IRCTC Shiv Shani Sai Yatra: आयआरसीटीसीने आणले जबरदस्त पॅकेज...शिर्डी, शनी शिंगणापूर, त्र्यंबकेश्वर यात्रा फक्त एवढ्या पैशात

IRCTC update : आयआरसीटीसी अनेक धार्मिक ठिकाणांसाठीही टूर पॅकेज आणत असते. प्रवाशांना यामुळे एकाचवेळी अनेक महत्त्वाची ठिकाणे कमी खर्चात पाहता येतात. आता आयआरसीटीसीने महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांसाठी एक जबरदस्त टूर पॅकेज आणले आहे. रेल्वेच्या या 'शिव-शनी-साई' यात्रेद्वारे तुम्हाला शिर्डी, शनी शिंगणापूर, त्र्यंबकेश्वरसारखी महत्त्वाची धार्मिक ठिकाणे पाहता येणार आहेत.

Shiv Shani Sai Yatra Tour Package
शिव शनी साई यात्रा टूर पॅकेज 
थोडं पण कामाचं
  • आयआरसीटीसीच्या प्रवाशांसाठी धम्माल टूर्स
  • आयआरसीटीसीची नवी 'शिव-शनी-साई' यात्रा
  • स्वस्तात करा धार्मिक ठिकाणांचे दर्शन

IRCTC Tour Package Update:नवी दिल्ली : आयआरसीटीसी (IRCTC) आपल्या प्रवाशांसाठी नवनवीन सुविधा आणत असते. आयआरसीटीसी विविध टूर पॅकेजेस देखील राबवत असते. यामध्ये विविध प्रकारची ठिकाणे असतात. अनेक धार्मिक ठिकाणांसाठीही रेल्वेची टूर पॅकेजेस आहेत. आता आयआरसीटीसीने महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांसाठी एक जबरदस्त टूर पॅकेज आणले आहे. या टूर पॅकेजद्वारे तुम्ही शिर्डीचे(Shirdi) साई धाम, शनी शिंगणापूर (Shani Shingnapur)आणि त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar Jyotirlinga) ज्योतिर्लिंगाला भेट देऊ शकता. भारतीय रेल्वे (Indian Railway)ही आजही देशातील लाखो प्रवाशांच्या पसंतीचे पहिले प्रवास साधन आहे. आपल्या देशाच्या सर्व कानाकोपऱ्यात, प्रत्येक राज्यात विविध धार्मिक स्थळे आहेत. प्रवासी, भक्त लांब अंतरावरून या ठिकाणांना भेट देण्यासाठी प्रवास करत असतात. आयआरसीटीच्या या टूर पॅकेजमुळे (Shirdi Sai Baba Darshan Tour Package) तुम्हाला कमी खर्चात आरामदायी प्रवास करत आपल्या लाडक्या धार्मिक स्थळांना भेट देता येणार आहे. या टूर पॅकेजबद्दल तपशीलाने जाणून घ्या. (IRCTC tour package for Shirdi and Shani Shingnapur and Trimbakeshwar Jyotirlinga) 

अधिक वाचा : YouTube Video करून पैसे कमावण्याचे आठ सोपे मार्ग

तुम्ही जर शिर्डी, शनी शिंगणापूर आणि त्र्यंबकेश्वर या धार्मिक स्थळांना भेट देण्याचा विचार करत असाल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. आयआरसीटीसीने तुमच्यासाठी एक जबरदस्त टूर पॅकेज आणले आहे.  अगदी कमी पैशात तुम्ही या अप्रतिम टूर पॅकेजचा लाभ घेऊ शकता. 

तुमचा प्रवास होणार भारत गौरव टुरिस्ट ट्रेनने 

IRCTC ने या टूर पॅकेजला 'शिव-शनि-साई यात्रा' असे नाव दिले आहे. या टूरचे वैशिष्ट्य म्हणजे आयआरसीटीसी भारत गौरव टुरिस्ट ट्रेनच्या माध्यमातून ते आयोजित करत आहे. या टूरमध्ये तुम्हाला जगप्रसिद्ध वेरुळ लेणीही पाहायला मिळतील. वेरुळची लेणी युनेस्कोच्या जागतिक वारसा श्रेणीत येतात.

अधिक वाचा : Video : PM मोदींनी लिव्हर फिरवताच चित्ता झाला स्वतंत्र, कुनो राष्ट्रीय उद्यानात फिरू लागला

5 दिवस आणि 4 रात्रींचे टूर पॅकेज

IRCTC चे हे टूर पॅकेज 5 दिवस आणि 4 रात्रीचे असेल. भारत गौरव टुरिस्ट ट्रेन 17 ऑक्टोबर 2022 रोजी नवी दिल्ली येथून टूर प्रवासासाठी सुटेल. IRCTC ने या टूरचे भाडे 18,500 रुपये प्रति व्यक्ती ठरवले आहे. टूर अंतर्गत, तुम्हाला AC-3 श्रेणीमध्ये प्रवास करायला मिळेल. मथुरा, आग्रा कॅंट, ग्वाल्हेर, वीरांगना लक्ष्मीबाई (झाशी), बिना, भोपाळ आणि इटारसी ही स्थानके ट्रेनमध्ये चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी निश्चित करण्यात आली आहेत.

अधिक वाचा : Mumbai News: मुंबईतल्या दिवाळीबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, पालिका आयुक्तांना दिले आदेश

या ठिकाणांना देता येणार भेट

शिव-शनि-साई यात्रेअंतर्गत शिर्डी, शनि शिंगणापूर, घृष्णेश्वर, वेरुळ लेणी आणि त्र्यंबकेश्वरला भेट देता येईल. जर तुम्हाला या टूर पॅकेज अंतर्गत प्रवास करायचा असेल तर तुमची सीट लवकर बुक करा. या ट्रेनमध्ये फक्त 600 जागा आहेत. या टूर पॅकेजची संपूर्ण माहिती IRCTC च्या वेबसाइटवर मिळेल.

आयआरसीटीसी प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन अनेक नवीन यंत्रणा विकसित करते आहे. यातून आगामी काळात रेल्वेचे आधुनिक रुप पाहायला मिळणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी