IRCTC New Rule: रेल्वेची नवी भन्नाट सुविधा, आता कन्फर्म तिकिट दुसऱ्या व्यक्तीला ट्रान्सफर करता येणार...पाहा कसे

Indian Railway Rule : देशातील लाखो प्रवासी रोज रेल्वेनेच प्रवास करण्यास प्राधान्य देतात. अनेकांना लांब पल्ल्यांच्या प्रवासासाठी रेल्वेच सोयीचे ठरते. त्यामुळे रेल्वेचे आरक्षण मिळण्यासाठी नेहमीच गर्दी असते. रेल्वेचे आरक्षण किंवा कन्फर्म तिकिट मिळणे ही अवघड गोष्ट असते. त्यामुळे मग कित्येक दिवस आधीपासूनच तिकिट बुक करू ठेवावे लागते. दुर्दैवाने काही वेळा कन्फर्म तिकिट असूनही काही कारणामुळे प्रवास रद्द करण्याची वेळ येते. त्यावर रेल्वेने नवी सुविधा आणली आहे.

IRCTC New Rule
आयआरसीटीसीचा नवा नियम 
थोडं पण कामाचं
 • रेल्वेचे कन्फर्म तिकिट मिळण्यासाठी कित्येक दिवस आधीच तिकिट बुक करावे लागते
 • काहीवेळा प्रवास रद्द करण्याची वेळ आल्यास कन्फर्म तिकिट वाया जाते
 • आता रेल्वेच्या नव्या सुविधेनुसार तुमचे कन्फर्म तिकिट दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित करता येणार

IRCTC Latest Update:नवी दिल्ली : रेल्वेचे कन्फर्म तिकिट मिळणे ही एक महत्त्वाची बाब असते. आजही देशातील लाखो प्रवासी रोज रेल्वेनेच (Indian Railway) प्रवास करण्यास प्राधान्य देत असल्यामुळे रेल्वेचे आरक्षण किंवा कन्फर्म तिकिट (Railway confirm ticket) मिळणे ही अवघड गोष्ट असते. त्यामुळे मग कित्येक दिवस आधीपासूनच तिकिट बुक करू ठेवावे लागते. त्यातच काहीवेळा कन्फर्म तिकिट असतानाही काही कारणास्तव प्रवास रद्द करण्याची वेळ येते. मग ते तिकिट वाया तरी जाते किंवा त्यावर काही रक्कम रिफंड मिळवता येते. तुम्हीदेखील अशा परिस्थितीला सामोरे गेले असाल. मात्र यापुढे तुमचे कन्फर्म तिकिट वाया जाणार नाही. कारण आयआरसीटीसीने (IRCTC new facility) एक नवीन सुविधा आणली आहे. आता तुम्ही कन्फर्म केलेले तिकीट दुसऱ्याला ट्रान्सफर करू शकता. या संदर्भात, भारतीय रेल्वेने एका प्रवाशाकडून दुस-या व्यक्तीकडे कन्फर्म तिकीट हस्तांतरित करण्यासंदर्भातील मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. (IRCTC starts new facility to transfer your confirm railway ticket to another passenger) 

अधिक वाचा : Super Earth : सूर्यमालेच्या बाहेर दोन 'सुपर अर्थ'चा शोध, असते 3 दिवसांचे वर्ष, जीवसृष्टीदेखील शक्य!

अनेकवेळा रेल्वे प्रवाशांना तिकीट काढल्यानंतर म्हणजे कन्फर्म  रेल्वे तिकिट मिळाल्यानंतर काही अडचणीमुळे प्रवास रद्द करण्याची वेळ येते. अशा परिस्थितीत त्यांना तिकीट रद्द करून रिफंड घ्यावा लागतो किंवा ते तिकिटच वाया जाते. मात्र, प्रत्येक वेळी कन्फर्म तिकीट मिळणे सोपे नसते, त्यामुळेच रेल्वेने ही नवी सुविधा आणली आहे.

काय आहे नवीन नियम

रेल्वेच्या नवीन नियमांनुसार, एक प्रवासी त्याचे कन्फर्म केलेले तिकीट त्याच्या कुटुंबातील वडील, आई, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी, पती किंवा पत्नी अशा कोणत्याही सदस्याच्या नावावर ट्रान्सफर करू शकतो. यासाठी प्रवाशाला ट्रेन सुटण्याच्या 24 तास अगोदर विनंती करावी लागेल. यानंतर, तिकिटावरील प्रवाशाचे नाव काढले जाईल आणि ज्या सदस्याच्या नावावर तिकीट हस्तांतरित केले गेले आहे त्याचे नाव लिहिले जाईल.

अधिक वाचा :  रागात घर सोडलेली नर्गिस आज आहे टॉपची अभिनेत्री

एकदाच करता येणार हस्तांतरण

अर्थात यासंदर्भात भारतीय रेल्वेने सांगितले आहे की, रेल्वे तिकिटांचे हस्तांतरण फक्त एकदाच केले जाऊ शकते. म्हणजेच जर प्रवाशाने त्याचे तिकीट दुसर्‍या व्यक्तीकडे हस्तांतरित केले असेल तर ते तिकीट नंतर इतर कोणालाही हस्तांतरित केले जाऊ शकत नाही. त्यामुळे, जर तुम्ही आधीच एखाद्याला तिकीट हस्तांतरित केले असेल तर तुम्ही दुसऱ्यांदा सेवेचा लाभ घेऊ शकत नाही.

तिकीट हस्तांतरणाची मार्गदर्शक तत्त्वे 

 1. तुम्ही सरकारी कर्मचारी असाल, तर ट्रेन सुटण्याच्या 24 तास आधी अशी विनंती करावी.
 2. कोणताही सण, लग्न समारंभ किंवा कोणतीही वैयक्तिक समस्या असल्यास प्रवाशाने प्रवासाच्या 48 तास अगोदर तिकीटासाठीची विनंती करावी.
 3. NCC कॅडेटना तिकीट हस्तांतरण सेवेचा लाभ देखील घेता येईल.

अधिक वाचा : ज्या मुंबई-अहमदाबाद हायवेवर Cyus Mistry यांचा अपघात झालेला त्याच ठिकाणी वर्षभरात 263 दुर्घटना, 62 जणांचा मृत्यू

तुमचे तिकीट हस्तांतरित करण्यासाठीची स्टेप बाय स्टेप पद्धत -

 1. प्रथम तुम्हाला तिकिटाची प्रिंट आउट आवश्यक आहे
 2. तुम्ही ज्या व्यक्तीला तिकीट हस्तांतरित करू इच्छिता त्या व्यक्तीचे आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र सोबत ठेवा
 3. तुमच्या जवळच्या रेल्वे स्टेशनवरील आरक्षण काउंटरकडे जा
 4. तिकीट हस्तांतरणासाठी अर्ज करा
 5. प्रस्थान वेळेच्या किमान 24 तास आधी विनंती केली जावी, अर्थात विनंती करणाऱ्या प्रवाशानुसार ती बदलू शकते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी