IEC 2022 | ओयोचे संस्थापक रितेश अग्रवाल यांनी शेअर केले कोरोना काळातील तीन मोठे धडे

Ritesh Agarwal on changing aspirations : आघाडीची ट्रॅव्हल टेक कंपनी असलेल्या ओयोचे संस्थापक आणि सीईओ रितेश अग्रवाल (Oyo CEO Ritesh Agarwal)नेहमीच चर्चेत असतात. एक यशस्वी तरुण उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. लवकरच आयपीओ आणण्यासाठी सज्ज असलेल्या ओयोच्या उभारणीची कथा त्यांनी सांगितली आहे. रितेश अगरवाल हे टाइम्स समूहाच्या प्रतिष्ठित 'इंडिया इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह' (India Economic Conclave 2022) या कार्यक्रमात बोलत होते.

Ritesh Agarwal at India Economic Conclave
इंडिया इकॉनॉमिक कॉन्क्लेव्हमध्ये ओयोचे रितेश अगरवाल 
थोडं पण कामाचं
  • एक यशस्वी तरुण उद्योजक म्हणून रितेश अगरवाल यांची ओळख
  • कोरोना महामारीतून शिकण्यास मिळालेल्या गोष्टींचाही रितेश अगरवाल यांनी उल्लेख केला
  • इंडिया इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह मध्ये सहभागी झालेल्या रितेश अगरवाल यांनी बदललेल्या संधीबाबत मत व्यक्त केले

Ritesh Agarwal at India Economic Conclave 2022 : मुंबई : आघाडीची ट्रॅव्हल टेक कंपनी असलेल्या ओयोचे संस्थापक आणि सीईओ रितेश अग्रवाल (Oyo CEO Ritesh Agarwal)नेहमीच चर्चेत असतात. एक यशस्वी तरुण उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. लवकरच आयपीओ आणण्यासाठी सज्ज असलेल्या ओयोच्या उभारणीची कथा त्यांनी सांगितली आहे. रितेश अगरवाल हे  टाइम्स समूहाच्या प्रतिष्ठित 'इंडिया इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह' (India Economic Conclave 2022) या कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमात अर्थव्यवस्था आणि त्याच्याशी निगडीत धोरणांसंदर्भात दिग्गज, आघाडीचे उद्योगपती यांचा सहभाग असणार आहे. कोरोना महामारीतून शिकण्यास मिळालेल्या गोष्टींचाही रितेश अगरवाल यांनी या कार्यक्रमात उल्लेख केला. ओयो आपल्या बंपर आयपीओसाठी सज्ज झाली आहे. (IPO bound Oyo founder Ritesh Agarwal shared 3 lessons he learned from Corona pandemic) 

अधिक वाचा : IEC 2022 | कोरोनाचा बूस्टर डोस आवश्यक, नियामक संस्थांनी मंजूरी देताना आधीसारखीच तत्परताच दाखवावी : अदर पूनावाला

इंटरनेटमुळे बदलल्या आकांक्षा

टाइम्स नेटवर्कच्या इंडिया इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह 2022 मध्ये ह्युमन्स ऑफ बॉम्बेच्या संस्थापक आणि सीईओ करिश्मा मेहता यांच्याशी बोलताना रितेश अग्रवाल म्हणाले की, ओयोची कथा ही 3 गोष्टींचे संयोजन आहे – स्वप्ने, एक्सपोजर आणि इकोसिस्टम. “इंटरनेटने मर्यादांशिवाय मोठ्या आकांक्षांचा विचार करण्याची आमची क्षमता बदलली आहे. आम्ही राहत असलेल्या नवीन भारतात, इंटरनेटचा वापर लोकांच्या आकांक्षा संरचनात्मकपणे बदलतात. कारण तुम्ही जगाच्या दुसर्‍या भागात दुसऱ्या उद्योजकाबद्दल वाचता.,” असे रितेश अगरवाला पुढे म्हणाले. या तरुण उद्योजकाने असेही सांगितले की ते एकेकाळी एअरटेलसाठी सिम कार्ड विकत असतत. अग्रवाल पुढे म्हणाले की, भारत असे ठिकाण बनले आहे जिथे सरकारी नोकऱ्या,  नोकऱ्यांच्या इतर संधींबरोबरच स्टार्टअप सुरू करण्याचीही संधी आहे.

अधिक वाचा : IEC 2022 | गौतम अदानी म्हणतात, भारत स्वावलंबी होत, जग भारतावर अवलंबून होण्यापर्यतचा पल्ला गाठणार!

कोरोना महामारीतून रितेश अगरवाल यांनी घेतलेले 3 धडे-

1- लवचिकतेची शक्ती:  तुम्ही बोगद्याच्या आत असताना सतत खोदत राहणे आवश्यक आहे कारण त्याच्या दुसऱ्या टोकाला नेहमीच प्रकाश असतो. उद्योजकासाठी हे फार महत्त्वाचे आहे.
2- एखाद्या कुटुंबाप्रमाणे काम करणाऱ्या टीमची शक्ती: माझ्या साथीदारांपैकी कोणीही मला कोरोना महामारीच्या काळात सोडले नाही.
3- भारतीय समाजांसाठी अनुरूप असलेल्या कंपन्यांची शक्ती: वंदे भारत मिशन सर्वाधिक उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांपैकी ओयो ही कंपनी होती आणि कोविड केंद्रांचे सर्वात मोठ्या विस्तारांपैकी एक होता. 

अधिक वाचा : IEC 2022 | भारत हा जागतिक कंपन्यांची पहिली पसंती, देशातील गरीबी हटवणे आणि रोजगार निर्मिती आहे महत्त्वाचे : अनिल अग्रवाल

टाइम्स समूहाच्या प्रतिष्ठित 'इंडिया इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह' (IEC 2022) या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशीही अर्थव्यवस्था आणि त्याच्याशी निगडीत धोरणांसंदर्भात दिग्गज, आघाडीचे उद्योगपती यांचा सहभाग असणार आहे. विविध क्षेत्रांमधील दिग्गज या कार्यक्रमात भारतातील संधी, वाटचाल याविषयावर आपली मते मांडणार आहेत. मुंबईत होत असलेल्या या आर्थिक विषयाशी संबंधित प्रतिष्ठित कार्यक्रमात विविध उद्योगपतींनी देशाची आगामी दिशा कशी असेल यावर भाष्य केले. या वर्षीच्या कार्यक्रमाची थीम 'द ग्रेट इंडियन डेमोक्रॅटिक डिव्हिडंड' (The Great Indian Democratic Dividend) अशी आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी