनची (Amazon)माघार हे आश्चर्यकारक आहे. मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries), डिस्ने+ हॉटस्टार (Disney+ Hotstar)आणि सोनी पिक्चर्स नेटवर्कचा (Sony Pictures Network) समावेश असलेल्या तिरंगी  लढाईसाठी आता आयपीएलच्या हक्कांचे क्षेत्र खुले झाले आहे.

अधिक वाचा : Traffic Challan: सावध रहा! या वाहनांना ओव्हरटेक करण्याचा मार्ग न दिल्यास कापले जाणार 10,000 रुपयांचे चलान...

2017 मध्ये, इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL)पाच वर्षांच्या टीव्ही आणि डिजिटल अधिकारांसाठी STAR ने तुफानी बोली(तब्बल 16,347 कोटी रुपये) लावत मीडिया जगताला थक्क केले. STAR ने Facebook च्या बोली प्रस्तावालादेखील मागे टाकले होते. त्यावेळेस फेसबुकने सर्वाधिक डिजिटल-केवळ 3,900 कोटी रुपयांची बोली लावली होती. तर सोनी, एअरटेल आणि अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ - ज्यांच्या बोली जाहीर केल्या गेल्या नाहीत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी