IPS Salary: आयपीएस अधिकाऱ्याचा पगार किती असतो? मिळतात या खास सुविधा...

IPS Salary: युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर रिक्त पदे आणि निवड झालेल्या उमेदवारांचे रॅंकिंग यानुसार आयपीएस अधिकाऱ्यांची निवड होते. कायदा सुव्यवस्था राखणे ही आयपीएस अधिकाऱ्यांची जबाबदारी असते.

IPS Officer Salary
आयपीएस अधिकाऱ्याचा पगार 

थोडं पण कामाचं

 • कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आयपीएस अधिकाऱ्यांवर असते
 • आयपीएस अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळते
 • वेतनशिवाय आयपीएस अधिकाऱ्यांना इतर अनेक सुविधादेखील मिळतात

नवी दिल्ली: देशात दरवर्षी लाखो विद्यार्थी, उमेदवार केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC)परीक्षा देतात. त्यातील फक्त काही हजार किंवा काहीशे उमेदवारांनाच यश मिळते. युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर रिक्त पदे आणि निवड झालेल्या उमेदवारांचे रॅंकिंग यानुसार इंडियन पोलिस सर्व्हिस म्हणजेच आयपीएस (IPS)अधिकाऱ्यांची निवड होते. पोलिस दलात असल्यामुळे कायदा सुव्यवस्था राखणे ही आयपीएस अधिकाऱ्यांची जबाबदारी असते. त्यामुळे अर्थातच त्यांच्यावर प्रचंड जबाबदारी आणि ताणदेखील असतो. आयपीएस अधिकाऱ्यांबद्दल समाजात प्रचंड कुतुहल आणि आकर्षणदेखील असते. आयपीएस अधिकाऱ्यांचे वेतन (IPS Officer Salary) आणि त्यांना असणाऱ्या सुविधा जाणून घेऊया. (What is the salary of IPS officer? what the other facilities they get)

आयपीएस अधिकाऱ्याचे करियर

इंडियन पोलिस सर्व्हिस अंतर्गत (IPS)निवड झालेल्या अधिकाऱ्यांवर कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असते. आयपीएस अधिकाऱ्याला एसपी पासून कमिशनर, डीआयजी, आयजी, डीजीपी या आणि अशा वेगवेगळ्या पदांवर पदोन्नती मिळते. देशातील कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आयपीएस अधिकाऱ्यांवरच प्रामुख्याने असते. आयपीएसमध्ये निवड झालेल्या अधिकाऱ्यांना यासाठीच्या कठोर प्रशिक्षणातून जावे लागते. त्यानंतरच ते सेवेत रुजू होतात.

आयपीएस अधिकाऱ्याचा पगार

प्रसार माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार आयपीएस अधिकाऱ्याला सातव्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission)५६,१०० रुपये वेतन मिळते. याशिवाय आयपीएस अधिकाऱ्यांना महागाई भत्त्यासह इतर अनेक भत्तेदेखील दिले जातात. जेव्हा एखादा आयपीएस अधिकारी डीजीपीच्या पदावर पोचतो तेव्हा त्याला जवळपास २ लाख २५,००० रुपये दरमहा वेतन मिळते. डीजीपीच्या पदावर असणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याला सर्वाधिक वेतन मिळते.

आयपीएस अधिकाऱ्यांना कोणत्या पदावर किती वेतन मिळते?

 1. डीएसपी पदावर आयपीएस अधिकाऱ्याला ५६,१०० रुपये वेतन मिळते.
 2. एएसपी पदावर ६७,७०० रुपये वेतन मिळते
 3. एसपी पदावर ७८,८०० रुपये वेतन मिळते
 4. एसएसपी पदावर १ लाख १८,५०० रुपये वेतन मिळते
 5. डीआयजीपी पदावर १,३१,१०० रुपये वेतन मिळते
 6. आयजीपी पदावर १,४४,२०० रुपये वेतन मिळते
 7. एडीजीपी पदावर २,५,४०० रुपये वेतन मिळते
 8. डीजीपी पदावर २,२५,००० रुपये वेतन मिळते.

वेतनाशिवाय आयपीएस अधिकाऱ्याला मिळणाऱ्या सुविधा

आयपीएस अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या वेतन श्रेणीनुसार विशेष सुविधा दिल्या जातात. आयपीएस अधिकाऱ्याला गाडी आणि शासकीय निवासस्थान मिळते. अर्थातच गाडी आणि घराचा आकार हा पदाशी निगडीत असतो. याशिवाय अधिकाऱ्यांना हाऊस हेल्प, सुरक्षा रक्षक, ड्रायव्हर इत्यादीदेखील दिले जातात. आयपीएस अधिकाऱ्यांच्या पदानुसार त्यांचा वैद्यकीय खर्च, फोनबिल आणि वीजबिल यांचा खर्च भारत सरकारच करते. आयपीएस अधिकाऱ्यांना देशाबाहेर शिक्षणासाठी जाण्यासाठी शैक्षणिक रजादेखील घेता येते. याचा खर्चदेखील भारत सरकारच करते. निवृत्तीनंतर या अधिकाऱ्यांना पेन्शनदेखील मिळते.

आयपीएस ही भारत सरकार आणि राज्य सरकारांच्या प्रशासनातील अत्यंत महत्त्वाचे अधिकारी असतात. संपूर्ण देशाच्या कायदा सुव्यवस्थेची जबाबादारी या अधिकाऱ्यांवर असते. सीबीआय आणि इतर महत्त्वाच्या तपास यंत्रणांमध्येदेखील यामधूनच अधिकारी सेवा ज्येष्ठतेनुसार आणि कामगिरीनुसार निवडले जातात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी