IRCTC: रेल्वेची स्पेशल ‘वैष्णोदेवी दर्शन’ टूर, अवघ्या ‘इतक्या’ रुपयांमध्ये घ्या तीन दिवसांचा आनंद

काम-धंदा
Updated Jun 10, 2019 | 13:16 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

IRCTC: भारतीय रेल्वेनं माता वैष्णोदेवी दर्शनाचं तीन दिवसांचं प्रवास पॅकेज भाविकासांठी आणलंय. या टूर अंतर्गत भाविक श्री शक्ती एक्स्प्रेसच्या थर्ड एसी क्लासमध्ये परतीचा प्रवास करू शकतील.

Vaishno Devi Darshan
आयआरसीटीसीकडून असं घ्या वैष्णोदेवीचं दर्शन  |  फोटो सौजन्य: Representative Image

नवी दिल्ली: इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) प्रवाशांना विविध सुविधा पुरवत असते. या सुविधा ई-तिकीटिंग वेबसाईट, www.irctc.co.in आणि रेल्वे काऊंटरवर नोंदणीकृत तिकीट बुकिंग कार्यालयांतर्फे पुरविण्यात येतात. वेगवेगळ्या प्रकारच्या टूर पॅकेजेस या IRCTC च्या विशेष ऑफरपैकी एक आहेत. आयआरसीटीसीनं आता श्री. माता वैष्णोदेवी रेल्वे टूर पॅकेजची घोषणा केली आहे. यासाठी माता वैष्णोदेवी, कटरा स्टेशनला थेट गाड्यांचा समावेश केला आहे. त्यामुळे आता भाविकांना दिल्लीतून रेल्वेमध्ये बसून थेट कटाराला पोहोचता येणार आहे.

आयआरसीटीसीकडून माता वैष्णोदेवी दर्शनासाठी तीन दिवसीय टूर पॅकेज सुरू करण्यात आलंय. या पॅकेज अंतर्गत भाविकांना परतीचा प्रवास श्री. शक्ती एक्स्प्रेसच्या थर्ड एसी क्लासमध्ये करता येणार आहे. श्री शक्ती एक्सप्रेस ही भारतीय रेल्वे नेटवर्कमध्ये पहिली रेल्वे आहे जी नवी दिल्ली ते कटरा मार्गानं चालवली जाणार आहे.

आयआरसीटीसी माता वैष्णोदेवी रेल्वे टूर पॅकेज अवघ्या 3 हजार 365 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. पण यासाठी किमान दोन व्यक्तींचं पॅकेज बूक करणं गरजेचं आहे. आयआरसीटीसीच्या 3 हजार 365 रुपयांच्या माता वैष्णोदेवी टूर पॅकेजमध्ये थ्री टिअर एसी, कटरामध्ये आंघोळ, कपडे बदलण्याची सोय, नाश्ता, लॉकर सुविधा, कटरा रेल्वे स्टेशन जवळ राहण्याची, झोपण्याची सोय, बाणगंगाला जावून परत येण्याची सुविधा आणि वैष्णोदेवीवरून परतल्यावर दोन ते तीन तास आराम करण्याची सुविधा प्रदान करण्यात येणार आहे. आयआरसीटीसीच्या म्हणण्यानुसार, 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांसाठी झोपण्यासाठी पूर्ण जागा/आसन देण्यात येईल.

टूर दरम्यान असा असेल श्री माता वैष्णोदेवी दर्शनाचा कार्यक्रम

दिवस 1:  संध्याकाळी 05.30 वाजता नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून ट्रेन क्रमांक 22461 श्री शक्ती एक्स्प्रेसमधून प्रस्थान.

दिवस 2 (सकाळी): पहाटे 5.10 वाजता कटरा रेल्वे स्थानकावर आगमन. एसी धर्मशाळेमध्ये आंघोळ आणि कपडे बदलणे त्यानंतर गेस्ट हाऊसमध्ये न्याहारी करणे. त्यानंतर बाणगंगेला निघणं.

दिवस 2 (संध्याकाळी): दर्शनानंतर बाणगंगाहून उतरण्यास सुरूवात. संध्याकाळी गेस्ट हाऊसमध्ये परत येणे आणि एसी धर्मशाळेत आराम. रात्री 10.15 वाजता ट्रेन पकडण्यासाठी प्रस्थान. रात्री 11.05 वाजता ट्रेन क्रमांक 22462 श्री शक्ती एक्सप्रेस.

दिवस 03: सकाळी 10:45 वाजता नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर आगमन.

महत्त्वाची टीप:

‘’आयआरसीटीसी प्रवासात सांगितलेल्या स्मारक / धार्मिक स्थळ / इतर ठिकाणांच्या व्हीआयपी / प्राधान्य एंट्री / दर्शन यासाठी कोणतीही सुविधा देत नाही. कोणतंही साईट सीन / दर्शन झालं नाही तर त्याला IRCTC जबाबदार नाही. तसंच रेल्वेचं उशीरा आगमन, वाहतूक खंडित होणे, जबरदस्त गर्दी, शासनाकडून किंवा काही कारणांमुळं दर्शन / साईट सीन / भेटी पूर्ण होऊ शकत नाहीत याची सर्वस्वी जबाबदारी आपली असेल तसंच यासाठी कोणत्याही रिफंडसाठी जबाबदार नसेल. "असं आयआरसीटीसीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
IRCTC: रेल्वेची स्पेशल ‘वैष्णोदेवी दर्शन’ टूर, अवघ्या ‘इतक्या’ रुपयांमध्ये घ्या तीन दिवसांचा आनंद Description: IRCTC: भारतीय रेल्वेनं माता वैष्णोदेवी दर्शनाचं तीन दिवसांचं प्रवास पॅकेज भाविकासांठी आणलंय. या टूर अंतर्गत भाविक श्री शक्ती एक्स्प्रेसच्या थर्ड एसी क्लासमध्ये परतीचा प्रवास करू शकतील.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola