Insurance buyers, ALERT | ऑनलाइन आरोग्यविमा विकत घेतांय? मग या वेबसाइटपासून राहा सावध...IRDAI ने दिला सावधगिरीचा इशारा

Health Insurance : विमा ऑनलाइन स्वरुपात एखाद्या वेबसाइटवरून विकत घेतला जातो. विम्यासंदर्भात अनेक कंपन्या बाजारात आल्या आहेत. अनेक ऑफर्सदेखील वेबसाइटवर उपलब्ध असतात. मात्र एखाद्या वेबासाइटवरून तुम्ही ज्या विमा कंपनीचा विमा विकत घेत आहात ती कंपनी खरोखरच आयआरडीएआयने मान्यता दिलेली आहे का? त्या कंपनीची नोंदणी झालेली आहे का? याची खातजरमा तुम्ही केली पाहिजे. आयआरडीएआयने आता एका विमा कंपनीबद्दल आणि तिच्या वेबसाइटबद्दल ग्राहकांना सावध केले आहे.

IRDAI warning to Insurance buyers
ऑनलाइन विमा घेण्यासंदर्भात आयआरडीएआयचा ग्राहकांना इशारा 
थोडं पण कामाचं
  • संबंधित कंपनी विमा नियामकाकडे नोंदणीकृत नसल्याची माहिती IRDAIने दिली आहे
  • ‘Even Healthcare Pvt Ltd’ ही वेबसाइट www.even.in चालवते.
  • Even.in सध्या दरमहा 525 रुपयांवर सदस्यत्व देते.

IRDAI warning to Insurance buyers : नवी दिल्ली : अलीकडच्या काळात सर्वच व्यवहार ऑनलाइन होत आहेत. आर्थिक व्यवहारदेखील मोठ्या प्रमाणात ऑनलाइन स्वरुपात होत आहेत. याच रीतीने विमादेखील ऑनलाइन स्वरुपात एखाद्या वेबसाइटवरून विकत घेतला जातो. विम्यासंदर्भात अनेक कंपन्या बाजारात आल्या आहेत. अनेक ऑफर्सदेखील वेबसाइटवर उपलब्ध असतात. मात्र एखाद्या वेबासाइटवरून तुम्ही ज्या विमा कंपनीचा विमा विकत घेत आहात ती कंपनी खरोखरच आयआरडीएआयने मान्यता दिलेली आहे का? त्या कंपनीची नोंदणी झालेली आहे का? याची खातजरमा तुम्ही केली पाहिजे. अशा विमा कंपन्या आणि त्यांच्या पॉलिसी यापासून तुम्ही सावध असले पाहिजे नाहीतर तुम्हाला मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागू शकते. आयआरडीएआयने आता एका विमा कंपनीबद्दल आणि तिच्या वेबसाइटबद्दल ग्राहकांना सावध केले आहे. (IRDAI warns Insurance buyers against buying health insurance from Even Healthcare site)

अधिक वाचा : Modi Government | मोठी बातमी! केंद्र सरकार तुमच्या खात्यात 4000 रुपये ट्रान्सफर करणार का, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

आयआरडीएआयने दिला सावधगिरीचा इशारा

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण म्हणजे आयआरडीएआयने (IRDAI)बुधवारी (13 एप्रिल) ग्राहकांना अनधिकृत आणि नोंदणी नसलेल्या प्लॅटफॉर्मवरून आरोग्य विमा खरेदी करण्याविरुद्ध चेतावणी देणारी नोटीस जारी केली. या सार्वजनिक नोटीसमध्ये, नियामकाने निदर्शनास आणले की इव्हन हेल्थद्वारे (Even Healthcare)ऑफर केलेल्या पॉलिसी या आरोग्य विमा योजना नाहीत. तसेच कंपनी विमा नियामकाकडे नोंदणीकृत नसल्याचेही नमूद केले आहे.

अधिक वाचा : Property Tips | घर खरेदी करतांय? मग खरेदीपूर्वी तपासा ही 5 कागदपत्रे, होणार नाही फसवणूक

नोंदणीकृत नसलेली कंपनी

आयआरडीएआयने जारी केलेल्या नोटिसीत नमूद केले आहे की, www.even.in ही वेबसाइट चालवणारी ‘इव्हन हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड’ नावाची संस्था आरोग्य योजना ऑफर करत आहे, ज्या आरोग्य विमा योजना नाहीत.  “...ती संस्था IRDAI कडे नोंदणीकृत संस्था नाही. ‘इव्हन हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड’ च्या या योजनांचे सदस्यत्व घेणाऱ्या लोकांना सूचित करण्यात येते की ते त्यांच्या स्वत:च्या जोखमीवर व्यवहार करत आहेत,” असे आयआरडीएआयने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे.

अधिक वाचा : Indian Railways Rule | रात्रीच्या प्रवासासाठीचा रेल्वेचा हा खास नियम जाणून घ्या, नाहीतर होईल नुकसान

“हे स्पष्ट केले आहे की फक्त IRDAI-नोंदणीकृत विमा कंपन्या किंवा त्यांचे नियुक्त विमा एजंट आणि विमा मध्यस्थ विमा उत्पादने विकू शकतात. नियमन नसलेल्या संस्थांशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी. तसेच IRDAI नोंदणीकृत विमा कंपन्यांकडून आरोग्य विमा उत्पादने आणि सेवांचा लाभ घ्यावा, असा सल्ला याद्वारे जनतेला देण्यात आला आहे," असे आयआरडीएआयने पुढे सांगितले आहे.

विमा कंपनीने IRDAI कडे नोंदणी केलेल्या विमा कंपन्यांच्या यादीची लिंक देखील दिली आहे. तुम्ही अधिकृत यादी येथे तपासू शकता - https://www.irdai.gov.in/ADMINCMS/cms/NormalData_Layout.aspx?page=PageNo...

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी