IRCTC Trains Cancelled List, Jan 17: नवी दिल्ली : देशाच्या विविध भागांमध्ये, रेल्वेने (Indian Railway)सोमवारी अनेक गाड्या (Train) रद्द केल्या, अनेकांचे मार्ग बदलले आणि काहींचे मार्ग वळवले. देशात दररोज लाखो लोक ट्रेनने प्रवास करतात आणि अशा परिस्थितीत, जर तुम्हाला हे आधीच माहित नसेल तर रेल्वे स्टेशनवर गेल्यावर तुमचा त्रास वाढू शकतो. तुम्ही ज्या ट्रेनने प्रवास करणार होता ती आज रद्द झाली (Cancelled trains) आहे हे ऐनवेळी लक्षात आल्यास तुमची तारांबळ उडू शकते. त्यामुळे आज कोणती ट्रेन रद्द झाली आहे किंवा कोणत्या ट्रेनचे मार्ग वळवले आहेत, हे प्रवास करण्यापूर्वी ट्रेनची स्थिती तपासणे महत्त्वाचे आहे. (IRCTC cancelled the trains, check the lsi before starting your journey)
जर आपण सोमवारी (१७ जानेवारी, २०२२) रेल्वेने रद्द केलेल्या, पुनर्निर्धारित केलेल्या किंवा वळवलेल्या गाड्यांबद्दल बोललो, तर ते सहजपणे डिजिटल पद्धतीने तपासले जाऊ शकतात. तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर हे काम आणखी सोपे होते. तुम्ही ते https://enquiry.indianrail.gov.in/mntes किंवा NTES अॅप द्वारे तपासू शकता, जिथे तुम्हाला फक्त ट्रेन नंबर टाकून तुमच्याशी संबंधित ट्रेनची संपूर्ण माहिती मिळेल. याशिवाय, तुम्ही १७ जानेवारीला पूर्ण किंवा अंशतः रद्द केलेल्या गाड्यांची यादी देखील तपासू शकता आणि त्यानुसार तुमच्या प्रवासाची योजना करू शकता.
रेल्वे विभाग दररोज बदल करण्यात आलेल्या किंवा रद्द करण्यात आलेल्या गाड्यांची माहिती जाहीर करत असते. त्यामुळे तुम्ही जर रेल्वेने प्रवास करणार असाल तर रेल्वे गाड्यांची माहिती करून घ्या.