IRCTC iPay: झटपट करा ट्रेनच्या तिकीटाची बुकिंग, रद्द केल्यावर लगेच मिळेल रिफंड, जाणून घ्या रेल्वेची नवीन सुविधा

IRCTC New Facility : भारतीय रेल्वेने (Indian Railway) दररोज लाखो लोक प्रवास करतात. आता रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आत्तापर्यंत, जर रेल्वेचे तिकीट (Train Ticket) रद्द झाले असेल किंवा काही कारणास्तव रद्द करावे लागले, तर परतावा मिळण्यासाठी खूप प्रतीक्षा करावी लागत होती. पण आता ते होणार नाही. आयआरसीटीसीने (IRCTC) IRCTC-iPay नावाचा स्वतःचा पेमेंट गेटवे सुरू केला आहे.

IRCTC iPay App
आयआरसीटीसी आयपे अॅप 
थोडं पण कामाचं
 • रेल्वेने प्रवाशांसाठी सुरू केली नवी दमदार सुविधा
 • आयआरसीटीसी आयपे अॅपद्वारे (IRCTC iPay) लगेच तिकिट बुक करता येणार
 • या अॅपद्वारे तुमचे तिकिट रद्द झाल्यास रिफंडचे पैसे लगेच तुमच्या खात्यात जमा होणार

Indian Railways Update : नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने (Indian Railway) दररोज लाखो लोक प्रवास करतात. आता रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आत्तापर्यंत, जर रेल्वेचे तिकीट (Train Ticket) रद्द झाले असेल किंवा काही कारणास्तव रद्द करावे लागले, तर परतावा मिळण्यासाठी खूप प्रतीक्षा करावी लागत होती. पण आता ते होणार नाही. आयआरसीटीसीने (IRCTC) IRCTC-iPay नावाचा स्वतःचा पेमेंट गेटवे सुरू केला आहे. ही सेवा (IRCTC iPay App) आधीच कार्यरत आहे. या अंतर्गत, कोणत्याही बँकेच्या पेमेंट गेटवेवर तिकीट बुक करण्यासाठी पेमेंट केले जाते. ज्यामुळे वेळेची बचत होते आणि तिकीट रद्द होताच, त्याचा परतावा (IRCTC iPay Refund Status) त्वरित तुमच्या खात्यात जमा होतो. IRCTC iPay वरून रेल्वे तिकीट बुक करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या. (IRCTC starts IRCTC iPay App, now quickly get your refund)

अधिक वाचा : NABARD Recruitment 2022: नाबार्डमध्ये नोकरभरती, पगार 1 लाख रुपये ते 4.50 लाख रुपये प्रति महिना...अर्जाची प्रक्रिया जाणून घ्या

IRCTC iPayद्वारे ट्रेन तिकीट बुकिंग प्रक्रिया-

 1. - iPay द्वारे बुकिंगसाठी, प्रथम www.irctc.co.in वर लॉग इन करा.
 2. - आता प्रवासाशी संबंधित तपशील जसे की ठिकाण आणि तारीख भरा.
 3. - यानंतर, तुमच्या मार्गानुसार ट्रेन निवडा.
 4. - तिकीट बुक करताना, तुम्हाला पेमेंट पद्धतीमध्ये 'IRCTC iPay' चा पहिला पर्याय मिळेल.
 5. - हा पर्याय निवडा आणि 'पे अँड बुक' वर क्लिक करा.
 6. - आता पेमेंटसाठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा UPI तपशील भरा.
 7. - यानंतर तुमचे तिकीट त्वरित बुक केले जाईल, ज्याचे कन्फर्मेशन तुम्हाला एसएमएस आणि ईमेलद्वारे मिळेल.
 8. - यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भविष्यात तुम्ही पुन्हा तिकीट बुक केल्यावर तुम्हाला पेमेंट तपशील पुन्हा भरावा लागणार नाही. तुम्ही लगेच पैसे देऊन तिकीट बुक करू शकाल.

अधिक वाचा : Gold-Silver Rate Today, 17 June 2022: जून महिना सुगीचा! सोन्यातील घसरण सुरूच, चांदीही उतरली, पाहा काय आहे भाव...

झटपट रिफंडचे पैसे मिळवा

पूर्वी तिकीट रद्द झाल्यावर परतावा मिळण्यास बराच वेळ लागायचा. मात्र आता हे पैसे लगेच खात्यात जाणार आहेत. IRCTC अंतर्गत, वापरकर्त्याला त्याच्या UPI बँक खात्यासाठी किंवा डेबिटसाठी फक्त एक आदेश द्यावा लागेल, त्यानंतर पेमेंट इन्स्ट्रुमेंट पुढील व्यवहारांसाठी अधिकृत केले जाईल. अशा परिस्थितीत तिकीट काढण्यासाठी लागणारा वेळही कमी असेल.

अधिक वाचा : IRCTC's new luggage rule: भारतीय रेल्वेने सामानावर घातली मर्यादा, पाहा मार्गदर्शक तत्त्वे आणि बुकिंग कसे करायचे...

तिकिटे त्वरित बुक होणार

IRCTC अधिकार्‍यांनी सांगितले की, आधी कंपनीकडे स्वतःचे पेमेंट गेटवे नव्हते, नंतर दुसरा पेमेंट गेटवे (IRCTC iPay Means) वापरावा लागला. त्यामुळे बुकिंगला बराच वेळ लागला. आणि जर पैसे कापले गेले तर खात्यात परत यायला जास्त वेळ लागला. पण आता ते होणार नाही. आयआयसीटीसीच्या पेमेंट गेटवेवरील पहिल्या प्रश्नावर अधिकारी म्हणतात की ते पूर्णपणे सुरक्षित आहे.

प्रतीक्षा तिकिटांवरही लगेच मिळणार पैसे

अनेक वेळा तुम्ही तिकीट काढता पण तुमचे तिकीट वेटिंगमध्ये येते (IRCTC iPay Features) आणि अंतिम चार्ट तयार झाल्यानंतर आपोआप तुमचे तिकीट रद्द होते. अशा परिस्थितीत आता या स्थितीतही तुम्हाला तुमचा परतावा त्वरित मिळेल.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी