Isha Ambani welcome Twins : मुकेश अंबानी पुन्हा झाले आजोबा...मुलगी ईशाला झाले जुळे,अंबानी आणि पिरामल कुटुंबात आनंदोत्सव

Mukesh Ambani Duaghter : ईशा (Isha Ambani) आणि तिचे पती आनंद पिरामल (Anand Piramal) यांच्या संसारात जुळ्या बाळांचे आगमन झाले आहे. या जुळ्या अपत्यांमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असल्याचे कुटुंबाने रविवारी एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीचा विवाह उद्योगपती अजय पिरामल आणि स्वाती पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल याच्याशी 2018 मध्ये झाला होता.

Isha and Anand Piramal
ईशा आणि आनंद पिरामल 
थोडं पण कामाचं
  • मुकेश अंबानी झाले आजोबा
  • ईशा आणि आनंद पिरामल यांना जुळे अपत्य
  • अंबानी आणि पिरामल कुटुंबात जल्लोष

Isha Ambani gave birth to twins :मुंबई : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची मुलगी ईशाला जुळे मुले झाली आहेत. यामुळे अंबानी आणि पिरामल कुटुंबात आनंदोत्सवाचे वातावरण आहे. ईशा (Isha Ambani) आणि तिचे पती आनंद पिरामल (Anand Piramal) यांच्या संसारात जुळ्या बाळांचे आगमन झाले आहे. या जुळ्या अपत्यांमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असल्याचे कुटुंबाने रविवारी एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. या दोन जुळ्या बाळांची नावे आडिया आणि कृष्णा अशी ठेवण्यात आली आहेत. या निमित्ताने रिलायन्स समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी आणि पिरामल समूहाचे चेअरमन अजय पिरामल (Ajay Piramal) या दोघांनाही आजोबा होण्याचा आनंद मिळाला आहे. (Isha Ambani and her husband Anand Piramal becomes parents of twins)

अधिक वाचा : कतारमधील यंदाच्या FIFA World Cup काय आहे खास? वाचा

कुटुंबाने दिली माहिती

ईशा आणि आनंद पिरामल यांच्या जुळ्या अपत्यांबद्दल माहिती देताना निवदेनात म्हटले आहे की "आम्हाला हे सांगताना आनंद होतो आहे की आमची मुले ईशा आणि आनंद यांना 19 नोव्हेंबर 2022 रोजी परमेश्वराने जुळ्या मुलांचा आशीर्वाद दिला आहे. ईशा आणि अपत्ये, मुलगी आडिया आणि मुलगा कृष्णा यांचे आरोग्य चांगले आहे. " "आम्ही आदिया, कृष्णा, ईशा आणि आनंद यांच्या आयुष्यातील या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यात तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा मागतो," असेही त्यात पुढे म्हटले आहे.

रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीचा विवाह उद्योगपती अजय पिरामल आणि स्वाती पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल याच्याशी 2018 मध्ये झाला होता. हे लग्न देशातील अत्यंत हाय प्रोफाइल लग्न होते. या लग्नाचा खर्च, त्यातील कार्यक्रम, लग्नाचा दिमाखदार सोहळा, या सोहळ्यातील अनेक नामवंत आणि सेलिब्रिटींची हजेरी या सर्व गोष्टी चर्चेचा विषय झाला होत्या.

अधिक वाचा : म्हणून स्वप्नात मृत नातेवाईक दिसतात

दोन दिग्गज उद्योग घराणी

ईशा आणि आनंद पिरामल यांच्या लग्नामुळे देशातील दोन दिग्गज उद्योग घराणी जवळ आली होती. मुकेश अंबानींचा रिलायन्स समूह आणि अजय पिरामल यांचा पिरामल समूह हे देशातील दोन मातब्बर उद्योग समूह आहेत.

अधिक वाचा  : मनुक्याचे पाणी मिळवू देऊ शकते या 4 आजारांपासून मुक्ती

अब्जाधीश मुकेश अंबानी यांनी अलीकडेच झालेल्या रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये त्यांच्या मुलांची त्यांच्या उद्योग-व्यवसायात नेमकी काय भूमिका असेल याबाबतचा संभ्रम अखेर दूर केला. मुलगी ईशा अंबानी (Isha Ambani) हिची त्यांच्या उद्योग समूहाच्या रिटेल व्यवसायाची लीडर प्रमुख म्हणून ओळख करून दिली. यासोबतच त्यांनी त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) यांचयाकडे ऊर्जा व्यवसाय सोपवण्याची घोषणा करून कंपनीची उत्तराधिकार योजना स्पष्ट केली. मुकेश अंबानी यांनी त्यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी याला आधीच रिलायन्स ग्रुपच्या टेलिकॉम शाखा रिलायन्स जिओचे प्रमुख म्हणून नेमलेलं आहे.

मुकेश अंबानी यांना एकूण तीन मुले आहेत. ईशा आणि आकाश ही जुळी भावंडे आहेत. ईशा हिचं लग्न पिरामल ग्रुपच्या आनंद पिरामलसोबत झालं आहे. तीन मुलांपैकी फक्त आकाश अंबानीला कंपनीचे कार्यकारी प्रमुख बनवण्यात आले आहे. ईशा आणि अनंत हे दोघेही समूह कंपन्यांच्या संचालक मंडळाचे सदस्य आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी