IRCTC ची वेबसाइट अचानक पडली बंद

काम-धंदा
Updated May 16, 2019 | 16:33 IST | टाइम्स नाऊ हिंदी

IRCTC Website Downtime: भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर तिकीट बूक करतांना ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कारण, आयआरसीटीसी वेबासाइट अचानक बंद पडली. नेमकं काय झालं हे जाणून घेण्यासाठी पाहा हे वृत्त.

irctc website downtime
IRCTC ची वेबसाईट अचानक बंद  |  फोटो सौजन्य: BCCL

मुंबईः आजच्या डिजीटल जगात प्रत्येक गोष्ट ग्राहकांसाठी आॅनलाईन उपलब्ध आहे, एका क्लिकवर आपण कोणतीही वस्तू घरी मागवू शकतो. अशा प्रकारच्या उपलब्ध आॅनलाईन सुविधा आपले जीवन सुखकर करत जरी असल्या तरी तांत्रिक बिघाडामुळे या सुविधा काही क्षण बंद पडल्या तर आपली तारांबळ उडून जाते. असचं काही रेल्वे प्रवाशांसोबत घडलयं. कारण, रेल्वेची प्रसिद्ध असलेली IRCTC ची वेबसाइट अचानक बंद पडली. आॅनलाईन तिकीट बूक करतांना ग्राहकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. आयआरसीटीसीची अधिकृत वेबसाइट चेक केली असता असे लक्षात येते की, यावेळी वेबसाइटवर मेंटेनन्सचं काम चालू आहे. त्यामुळे वेबसाइटवर तिकीट बूक करतांना ग्राहकांना त्रास होत आहे. गुरूवार सकाळपासून हे मेंटेनन्सचं काम सुरू असल्याने वेबसाईट बंद आहे. तर, त्रस्त प्रवाशांनी आपल्या समस्या सोशल मीडियावर पोस्ट करून संताप व्यक्त केला आहे. 

ग्राहकांच्या समस्येवर पर्यायी हेल्पलाईन नंबर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. तिकीट रद्द करणे, तिकीटाच्या रक्कमेचा परतावा मिळविण्यासाठी ग्राहक पुढील क्रमांकावर संपर्क करू शकतात - ०७५५-६६१०६६१, ०७५५-४०९०६००, ०७५५-३९३४४१४१ तसेच etickets@irctc.co.in या ईमेल आयडीवर आपल्या समस्या पाठवू शकता. 

बहुतांश युजर्स आपल्या समस्या ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त करत आहेत. ते लिहितात, आयआरसीटीसीची अधिकृत वेबसाइट ओपन केली असता त्या पेजवर डाऊन टाईमचा संदेश पाहायला मिळत आहे. पाटील मोहन यांच्या ट्विटनुसार त्यांना लॅपटॉप, डेक्सटॉप तसेच मोबाइलवरील फोनपे, पेटीएम सारख्या अॅपवरही ही समस्या येत आहेत.

तत्काळ तिकीट बुकिंगचे नियम थोडक्यात

एसी डब्यात तत्काळ सीट बुकींग घेण्यास आईआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाईटवर सकाळी १० वाजता सुरूवात केली जाते, तर नॉन एसी कोचमधील बुकींगसाठी खिडकी ११ वाजता सुरू केली जाते.

तसेत तात्काळ बुकींग प्रवासाच्या एक दिवस अगोदर करावी लागते, इंडियन रेल्वेच्या नियमांनुसार, कमाल ४ ट्रेनचे तत्काळ तिकीट बुकींग आपण करू शकतो. स्लीपर क्लासमध्ये तत्काळ कोट्यात तिकीट बुकींगसाठी इंडियन रेल्वे किमान १०० तर कमाल २०० रूपये चार्ज करते. एसी चेअर कारमध्ये तत्काळ कोट्यात तिकीट बुकींगसाठी इंडियन रेल्वे किमान १२५ तर कमाल २२५ रूपये चार्ज करते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
IRCTC ची वेबसाइट अचानक पडली बंद Description: IRCTC Website Downtime: भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर तिकीट बूक करतांना ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कारण, आयआरसीटीसी वेबासाइट अचानक बंद पडली. नेमकं काय झालं हे जाणून घेण्यासाठी पाहा हे वृत्त.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles